कामवासनेची नाती
सेक्स ही निसर्गाने
निर्माण केलेली शृंगारिक तत्वशक्ती आहे. ही तत्वशक्ती वासना (passion), आकर्षण (attraction) व भावबंध किंवा नातेनिष्ठा
(attachment) अशा त्रिमितीमध्ये उत्क्रांत होत गेली. विज्ञानाच्या दृष्टीने वासना
निर्मिती मेंदूतील hypothalamus ह्या भागावर testosterone व dopamine ह्या रसायनांचा स्त्राव झाल्यामुळे होते. परस्पर
आकर्षण मेंदूतील medial insula, blobus pallidas, caudate nucleus, VTA ह्या भागांवर dopamine, oxytocine व serotonin ह्या रसायनांचा स्त्राव झाल्यामुळे निर्माण होते. ह्यापैकी
oxytocine ह्या द्रवामुळे कामचैतन्य
वाढते तर serotonin मुळे कमी होते. नातेबंधामध्ये ventral pallidam ह्या भागावर vajopressin ह्या रसायनांचा प्रादुर्भाव कितपत आहे ह्यावर
नात्याची
घनिष्ठता अवलामून
असते.
ह्यावरून स्पष्ट होते की सेक्स म्हणजे
केवळ संभोग किंवा वीर्य विसर्जन क्रिया नसून मानवासह सर्व प्राणी जगतातील मुलभूत
जीवन संहिता आहे. वासना निर्मिती क्रिया व नंतर घडणारी अथवा न घडणारी संभोग क्रिया
ह्यामध्ये मेंदूतील ‘Nuclues ecumbance ह्या भागावर oxytocine ह्या स्त्रावाचा
परिणाम घडून आनंद, सुखद ग्लानि, वेदनारहित स्थिती व मन:शांती ह्या मानसिक व
शारीरिक क्षणांची अनुभूती येते. त्यामुळे न जाणवणारे किंवा न जाणवणारे ताण कमी
होतात अथवा नष्ट होतात.
रक्ताभिसरणातून oxytocine हार्टपर्यंत गेल्यावर तेथील
कप्प्यातून atrial nutri-uretic
peptide हे रसायन उत्पन्न होते.
हे रसायन व oxytocine हे रसायन ह्यांच्या
सहाय्याने Nitric oxide हे रसायन तयार होऊन
हार्टच्या रक्तवाहिन्या रुंद होतात व हार्टला अधिक प्रमाणात रक्त पुरवठा होतो.
अशाप्रकारे एक प्रकारच्या नैसर्गिक Angioplasty ची क्रिया घडते. म्हणजेच असे की सेक्समुळे हार्ट बळकट
करण्याची प्रक्रिया घडत असते.
Oxytocine चा उपयोग हाडांच्या व अस्थीपेशींच्या तसेच
त्वचेच्या collegene ह्या घटकाच्या निर्मिती व
मजबूतीसाठी होतो. ह्याखेरीज, Oxytocine चा Anti-aging factor म्हणूनही उपयोग होतो.
*****************
No comments:
Post a Comment