मन
(1)मनाला
योगसाधनेने सुनियोजित करता
येते. म्हणून ओशोंच्या मते
योगसाधना म्हणजे कोणत्याही प्रकारचे
शास्त्र, शरीर स्वास्थ्य, मानसिक आरोग्य
इ कोणत्याही भौतिक लाभासाठी,
भौतिकधारणेसाठी किंवा बौधिक आयामासाठी
नसून योगाचा मूलभूत आधार
मानवी मनाच्या व अस्तित्वाच्या
नियमांची कार्यप्रणाली जाणण्यासाठी
व नंतर त्या जाणीवेच्याही
पलीकडे मार्गस्थ होण्यासाठी
आहे.
जीव व जीवन ह्या
भौतिकतेचे अधिष्ठान भौतिकतेच्याही
पलीकडे आहे.म्हणूनच असे
म्हणतात की जीवन हे
हेतूपूर्णनाही; जीवनाला कोणतेही लक्ष, कोणतीही
उपाधी देणे अशक्य आहे, कारण
तो एक अज्ञाताचा, गूढ, सूक्ष्मतम, निरुद्देश असा
प्रवास आहे.मुक्ती, मोक्ष, स्वर्ग इ
सर्व केवळ संकल्पना आहेत, त्यांना
वस्तुनिष्ठ अस्तित्व नाही. तरीही
हे निश्चित आहे की
मनाची आत्यंतिक विकसित, प्रगल्भ,परिपक्व,व अतिसूक्ष्म
अवस्था म्हणजेच संजीवन समाधि
होय.
(2)भगवान
पतंजलींनी मन ह्या संज्ञेचा
अत्यंत मर्यादित अर्थाने
वापर केला आहे. पण त्यांनी
चित्त ह्या संज्ञेचा वारंवार,
अगदी पहिल्या सूत्रापासून उपयोग
केला आहे; कारण चित्त
म्हणजे मनापलीकडची, मन-बुध्दी-अहंकाराची मूलाधार
अशी यंत्रणा आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते
मनाचे तीन भाग आहेत- पहिला
भाग-
जाणीव (जागृत मन-consciousness) ह्या
चेतासंस्थेमध्ये आहे; दुसरा भाग- नेणीव ( अजागृत, सुप्त
मन-
unconsciousness) व तिसरा भाग आहे
जाणीव-नेणीव ह्यांना जोडणारा
दुवा, सेतू ( bridge), ज्याला अर्धजाणीव
किंवा अर्धजागृत मन
(
subconsciousness) असे म्हणले आहे.
भ.पतंजलींनी
मन ह्या संज्ञेचा समाधिपाद
२.५३
ह्या सूत्रात स्पष्टपणे उपयोग
केला आहे, तो असा:
धारणासु च योग्यता मनस:
ह्याचा अर्थ असा की, प्राणायामाने
धारणेसाठी मन तयार होते. धारणा
म्हणजे धारण करणे. कोणतीही गोष्ट
मनात आल्यावर तरंगासारखी असते. ती
स्थिर करण्याची प्रक्रिया
म्हणजे ज्याला आपण सामान्यत:
एकाग्रता म्हणतो ती होय. थोडक्यात,
धारणा ही एकाग्रता करण्याची
अगदी प्राथमिक अवस्था
आहे.
ही धारण प्रक्रिया सबल, सक्षम
करण्यासाठी प्राणायाम अत्यंत
महत्वाचा आहे. चित्ताच्या मागे
मन-बुध्दी-अहंकार
आहेत. तेव्हा चित्ताला योगसाधनेसाठी
सक्षम करण्याचे काम
मनाबरोबरच बुध्दी व अहंकार
ह्यांनाही करावे लागते.
मन व चित्त ह्यांतील
फरक लक्षात घेऊन भ.पतंजलींनी
समाधिपाद सूत्र १.३५ मध्ये
म्हणले आहे:
विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनस: स्थितिनिबन्धनी |
ह्या सूत्रातही भ. पतंजलींनी
चित्तामागे मन आहे, ही अवस्था
स्पष्ट करताना म्हटले आहे
की चित्ताची मूलगामी
वृत्ती “विषयवती“ म्हणजेच विषयाशी
एकरुप होण्याची, विषेशत: इंद्रियगम्य विषयांशी
एकरुप, होण्याची असते. नुसत्या विषयाच्या
आठवणीने सुध्दा चित्त त्याच्याशी
जडून जाते. उदा. आवळ्याच्या किंवा
चिंचेच्या नुसत्या आठवणीने तोंडाला
पाणी सुटते! चित्तामागे अहंकार, बुध्दी
व मनही मग ओढले
जाते.
(3)उपनिषद्कारांनी मनाला अंत:करणाचाच एक
भाग म्हणले आहे. कारण त्यांच्या
मते चित्त हा अंत:करणाचा
एक भाग असून अंत:करण
हा
“मन-बुध्दी-अहंकार-चित्त“ असा
चतुर्विध संस्कार आहे. त्याचे प्रगटीकरण
संकल्प व विकल्प ह्या
व्दंव्दांत्मक वृत्ती योगाने होत
असते.
(4)आदिशंकराचार्यांनी म्हणले आहे:
मनश्च मन्तव्यं (मन विचार
करते), बुध्दिश्च बोधव्यं च (आणि
बुध्दी ज्ञान देते, अर्थ जाणते), अहंकारश्च
अहंकर्तव्यं च (आणि अहंकार
मीपणाची जागृती व स्वकर्तव्याचे
व्यवधान ठेवते), चेतश्च चेतवितव्यंच
(चित्त मात्र सनातन असून
ते अखंड, सदैव जागे
असते. गाढ झोपेतही ते
जागे असते व साक्षीभावाने
जागृत असते.) ह्याचाच अर्थ
असा की, भौतिक जगाची
ओळख
(cognitive identity) सांगणारी वृत्ती म्हणजे
बुध्दी. ह्या भौतिक जगाला
जाणणारा म्हणजे “मी“ असा अभिमान
धारण करणारा म्हणजे अहंकार
आणि भौतिक जगाशी, विषयांशी सतत
अनुसंधान ठेवणारी वृत्ती म्हणजे
चित्त होय.
(4)कपिल
मुनींनी सांख्य तत्वज्ञानाप्रमाणे विश्वाच्या
उभारणीची आधारभूत अशी २५ तत्वे सांगीतली
आहेत. व त्यांच्या वर्गीकरणामध्ये मन हे २५
वे तत्व असून त्याचे
स्वरुप प्रकृतीच्या विरोधात
विकृती असे आहे, पण ते
अत्यंत कार्यशील, कार्यप्रवण आहे. असे
असूनही, मनाची निर्मिती मात्र
सत्वगुणापासून होते, असे सांख्यांचे
म्हणणे आहे. कारण त्यांच्या
मते मन हा मोक्षाकडे
नेणारा मूलाधार आहे व
वैश्विक बुध्दीपासून (विराट पुरुषापासून)
सृष्टीचे प्रगटीकरण दोन
दिशांनी होत असते- १. पंचमहाभूते आणि
२.
जीवाची बुध्दी, अहंकार / अहंभाव, दशेंद्रिये व
मन.
अशाप्रकारे मन हा सर्वांत
सूक्ष्मतम असा जीवाचा आधार
असून प्राण हा जीवाचा
भौतिक आधार आहे. म्हणूनच सांख्याच्या
मते प्राणबध्द जीव
म्हणजे शरीर. पण मनाला
शरीराची बध्दता नसते, ते सनातन, अशाश्वत,
अखंड, मुक्तपणे सर्वव्यापी, सर्वगामी, चंचल, व अतिसूक्ष्म
असल्याने दिसत नसले तरी
त्याचे अस्तित्व जाणीवेच्या
कक्षेत राहूनही शरीरबध्द नसते, मुक्तपणे
चराचराला व्यापूनही ते
अखंड राहते.
(५) मन
हे मुख्यत: बाह्यविश्वाच्या आकलनाचे
एक साधन आहे. स्वामी विवेकानंदांच्या मते बाह्यजग हे
अस्तित्व रुपात भासते, कारण आपले
मन बाह्य जगातील प्रत्येक
अस्तित्वमय पदार्थाशी एकरुप, तादात्म
पावते व त्याबाबत जी
प्रतिक्रिया मनात उमटते, ती क्रिया
म्हणजेच त्या पदार्थाचे अस्तित्व
होय.
नाहीतर, त्या पदार्थाच्या अस्तित्वाला
काहीच अर्थ राहत नाही
किंबहुना असा पदार्थ आहे, हे
सुध्दा सत्य नव्हे! म्हणूनच आदि
शंकराचार्यांनी “जगन् मिथ्या“, जग हा
एक आभास आहे, असं म्हटले
आहे.
बाह्य जगत म्हणजे मनावर
प्रतिक्रिया निर्माण करणारे उद्दीपक
कारण होय. खरा मनुष्य
मनाच्या पलीकडे असतो; मन हे
त्याचे केवळ एक साधन
वा उपकरण असते. ह्याचाच अर्थ
असा की मनाचा नाश
झाला तर जगाचे अस्तित्व
शून्य होऊन जाते. चित्त हे
मनाचे उपादान म्हणजेच घटक
तत्व होय व वृत्ती
म्हणजे बाह्यजगाची ज्या
मनाच्या पटलावर क्रिया घडते, तो
पटल किंवा पडदा होय. चित्तात
उठणा-या क्रिया-प्रतिक्रिया ह्या
लाटां किंवा तरंग सद्रुश
असतात.
(६) मनाच्या
अवस्था तीन असतात:पहिली अंधकाराची
किंवा तमाची. ही पशूंत
व मूढ व्यक्तिंमध्ये दिसून
येते. ही अवस्था तमोगुणात्मक
असते. दुसरी अवस्था क्रियाशील
असते व ती रजोगुणात्मक
असते. ह्या अवस्थेमध्ये मुख्यत: सत्ता
व भोग हे दोन
हेतू मनात सळसळत असतात. तिसरी
अवस्था सत्वगुणात्मक असते
व हिच्यामध्ये प्रसन्नता व
शांती यांचा अनुभव येतो. ही
माणसाची उच्च कोटीची अवस्था
होय.
शांत राहणे, ही मन
ह्या शक्तीची सर्वश्रेष्ठ अभिव्यक्ती
आहे.
म्हणूनच असे म्हणतात की, अशा
व्यक्तीने आपल्या मनाच्या तरंगांना/लाटांना
आपल्या कह्यात ठेवले आहे. ह्याउलट,
क्रियाशीलता ही मनाच्या सामर्थ्याची
कनिष्ठ प्रतीची अभिव्यक्ती आहे.
(७) चित्ताच्या
स्वरुपात मनाच्या वरील अवस्थांखेरीज
आणखी चार अवस्था राजयोगाच्या
अंगाने स्वामी विवेकानंदांनी मांडल्या
आहेत. त्या अशा-(अ) विखुरलेले किंवा
क्षिप्त मन-ह्या अवस्थेमध्ये
कर्मवासना/ क्रियाशीलता प्रबल असते. त्यामुळे,
जीव सारखा-सारखा सुख-दुखां:च्या
हेलकाव्यांत बध्द राहतो. (ब) अंधारलेली किंवा
मूढ अवस्था-वर उल्लेखिल्याप्रमाणे,
ही जीवाची तमोगुणात्मक अवस्था
होय.
ही अनिष्ट प्रवृतींना उद्दुक्त
करते.(क) विक्षिप्त अवस्था- ह्या
अवस्थेमध्ये जीव त्याच्या केंद्राकडे
जाण्याचा प्रयत्न करीत असतो. कांही
तत्वज्ञ ह्याच अवस्थेला तुर्यावस्था
म्हणतात.(ड) एकाग्रता- मनाची ही
अवस्था समाधी साधनाची प्राथमिक
पायरी आहे.
(८) अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोध:
१.१२
भ पतंजलींनी वरील
निवेदनात म्हणल्याप्रमाणे, मन हे
चित्ताच्या मागे असलेले सदैव
आंदोलन पावणारे अंत्रेंद्रिय आहे, पण
त्याला भौतिक अस्तित्व नसूनही
त्याची जाणीव मात्र अखंडपणे
जीवाला असते. ह्या मनाला
वैराग्य व अनासक्त करण्याचा
अभ्यास करणे, ही योगसाधनेची
दुसरी पायरी आहे.(एकाग्रता ही
पहिली पायरी आहे). ह्या दुस-या
पायरीचे स्वामीजींनी विश्लेषण
करताना आपली “सवय“ म्हणजे काय
याचे फार सुंदर विवेचन
केले आहे. चित्तात निर्माण
होणारे तरंग म्हणजे मनात
साकार होणा-या प्रतिक्रिया.
ह्यापैकी कांही प्रतिक्रिया वारंवार
उमटत राहतात. अशा प्रतिक्रियांचे रुपांतर कालांतराने संस्कारात
होते व त्यांच्याच साह्याने
संवयी तयार होतात व
मनुष्य त्यांचा गुलाम बनतो. सवय
हा आपला स्वभावच बनून
जातो, व चारित्र्य म्हणजे
आपण सतत गोळा केलेल्या
संस्काराची गोळाबेरीज होते.
(९)स्वामीजींनी
मन हे मूलभूत अशा
प्रकृतीचे अंग आहे, असे म्हणले
आहे.
जीवाची निर्मिती मूलभूत
अशा पुरुष व प्रकृती
ह्या तत्वांपासून होते.प्रकृती
हे जड, अचेतन असे
तत्व आहे तर पुरुष
हे अत्यंत सूक्ष्मतम, चैतन्यपूर्ण, अशाश्वत असे
तत्व आहे.आपले संपूर्ण
जीवन प्रकृतीने व्याप्त
झाल्यामुळे किंवा असल्यामुळे आपल्याला
पुरुष तत्वाची जाणीव होत
नाही.प्रकृती प्राबल्यामुळे मनाची
मात्र सदैव जाणीव असते.म्हणूनच
योगसाधन हा आपल्याला पुरुष
तत्वाकडे नेण्याचा एक
मार्ग आहे.
(१०)कै
भोसेकर सरांनी मन म्हणजे
जिथे विचारांचा उगम
होतो, ते स्थान, असे म्हणले
आहे.जिथं
असं झालं तर बर
होईल किंवा तस झालं
तर बरं झालं असतं, असे
अनिश्चित स्वरुपाचे विचार
येतात, त्याला मन म्हणायचं.
मन हे अत्यंत चंचल
असतं व सगळ्या दृष्य
वा अदृष्य वस्तूंवरुन ते
इतस्तत: भटकत असते. भगवत् गीतेच्या
सहाव्या अध्यायात भ. कृष्ण
म्हणतात-
असंशय महाबहो मनो दुर्निग्रहं
चलम् भ. गीता
६.३५
हे महाबाहो, या चंचल
मनाला आवरणं खरोखरच कठीण
आहे.
(11)प्रयत्नवाद-
मानवी मनाच्या सखोल जाणीवेत
प्रयत्नवादाचा समावेश होतो. मानवी वृत्तीच
नव्हे निसर्गातच प्रयत्नवादाची
मूल्ये अनुस्यूत आहेत. म्हणूनच
असे म्हणतात की प्रयोगशीलता
हा मानवाचाच नव्हे
तर निसर्गाचा सुत्रबध्द
आविष्कार आहे.जगण्याच्या व
जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्नवाद
हा केवळ दृष्टीकोन नसून
तो माणसाच्या कर्माचा
अंगीकृत असा अविभाज्यात जाणारा
भाग आहे.
प्रयत्नवादी माणसाला
आशावादी म्हणतात, तर त्याच्याविरुध्द
असणा-याला निराशावादी म्हणतात.
पण निराशावादीसुध्दा प्रयत्नाशिवाय
राहतो असे मात्र नव्हे.फरक
एव्हढाच आहे की निराशावादी
माणसाचा जीवनाकडे पाहण्याचा
व जगण्याचा दृष्टीकोन
सकारात्मक नसतो.त्याचा
प्रयत्नवाद प्रामाणिक व
पराकाष्ठेचा नसतो.त्यामुळे त्याला
प्रयत्नवादी माणसाप्रमाणेच असफलता, अपयश, व
पराभूत करणा-या घटनांसह
त्यालाही आयुष्याच्या वाटचालीतूनच
जगावे लागते.परंतु अशा
माणसाचे खच्चीकरण फार
लवकर होते.अपयशाचे घोट
पचविणे त्याला फारच दाहक
होते.तसे प्रयत्नवादीचे होत
नाही.अपयशाला स्वीकारतानाही त्याच्या
जगण्याच्या प्रेरणा खचत नाहीत, त्याची
जिगीत्सु वृत्ती चिराऊ होऊन
त्याला सतत, सदैव ताजेतवानं
ठेवते.त्याला अपयशाने खचून
जायला होत नाही.सतत नव्या
उमेदीने तो, काही वेळा
पराकाष्ठेनं तर अनेकदा आक्रमकपणाने
पुन्हा-पुन्हा, ठामपणे उभा
राहतो.
“प्रयत्ने
वाळूचे कण रगडिता, तेलही गळे“ ही
समर्थ रामदासांची उक्ती
प्रयत्नांविषयी नेमका दृष्टीकोन स्पष्ट
करतेच परंतु त्यातून एक
वैज्ञानिक सत्यही सांगून जाते. कारण
वाळू म्हणजेच वाळवंटी प्रदेशातच
तेलाच्या खाणी मोठ्या प्रमाणात
आहेत. समर्थांनी वाळूचे कणांतून
अत्यंत खडतर, महाकठीण परिस्थितीचे
दिग्दर्शन केले आहे.प्रयत्नांची सफलता
म्हणण्यापेक्षा प्रयत्नांची कसोटी
ही वाळूच्या कणांना
रगडण्याइतकी महाकठीण असते.त्यामुळे प्रयत्नवादी
व्यक्ती आपल्या सफलतेविषयी फारसे
उत्सुक नसतात. कारण त्यांच्या
दृष्टीने प्रयत्न करणे हा
त्यांच्या कर्मधारणेचा, त्यांच्या सत्वगुणांचा
प्रभाव असतो. “प्रयत्न हाच
देव“
ही त्याची श्रध्दा, निष्ठा असते, व
अशी जीवननिष्ठा हीच
त्यांचे जीवनाचे सूत्र असते.
डार्विनच्या सिध्दांतानुसार मानवी जीवनप्रणाली, मानवाचा विकास
हा विशिष्ट अशा गूणसूत्राचा
अखंड, अविरत चालणारा प्रवास
आहे.ह्यालाच
उत्क्रांतीवादाचा सिध्दांत (Theory of Evolution) म्हणतात.
उत्क्रांतीवादाचा सिध्दांतचा जनक
म्हणून डार्विनचे महत्व
अनन्य असाधारण आहे, पण प्रयत्नवादाचा
सिध्दांत त्यातून अधोरेखित झाला
आहे.
ह्या संबंधातील एक
वचन म्हणजे Trial and error
constitutes what is called efforts.पण ह्याच्याही पलीकडे
जाणारी संकल्पना प्रयोगशीलता
होय.
निसर्गातील प्रत्येक
चराचरामध्ये प्रयोगशीलता असते, ज्यामुळेच
सतत बदल घडणे, हा आविष्कार
होत असतो. ज्याप्रमाणे वैज्ञानिक
प्रयोग करुन काही सत्य
प्रकाशात आणित असतो, त्याचप्रमाणे मानव
व निसर्गही प्रयोगशील असतो
व त्यातूनच उत्क्रांतीची बीजे
स्फूरण पावत असतात.
काही अत्यंत थोर
विभूतींच्या जीवनाचा, त्याच्या आत्मचरित्राचा
अभ्यास केला असता असे
दिसते की त्यांच्या कर्मविपाकातच
work is worship कर्म हीच पूजा हे
सूत्र आत्यंतिक प्रमाणात
विकसित झालेले असते. उदा.महात्मा गांधी, आचार्य
विनोबा, न्यूटन, आइनस्टाईन इ. आदर्शवादाला
जीवनात पूर्णपणे उतरविण्याचे
प्रयत्न हेच त्याच्या जगण्याच्या
सूत्र बनले होते.अध्यात्माच्या दृष्टीने
प्रयत्नवाद ही त्यांच्या मनाची
पक्की बैठक झाली होती.त्यामुळे
त्यांच्यामागे एक फार मोठी
पंरपरा (school of thoughts) व जीवनशैली
विकसित झाली.मानवी समूह
मनावर, वैश्विक भौतिकतेवर अत्यंत
मोठे संस्कार झाले व
अनेक पिढ्यांचा आदर्श
असा विकास घडून आला.एक
थोर वारसा मानवी भविष्यासाठी,
भवितव्यासाठी जपला गेला.
(१२) मनाची
प्रवृत्ती मी व माझेपण
जपण्याच्या दृष्टीने बाल्यावस्थेपासून विकसत केली जाते.त्यामुळे
आपल्याला मनाची संवय (conditioning) होऊन
जाते, आणि मनाच्या कक्षा
एवढ्या रुंदावतात की
मी तितका बाह्यावकाशीत होतो.परंतु
ज्याच्या मनाच्या कक्षा अरुंद
पावतात, संकोचित होतात, तो अंतरावकाशात
हळूहळू स्थिर होत जातो.ह्यापुढची
प्रगतावस्था म्हणजे मनाच्या कक्षांचा
लोप….मनाचं
अस्तित्व केवळ अणुमात्र होते.ह्या
अवस्थेलाच समाधि-अवस्था म्हणतात.
(13)माझ्या
मते आधुनिक विज्ञानाने मन अशी काही वेगळी गोष्ट आहे असं मान्य केलेले नाही. विज्ञानाने
मन हा एक भावनांचा, आठवणींचा, जाणीवांचा समूह आहे आणि मेंदूतच त्याचे अस्तित्व असते, असं
मान्य केलं आहे.म्हणजेच
मन हे भौतिकच असून त्याचे आकलन भौतिक मार्गानेच होऊ शकते.तरीसुद्धा
सर पेनरोज सारखे शास्त्रज्ञ Quatnum mechanics आणि मनाचा संबंध शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
वैदिक विज्ञानाने मनाचे दोन भाग केले आहेत. बाह्यमन
सगळ्या विकारांना आपल्यात सामावते आणि त्याचे कार्य पंचेंन्द्रियांमार्फत चालते.आधुनिक
विज्ञानानेही ही संकल्पना मान्य केली आहे.पण
मन ही स्वतंत्र अस्तित्व असणारी भौतिक गोष्ट नाही.मनाचा
दुसरा भाग म्हणजे अंतर्मन. वेदांनी
ह्याला सहावे इंद्रीय म्हणले आहे व ते
भौतिक आहे, असे
म्हणले आहे, पण
त्याचे अस्तित्व पंचेंद्रीयांना जाणवणारे नाही, कारण
ह्या मनाचे भौतिक कण प्रचंड उर्जायुक्त असतात. त्यांना
जाणून घेण्याची शक्ती इंद्रीयांमध्ये नाही.आधुनिक
विज्ञानात Dark energy आणि Dark matter ह्या संकल्पनांवर बरेच संशोधन चालू आहे.त्यानुसार
असे मान्य झाले आहे की, ह्या
उर्जा तसेच वस्तुमान आपण पाहू शकत नाही, पण
त्यांचे अस्तित्व मात्र नक्की जाणवते.ह्याखेरीज, असे सिध्द झाले आहे की, अवकाशांत
असणा-या black
holes मध्ये काळ अस्तित्वात नसतो.तसेच, black
holes मधील वस्तुमानाचा वेग प्रकाशापेक्षा कित्येक पटींनी जास्त असतो.ह्या
आणि अनेक सत्यांवरुन असे दिसते की, वैज्ञानिक
भौतिकता सुध्दा सापेक्ष आहे.
(14) According to Osho, the place of mind is there where we seek the answers to
what I am. For moving into this place, the first centre is body which must be
crossed through
yam,niyam,asan,pranayam& pratyahar. These tools of yoga help us to
penetrate through body into the mind.
After
crossing layer of body, we are ready to fathom mind which is inward journey.
Body is an outward journey. Dharana,dhyan,&
Samadhi are the constituents of a space that help us to penetrate into the
mind and to go beyond it.
The
analytical issues of body-mind complex are, thus, involved in the facts which
must be understood whether we can relate outside world with what we are. The
outer world is like our body. So, the body must be able to relate itself with
mind, that is the inner core…an inside of what we are. This is essential to
know because unless we try to relate the outside(body) with us(mind), it is
meaningless to try to relate ourselves(mind) with outside(body). And to understand
body-mind complex, perhaps the only vehicle for us, is sadhana, an uninterrupted abhyas/practice
of path shown by satguru.
(15)Mind
has four layers-
Basically,
we do mental auditing of everything in life, so that everything becomes
rationalized, logical and intellectually stimulating.
The mind is
a phenomenon that makes us what we are today than what we should be.
Traditionally, the past of centuries and our forefathers-mothers, have built up
the foundation of mind so much that we are conditioned through past and yet we
call t natural. We say, getting angry is natural. Osho says, No its not
natural, it is conditioning of mind: how to react.
The various
layers of mind are as below-
(1)
Conscious mind- Reasoning, thinking, decision, arguing, doubting,
Believing.
- There are
Teachers for students but no Satguru-
disciple.
(2)
Subconscious mind- The student meets Satguru and becomes disciple.
- Satguru gives initiation.
- Disciple feels affinity, harmony, and
affection for
Satguru but there is no surrender, complete
trust in
Satguru.
(3) Super
subconscious mind- Disciple surrenders, he takes “sanyas”
- Satguru is
constantly in touch with disciple
and protects
him and monitors his progress.
(4) Super
conscious mind- Disciple reaches the heights of Satguru.
-
Attainment fo Moksha
-
Death does not separate Satguru-disciple. Both
continue to
share experiences of each other.
Basically
mind is just like matter and for that matter, matter is also a mind. But mind
is an extremely subtlest matter, which you cannot see because it is not an
object like my own body although it is within my body. Except my mind,
everything inside my body can be seen as objects / organs, nerves, etc.
Therefore we can say matter is a gross mind.
(16)Dreaming
is a tremendous activity, more powerful than thinking, more meaningful also,
because it belongs to a deeper part of our thinking. During sleep subconscious
layer of mind functions. This is tiny, one tenth as compared to unconscious
which is very big, greater and powerful. But super conscious is infinite,
omnipresent, omnipotent and omniscient.
Dream is
generally of five types.
(1) It is conscious mind which collects lots of
rubbish and useless but occupies, almost 90%.
(2) This type is a sort of wish-fulfillment. The hundreds
of desires, expectations, and wants that we have from time to time remain unfulfilled
due to our inherent inabilities, dependence, limitations and
dogmas-superstitions, etc. These unfulfilled desires surface in subconscious
mind. Then, there are also expectations, negations, dogmas and rationalities
continuously suppressed by our conscious mind. The conscious mind always tries
to dominate us with rational, practical and needfulness. Small things which are
beautiful, pleasing, happiness and joyful are ignored with questions like “what
is the use of this? What is the purpose of this for me?” and so on. All these
desires become part of subconscious and surface in subconscious mind and
become part of dream. This type of dream, therefore, is a communication mix
from conscious as well as well unconscious mind.
(3) This is a type that is called super conscious
which knows no meaning. It knows basic needs of life like hunger, thirst, etc.
These wants are essential to remain alive but what is purpose and use of
living? Actually, the whole creation, the nature has no meaning, no use for
itself. With meaningfulness comes the purpose, the calculations, cunningness,
reason, division, competition and so on. Thus, this type of dream is a
communication from the super conscious mind.
(4) The fourth type of dreams come from past life due to
which we believe in reincarnation.
(17)Ritambhara is the name of consciousness and not of the
intellect, as it is being held and defined. “Rit” means the truth but it is not
a truth, that is logical conclusion. It is the truth of our innermost
being….the truth that needs no proof, no acceptance, no denial…it stands on its
own strength, unsupported because it does not need support. It does not need
any object or subject to support because it is by itself a global subject….the
God.
From “Rit”
comes out pradnya called Ritambhara which through its quality of “Rit”
manifests unconditionally to accept everything…..anything. In fact, Ritambhara
absorbs rather than accepts everything that is good or even bad, even poison
also. God Shankara is a symbol of “Ritambhara” with his absorption of
‘Halahal’, the poison.
(18)Modern science says that these four states
constitute what is called as mind. However, Vedic Science says that Mind is not
a physical entity. It can be felt and consciously experienced only by the
individual. So, mind is power house through which one can attain Godliness….a
Divine power.
Modern science says that mind can be accessed, though it not
physical entity, by certain devices like electrodes, sensors, etc which are
attached or embedded in brain and Central Nervous System(CNS).
On the basis of the scientific devices, modern science has
classified brain activity into four categories as given below-
(1) β (Beta)- state – 18-30 cycles/second-mind is awake,
fully active.
(2) α
(Alpha)-state-14-18 cycles/second- mind awake and also alert; but
passive in deep relaxation, meditative state.
(3) δ (Theta)-state-8-14 cycles/second-asleep, drowsiness,
alcoholic, blissfulness, passive, incomplete alertness.
(4)σ (Delta)
state-0-4 cycles/second-non functional, deep asleep, no dreaming.
(19)According to Vedic science, there is 5th state
of mind which is self witnessing stage. This is Samadhi state in meditation. It
is like a physical death in which Yogi may pass away into permanent death of
body, if he can’t recover to one of the above 4 states. In Sanjeevan Samadhi,
there is no return to above 4 states and body decomposes by natural process.
Samadhi state is a layer of super-conscious state of mind in
which “I” i.e. doer (कर्ता) is lost and the mind becomes witness
of the doer(कर्ता).
(20)Introspection and
self-remembering- These are two distinct phenomena of mind which think
within the faculty of intelligence. The thinking is thus based on collection of
knowledge through पंचेंन्द्रिये, अहंकार व चित्त. But according to Osho, self remembering
is not thinking, it is just becoming aware of self. In other words, it is ego
that prompts thinking as to what I am, with all that makes me aware as distinct
human being of personality and individuality. With self remembering, however,
there are three stages through which one passes. First stage is awareness of
the fact that a particular wave of say, anger, has arisen and passed. 99% it is
passed when I was not aware. It has just passed and at remaining 1% I come to
know that I was angry. So, now in second stage, I have become fully aware that
I was angry and I repent. This repentance is thinking. Osho says that where
there is repentance and thinking, there is no awareness. But in third stage, I
can see something like anger is coming, this is awareness. And when I am aware
of anger, it can’t come, it disappears.
(21) In vibhutipad sutra(3.9) Bhagwan Patanjali says
व्युत्थाननिरोधसंस्कारयोरभिभवप्रादुर्भावौ
निरोधक्षणचित्तान्वयो निरोधपरिणाम:!
The most subtle, the
subtlest phenomena that continuously goes on within the mind(i.e.चित्त)is called gestalt, a
very small gap between two thoughts. Mind remains always occupied by
innumerable thoughts. But between each thought, just like between two
breathings, there is a very small interval. This a gap, a space within which
this nirodh is there; its existence,
however, is only experienced by yogi. This experience is called nirodh parinam.
The mind of Yogi is permeated by nirodh, a phenomena in which there is
distinction an impression that is disappearing and the impression that is
appearing by taking, occupying its place. Mind is always and continuously
covered by clouds like thoughts. But mind perceives only one thought at a time.
One thought is perceived, and before knowing at ordinary level of understanding,
that thought goes to give a space for next thought. In between these two
thoughts, before second thought occupies a space of earlier, a vacant space
remains. This vacant space is called nirodh
and its perception, understanding at intellectual, physical level is what is
called nirodh parinam.
(22)
एक जीव दुस-या जीवाच्या
संदर्भात जी कृती किंवा
क्रिया करतो. ते कर्म- कारण
दुस-या
जीवाच्या संदर्भात केलेली
क्रिया पुढील जन्मातही पाठलाग
करते व प्रतिक्रिया म्हणून
प्रगट होते.म्हणून तिला
कर्म किंवा त्या प्रतिक्रियेला
“कर्मफल“म्हणतात. उदा. स्वत: पाणी पिणे
हे कर्म नव्हे, ती क्रिया
होय.
पण दुस-याचे पाणी
हिसकावून पिणे, हे दुष्कर्म
आहे.
तर तहानेने व्याकूळ झालेल्या
पाणी देणे, हे सत्कर्म
आहे.
(23)मनोव्यवस्था व प्रारब्ध- समाज,सामाजिक व्यवस्था,कौटुंबिक व्यवस्था, नैतिकता ई. सर्व नुसती बंधनेच नव्हे तर संस्कार
आहेत. ही एक सतत उत्क्रांत होत जाणारी नैसर्गिक क्रिया, व्यवस्था (evolutionary system) आहे. ह्या व्यवस्थे विरुध्द लढायचे कारण काय? माणूस ह्या व्यवस्थेला आव्हान का देतो? मला तर वाटतं, माणसं आव्हान देत नाहीत, ही व्यवस्थाच त्याला आवाहन करत असते.
प्रत्येक जीवाच्या स्वत:च्या अशा अनेकानेक व्यवस्था (management systems) असतात. माझी स्वत:बद्दल एक, स्वत:करीता एक, अशा व्यवस्था वेगवेगळ्या असतात.
ह्या वेगवेगळ्या व्यवस्थांचं मूळ प्रत्येकाच्या प्रारब्धात आहेच पण त्यापेक्षा त्या प्रत्येकाच्या identity मध्ये, स्वमित्वामध्ये, त्या त्या जीवाच्या अहंकाराच्या जाणीवांमध्ये असते व ह्या जाणीवा त्या त्या जीवाच्या जगण्याचा स्थायी भाव होऊन राहतात, त्या त्याच्या मृत्यूपर्यंत. नंतर ह्या जाणीवा वासनाकोष बनून पुढील जन्मात प्रगट होतात.
(24)माणसांचे मन म्हणजे मायेचा पसारा आहे. जग
मायोद्भव आहे, त्याचप्रमाणे मनही मायोद्भव आहे. जो पर्यंत मन आहे तो पर्यंतच जग
आहे. मन समाधीमध्ये शांत होते व मायेच्या बंधनातून, पसा-यातून समाधी अवस्था
संपेपर्यंत शून्यवत असते. पण शून्य होत नाही कारण समाधी उतरल्यानंतर मन पुन्हा
उदित, जागृत होऊन मायेच्या अंमलाखाली येते. मन नेहमी जगाकडे, बाह्य, बाहेर धावते.
म्हणून मनाला बहिर्मुख, चंचल, अस्थिर, अस्वस्थ, पण रजोगुणात्मक आहे, असे म्हणतात.
चित्त मात्र अंतर्मुख, आत, खोलवर चिंतन-मनन करणारे, काहीसं स्थिर, शांत असते. आपली
बुद्धी म्हणजे काय, ह्याचे उत्तर विज्ञानाने ब-याच मोठ्या प्रमाणात
मेंदू-मज्जासंस्था इ. अवयवांमध्ये शोधून निश्चित केले आहे. म्हणून बुद्धी म्हणजे
मनाला निर्णयात्मक, निश्चयात्मक करण्याचे कार्य करणारी संस्था आहे व सत्वगुणप्रधान
आहे. मानवी जगण्याचा चौथा तमोगुणप्रधान भाग म्हणजे मी-पणा, अहंकार. अशा प्रकारे
मानवी जीवनाचे अस्तित्वरूप चार भागात असलेले पण न विभागलेले आहे. काहींच्या मते,
मन-बुद्धी-चित्त-अहंकार मिळून जो संस्कार तयार होतो त्यालाच अंत:करण असे म्हणतात.
मन हा मायेचा अवतार असून सतत आपल्या शरीरावर अधिपत्य
राखून असतो. हे मन रजोगुणाच्या खांद्यावर बसलेले असते, पण बुद्धी आणि अंतरात्मा /
आत्मस्वरूप यांच्या मध्ये अडसर बनून जीवाला सदैव मायेच्या बंधनात अडकवून ठेवते.
जीवाला मनाच्या बंधनात ठेवण्यासाठी इंद्रिये आहेत म्हणून इंद्रिये ही मायेचाच
प्रताप आहेत, असे म्हणले जाते, ते योग्यच आहे. उदा. डोळे पाहतात व मन, बुद्धी,
चित्त व अहंकार एकत्रितपणे डोळ्यांना काय बघत आहोत, ह्याचा अर्थ सांगतात, ज्ञान देतात.
जोपर्यंत इंद्रियांशी ह्या चतुष्टयाशी संयोग होत नाही तोवर इंद्रिये अर्थशून्य
असतात, क्रियावान नसतात.