Monday, 28 December 2015

MY POETRY

                                                

Earth Gravity

As I reach height of sixty,
I hear ……………
Calling of Gravity of Earth,
Where I belong to…..

Before sleeping into abode of Earth
I find………….
My mind and body in gravity
Of your existence within me.

But I know gravity of death,
Is greater than you and me.
Yet I know I would remain
Not severed from you.



                                      MY DEATH

When I pass away, nothing comes with me.
No thoughts, no breathing, nothing of my family.
Only I go……alone………….
Because there in Heaven, nothing can come with me.
I leave everything……….forever……….
Yet what I leave, I leave my heart for you.
Because this is what really I have.
All else is for all others, except you.


मी आणि तू
वाळवंटात हरवलं, म्हणून काय झालं
तरी जगण्याची जिद्द आहे.
कुठचं नसलं तरी काय झालं
माझ्या डोळ्यात आहे ना पाणी.   

ओंजळीत पहाडात, धूसर धुके दाटलेलं
गुंफेत,ह्रदयात माझ्या, जणू दुख: दाटलेलं.
सुकलेल्या गुलाबाच्या किती पाकळ्या,
वहीत जपलेल्या, जुन्या आठवणी, आता
बसतो लिहीत उगाच कां?

फुलताना माणसानं, गुलमोहरासारखं
बहरावं...ज्याला कडावर जळायचं,
त्यालाच स्वप्नांनी लपवायचं.

आहोटीचा समुद्र पहातोय...
नक्की काय वाटतंय...
ओली वाळू, माझ्या गळा दाटतेयं.

नेहमी मला वाटतं...
मी अजरामर असेन...अन्
झाली जर का जगबुडी,
तरी मी तुझी वाट पहात असेन.

तुला माहित असलं-नसलेलं,
एक दुख:, माझ्या ह्रदयात दाटून
आहे. विचार करतो, नक्की याचा
ओघ कुठुन आहे.....?
आठवतं का ग कधी तुला,
आपलं सरलेलं नातं....
जीवनाच्या त्या वळणावर,
मी मांडलाय आठवणींचा मंडप,
आणि त्याच वळणावर,
तू मांडला आहेस, तुझा संसार.


आता तुझी सोबत उरली आहे,
अवकाशात चांदण्या वेचण्याची.
तुझ्याशिवाय जगण्यातली व्यर्थता
जाणूनही, अखंड वाट पाहण्यात तुझी,
जीवन कृतार्थ मानण्याची.

जाताना तू म्हणालीस, काळजी घे.
पण माझे काळीजच घेऊन गेलीस.
मी तरी म्हणत राहिलो आहे....
जीवनाच्या कुठल्या तरी वळणावर,
आपण पुन्हा नक्की भेटणार आहोत,
माझ्या अंतापूर्वी, तुझ्या सामर्थ्याने.
------------------------------------
Sensitivity
You have sensitivity,
That understands you.
Is it not true that your,
Sensitivity knows that
You have suppressed me
Within you?

Do I understand mysensitivity,
For you?
I am clear that I have you,
Within me, not suppressed.
But I have no way to let me,
Approach you.
Because I am waiting for,
Our destiny, if any, to let you,
Approach me,
From where I have lost you.


नात्यात नसलेलं प्रेम

नातं कुणावर लादू नका.
पण नातं काय लादण्याची,
वस्तू आहे, देण्या-घेण्याची?
          म्हणून नात्यापेक्षा श्रेष्ठ असतं प्रेम.
          ते जन्माला येतं, एकमेकांच्या नात्यात नव्हे.
          कारण ते जन्माला आलेलं असतं,
          जीवाच्या जन्माआधीच.
म्हणून जन्माला येतं ते नातं.
पण जन्माच्या आधीपासून असतं ते प्रेम.
प्रेमाला नसतात रक्ताची नातं,
कारण प्रेमाला असतात जीवाच्या,
जन्माच्या अलिकडली पलीकडली नाती.
          प्रेमाला असतात प्रेमाच्या अलिकडली,
          पलीकडली आधिभौतिकं.
          जी नात्यात असूनही असतात परतंत्र
          स्वातंत्र्यासाठी धडपडत राहतात.
          पण स्वैराचारात नाही अडकतं.
म्हणून जीवाची अस्वस्थता शांत असते.
निराशेचे, वैफल्याचे, असहाय्यतेचे घोट घेत
ही नाती जगत राहतात.

          आधिभौतिकाला भौतिकतेत जगण्यासाठी,
          सनातन प्रेमाच्या ओंजळी घेऊन,
          अमरत्वाच्या शोधात.
भूतकाळातल्या, बाल-तरुणपणाच्या आठवणींचा पिंगा,
निर्माल्य झाला तरी,
त्यातही सुगंधाच्या जाणीवा शोधणारा मी.
वृध्दावस्थेत तारुण्य जपणारा मी.
          अजून कसा हरवला नाही?
          माझ्यामध्ये सामावलेल्या तुला?
          अन् पारखा
          कसा अजून नाही झाला?
************************************

          तिन्हीसांजेला जाग येते मला, तेव्हा मी पाहतो मला.
          तुझ्या मांडीवर निजलेला.
          शांतपणे तुला,तृप्तीत माझ्या अनुभवणारा
          मी, दीनवाणा आज कसा?
          ***************

हरविले घर माझे, तुझ्या घरपणात.
तुझे घर तुझेच आहे राहिलेले.
पण मी नाही तुझ्या घरात.
तू माझी राहिली नाहीस.
ह्याची खंत नाही मला.
पण मी तुझा होण्यासाठी,
का धडपडतो आहे, प्रेमाने?   


किर्र रात्र, टपटपणारा पाऊस.
डोळ्यात माझ्या हळूवारपणे,
तरळणारी तू.
***************
Who are you to me?

Are you away from me?
If you were away,
I won't be what I am.
So you are not away.

Yet you are nowhere,
Where I want you to be.
So that I would be,
What I want to be.

It means, you have become,
'You' only for identity.
Actually & really,
I & you are together.
But with identities.
I & you are severed.

So, I wait for you to come,
From somewhere,
where there are no identities.
*****************
मैत्रीसाठी, प्रेमासाठी पुढे केलेला हात,
कोणी मागे घेतो का?
पण जीवनभर विश्वासाने,
साथ देणारा हात....
मी शोधात असतो.
शोधून मिळाला, पण हातात हात येत नसतो.
कारण सावलीसाठी झाड,
माझ्याजवळ येत नसत...
मीच झाडाजवळ जायला हवं असत ना?
म्हणून रणरणत्या उन्हातही तुझ्याजवळ,
मला यायचं असत...
तुझी मदत हवी असते...
 माझ्या अंतर-बाह्य तुला,
share करायचं आहे...
म्हणून मी अखंडपणे तुझी,
वाट पहात आहे.
******************
It does not matter
That you don't Reply.
But it does matter,
That you don't come.

It does not matter,
That you don't come.
But it does matter,
That you don't Reply.
Finally it does not matter.
That you neither Reply,
Nor do you come.
Because you remain,
what I want you to be.
**************