Friday, 1 August 2014

श्रद्धा

                                                   

(१) जीवनाला आधारभूत असणारा आणि जीवनातील विविध व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक वाटणारा एखादा अढळभाव व्यक्तिजीवनात असेल, तर त्याला श्रद्धा हे नाव देता येईल. माणसाचे व्यक्तिमत्व, अस्तित्व आणि अस्मिता यांचा समन्वय साधणारा कोणताही भाव श्रद्धा हा संज्ञेस पात्र ठरतो. रवींद्रनाथ टागोर श्रद्धा ही एक भावना आहे असं म्हणताना लिहितात-“श्रद्धा ही सुखद आशावादाची सनई आहे.”
          अंधश्रद्धा म्हणजे काय, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे-“श्रद्धेवर स्वार होऊन विवेक व बुद्धीला जवळ न करणे.” विवेक व बुद्धी ही प्रयत्नवादाची प्रमुख साधने. पण श्रद्धा म्हणजे प्रयत्नवादाच्या विरोधी भूमिका नव्हे. कारण श्रद्धासुद्धा प्रयत्नपूर्वक ठेवली पाहिजे. तौलनिक विचार, विवेक आणि व्यवस्थापन कौशल्य ह्यांच्यासह श्रद्धा जपली पाहिजे. कारण लौकिक सत्याची स्वाभाविकता ईश्वरी तत्वांशी विसंगत नाहीयेय. म्हणूनच श्रद्धा व श्रद्धेय काय असले पाहिजे याचे साक्षेपी मार्गदर्शक सद्गुरू असणे, ही अध्यात्म साधनेची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे. गुरुगीतेमध्ये भगवान शंकरांनी म्हणले आहे-

              दुर्लभम त्रिषुलोकेशु तत शृणुश्व वदाम्यहं |
              गुरुम विना ब्रम्ह नान्यत सत्यं सत्यं वरानने ||

तिन्ही लोकांत दुर्लभ असे हे साधन आहे, ते मी तुला सांगत आहे. (पण लक्षात ठेव) हे पार्वती, गुरु शिवाय ब्रम्ह(ज्ञान) मिळणे अशक्य आहे; हे सत्य आहे, हे सत्य आहे.

              गुरु हा मार्गदर्शक असतो, पण तरीही प्रत्येकाला आपल्या आपल्या जीवनाच्या केंद्राकडे जाताना मी कोण आहे?’ हा शोध घेणारा भाव, असा शोध घेणारी विचारधारा म्हणजेच श्रद्धा होय. म्हणूनच श्रद्धा व्यक्तीनिष्ठ असते; ती सामाजिक, राजकीय, साहित्यिक, किंवा कौटुंबिक पातळीवर, पटलावर आणि परिमाणामध्ये सामावणारी व्याख्या नाही. ती असते एक तरी ओवी अनुभवावीअसे म्हणणारी ज्ञानदेवांची अनुभूती असते
                        ************

Sunday, 29 June 2014

इतिहास: समाज-सुधारणा आणि राजकारण-एक अभ्यास

                                     

इतिहास म्हणजे केवळ घटना आणि त्याचा आलेख नव्हे. माझ्या दृष्टीने इतिहास म्हणजे एक वैचारिक कालखंड....त्यामधील समाज-रचना, आदर्शवाद, नीती-नियम, न्याय-संस्था इ. घटकांची मींमासा होय.
लो.टिळक, गोपाल गणेश आगरकर, गोपाल कृष्ण गोखले, न्या रानडे ह्यांचा काळ म्हणजे राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विचार- आचारांचे अभिसरण होते.
             
                 इतिहासकार राजवाडेनी ह्या कालखंडातील लो.टिळक आदि विचार-आचारवंतांच्या आणि समाजसुधारकांच्या आणि नेत्यांच्या जीवनपटाचा सखोल अभ्यास करून जे निष्कर्ष काढले आहेत ते आजही लागू आहेत. लो. टिळकांनी स्वातंत्र्य आणि स्वराज्य ह्या आपल्या संकल्पना विकसित केल्या, आणि त्यांना राजकीय आणि राजकारणासाठी सक्षम क्षेत्र मानून त्याप्रमाणे आपली जीवनप्रणाली बांधली. धर्म आणि समाज-सुधारणांना त्यांनी गौणस्थान दिले आणि समाज-सुधारकांशी ब-याच मोठ्या प्रमाणात "वैर" संपादन केले. पण त्यांच्या मनात आगरकर -रानडे-गोखले ह्यांच्या बद्दल वैरभाव मात्र नव्हता.

                लो.टिळकांनी धर्म आणि धार्मिक-सामाजिक आचार-विचारांना फारसा धक्का न लावण्याचे तंत्र विकसित करताना समाज-सुधारकांशी  "वैर" पत्करले. कारण त्यांच्या मते स्वातंत्र आणि स्वराज्य मिळवायचे असेल तर लाकानुनय, बहुमताचा कौल आणि तत्संबधित जहाल रेटा (aggresive pull & push) आवश्यक होता. लो.टिळकांना धार्मिक-समाजिक सुधारणा नको होत्या, असे नव्हते. पण ह्यासाठी त्यांना ब्रिटीशसत्तेची लुडबुड नको होती आणि बहुसंख्य समाजाला दुखवायचे नव्हते. त्यासाठी त्यांनी कमालीची जहाल भूमिका घेतली. पण त्यामुळे त्यांना आगरकरांसारख्या जिवलग मित्राचा बळी द्यावा लागला. एव्हढेच नव्हे तर आपल्या कुटुंबियांच्या कल्याणकारी स्वास्थ्याचाही कठोरपणे त्याग करावा लागला.

           इतिहासकार राजवाडे ह्यांच्या मते लो.टिळकांची ही भूमिका आणि त्यांनी आचरण केलेली जीवनप्रणाली ज्या कर्मवादाच्या सिद्धांतावर आधारित होती, तिची व्यापकता अध्यात्मिक अंगानी जाणारी होती तरीही ती त्या काळापुरतीच मर्यादित होती आणि तेव्हढ्यापुरतीच यशस्वी झाली. स्वातंत्र्य व देशप्रेमाचा उठाव आणि क्रांती  म. गांधीच्या प्रेरणेने आणि कार्यांनी झाली, हा इतिहास आहे. लो.टिळक, स्वा. सावरकर. सुभाषचंद्र बोस, आणि अनेक हुतात्मांचे बलिदान ह्याच्यामुळे पायाभरणी झाली. इ.राजवाडेनी ह्या मीमांसेकारिता समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज यांच्या अन्योन्य आणि समन्वयवादी संबंधांचा आणि तत्कालीन राजकारण ह्यांचा उपयोग केला आहे. त्यांच्या मते संत संप्रदाय आणि समाज-सुधारकांनी सामाजिक व्यवस्था विस्कळीत केली. त्यामुळे परकीय सत्तांना आपले स्थान मजबूत करता आले.

            शिवाजीराजेंच्या काळात समर्थ रामदासांनी मात्र कडव्या धार्मिक परंपरावादाला धक्का न लावता स्वातंत्र्य आणि स्वराज्य स्थापनेला सक्षम मदत केली. गोसावी-बैरागी-कीर्तनकार इत्यादींचे जत्थेच्या जथ्ये निर्माण करून त्यांना राजकारणाच्या आखाड्यात आणले; शिवाजीराजेंचा राज्य-शकट चालविण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांना राज्य-व्यवस्थेमध्ये मानाचे स्थान दिले. नंतरच्या काळातही न्या.रामशास्त्री प्रभुणे आदिंनी राज्य आणि न्याय व्यवस्थेमध्ये मोलाची कामगिरी बजावली आणि हे सर्व करताना त्यांना समाज-रचनेची मोडतोड करावी लागली नाही. मुसलमानांना शह देण्यासाठी समाजाला प्रवृत्त केले. समाजसुधारकांप्रमाणे समाज-रचनेला काव्यात्मक-भावनिक न्यायाची बिरुदावली लावावी लागली नाही की त्याकरिता आंदोलने करावी लागली नाही; धार्मिक-समाजिक परंपरांना आव्हानं द्यावी लागली नाहीत. जाती-वर्णभेदासहित असलेली समाज-व्यवस्था आणि रचना यांची मोडतोड करावी लागली नाही. किंबहुना अशा समाजाला परकीय सत्तेबद्दल आक्रमक आणि लढाऊ बनविण्याच्या प्रक्रियेला समर्थांच्या शिकवणुकीचा प्रचंड लाभच झाला.
(आधार-"रानडे विरुद्ध राजवाडे" डॉ सदानंद मोरे. सकाळ साप्ताहिक ५.७.२०१४.)
                                                   *************


Monday, 23 June 2014

मी आणि आपण सर्व


प्रास्ताविक:
 बदल हा काही केवळ निसर्गाचा नियम नाही, तर सर्वांगाने सारखं बदलणं हा जीवनाचाच धर्म आहे. हे तत्त्व म्हणून ठीक असलं तरी माणसाच्या, व्यक्तीच्या जीवनातले बदल खूपच घडवत-बिघडवित असतात. नव्या बदलांना उत्साहाने स्वीकारण्याचं धैर्य, उमेद सर्वांच्यात असतेच, असं नाही. मुख्य म्हणजे, मावळतीमध्ये (वयोवृध्दी होत असताना) हे बदल स्विकारणं राहुद्या, पण पचविणं खरचं अवघड, दु:प्राय्य होतं. कारण, हे घडणारे बदल केवळ स्वाभाविक म्हणून सोडून देण्याइतकी सहजता आपल्यात नाही. दर दोन पिढ्यांमध्ये विचार-आचारांचे अंतर ( Generation gap) असते, तसे हे अंतर नाही. स्वाभाविक प्रेम, वात्सल्य, आदर ह्यांच्या संकल्पनाच इतक्या बदलल्या आहेत की आपल्या संकल्पना चुकीच्या आहेत, असं वाटावं, इतकी आपली दुर्दशा झाली आहे. आणि आपणच कालबाह्य झालो आहोत. ह्या आणि अशा अनेक संभ्रमात आपण फरपटतो आहोत?
(१)        जेष्ठांचा आदर, सेवा, सांभाळ, कनिष्ठांसाठी माया, वात्सल्य, आणि सर्वांसाठी त्याग ही आदर्श जीवनाची चौकट, बांधणी होती. पण आज असे घडताना दिसत नाही. उलट, जेष्ठांचा अनादर, अपमान, कुचंबणा, कुतरओढ, फरपट ही जगरहाटीच होत असल्याचं पाहिल्यावर, अनुभवल्यावर जाणवतं…….शरीर तर थकले आहेच, पण त्यापेक्षा मन जास्त थकत चाललंय.
(२)        आपल्याच मुलाच्या-मुलीच्या घरात आपण परके, उपरे आहोत, असं वाटणं, ही आपलीच शोकांतिकाच नाही कां?
(३)        ह्यावर काय उपाय? तीन अक्षरांचा मंत्र-
 ICE Mantra-Ice means coolness, शांत रहा, विचार-विवेक आपोआप मनात हळू-हळू पाझरु लागेल. अशांतता, राग, आले की लगेच प्रतिक्रिया देऊ नका. कारण हा राग, ही अशांतता मला आलेली आहे. कोणामुळे, कशामुळे आली, हे महत्वाचे नसून मी disturbed झालो आहे, राग मला आला आहे, म्हणजे माझ्या रागाच्या कारणापेक्षा, बाहेरील कारण महत्वाचे नसून, मला त्रास होतोय, माझ्याच रागवण्यामुळे, हे लक्षात घेतलं, तर माझ्या रागाला दुसरे, बाह्य कारण नाहियेय, हे आपले आपल्यालाच समजून घेण्याकरिता, प्रतिक्रिया देता, शांत रहा. आपल्या विचारांना, आपल्या मनाला वाव द्या….हळू हळू विवेक जसा-जसा जगऋत होईल, तसतशी आपली आपल्याला समज येऊ लागेल. समजूतदारपणा वाढीस लागेल मला राग येणं, हे माझ्याच हातात आहे, हे ही कळू लागेल. पण let me be patient, don’t let me be impatient; have patience like a “patient” who needs Doctor. Let me be my own Doctor, if I am convinced that Anger is disease….dis-ease; I am not at ”ease”, so I am dis-eased, and only treatment that I must give to myself, is to be cool, शांत रहा, रागाऊ नका, आपल्या मनाला विचार करण्यास अवधी द्या. हळू हळू विवेक जागृत होईल मी विवेकशील होऊ शकतो, असा आत्मविश्वास आपल्यात येऊ लागेल.

विवेक जागृती पुढील तीन सूत्रांच्या आधारांनी विकसित करता येते.

I-      Importance  - Don’t give too much importance to anyone.
 कोणाला किती महत्व, अग्रक्रम द्यायचा, ह्याचे भान ठेवा.
   C-    Comparison- Don’t compare yourself with anyone.
स्वत:ची तुलना कोणाशीही करु नका, दुस-याचीही तुलना स्वत:शी किंवा इतर कोणाशीही करु नका. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. “पिंडे पिंडे मति: भिन्न:“हे वेदांनी उद्घोषित केलेलं सूत्र मंत्रासारखं मी सदैव जपतो माझ्यासह ते सर्वांना लागू आहे, हे मला योग्यप्रकारे जाणवलं आहे, ह्याची मला खात्री आहे किंबहुना मी ह्याचा प्रयत्नपूर्वक अनुभव घेतला आहे, अभ्यास केला आहे तद्नुसार माझ्या जाणीवा विकसित होत आहेत, समृध्द होत आहेत, हे माझं मलाच दिसतं आहे.
   E-    Expectation- Don’t expect anything from anyone.
कोणाकडून काहीही अपेक्षा करु नका.
(4) मुलांमध्येच नव्हे तर एकंदरीत तरुणवर्गात जेष्ठांबद्दल दिसणारा तुसडेपणा, तुच्छता, दुष्टावा टिंगलखोरपणा ह्या गोष्टी त्यांच्या तशा भावना, वागणूक ह्या आपल्या चिंताच नव्हे तर माणूसकीपासून दूर जाणा-या तरुणांना त्यांच्या भवितव्याबाबत धोकादायक ठरणा-या आहेत, असं वाटतं एक प्रकारची भीती प्रचंड दडपणात्मक काळजी वाटू लागते.
(5) वृध्दाश्रम ही काळापेक्षा माणसाची गरज बनावी, ही वस्तुस्थिती परिस्थितीजन्य नव्हे तर मानवनिर्मित आहे. आर्थिक स्थिरता, संपन्नता माणसाला माणसापासूनच दूर नेत आहे, असं वाटण्याइतकी भीषण नक्कीच नाहीयेयं. पण अर्थकारणाच्या दुष्परिणामांचे दिग्दर्शन मात्र ह्यातून होत आहे, असं दुर्दैवाने म्हणावं लागत आहे. लहान मुलांची अनाथालये वृध्दांचे वृध्दाश्रम एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीत का? निदान अनाथालयातील मुलांना उज्वल भविष्याची स्वप्ने तरी जगण्याची उमेद देतात. पण वृध्दाश्रमातील जेष्ठांना भविष्यातील अंधार भूतकाळातला कडवटपणा घेऊन जगणे भाग पडते.
(6) असं सगळं असूनही जेष्ठांना आपल्यात, समाजात सामावून घेणारी माणसंही दिसतात. तुरळकपणेच का होईना पण भेटतात. म्हणूनच प्रश्न पडतो, आपली कुटुंब-व्यवस्था, समाज-व्यवस्था अवस्था वृध्दांच्या बाबतीत खरंच एवढी निष्ठूर, उदासीन का झाली आहे?
(7) एकूणच जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेनंतर गेल्या दिड-दोन दशकातील मध्यमवर्ग नवश्रीमंत वर्गात वेगाने जात आहे. ह्याची झिंग तरुणवर्गात आहेच. हे जेष्ठांना समजून घेणं कठीण जातं आहे……तरीही वृध्दावस्थेतील एकाकीपण ही सनातन गोष्ट आहे. शंकराचार्यांच्याअगं गलितं, पलितं मुण्डंपासून तुकाराममहाराजांच्याबाइलीच्या गोता आवडीने पोशी, मातापितयासी दण्डयितो….“ अशी वर्णने आहेतच की.
(8) बाल्यानंतर तारुण्याचा स्वीकार निसर्गनियम म्हणून जितक्या उत्साहाने, सहजपणे होतो. तितका तारुण्यानंतर वृध्दावस्थेचा स्वीकार सहजपणे होत नाही, हेच खरं. मग मूळ दुखणं स्वीकाराचं आहे की काय? हे ही तपासून घ्यायला हवं.
(9)“ कौशल्य, ध्येय आणि व्देष ह्याची तहान भागवायची, विवेकाने.
  जोपर्यंत दुर्बलता बनत नाही शक्ती, तिमिर बनत नाही प्रकाश,
  माझ्या चुका सुधारुन होत नाही बरोबर, तोपर्यंत.“
(10) यश पदरी पडलं, तर माझा अहंकार का फुत्कारतो?
      आणि अपयश आलं तर ते पचवता, माझी सूडबुध्दी का जागृत होते?
                  ध्येय मागे पडतं आणि यशस्वी माणसांच्या व्देषानं मन पेटून का उठतं?
       सूडबुध्दीच ताकद, शक्ती, अधिकार का वाटू लागते?
  (13) पण आजच्या तरुण पिढीकडे पाहतो. तेव्हा दिसतं, झालं-गेलं विसरुन जाणे म्हणजे त्यांना कमीपणा वाटतो. विसरत नाहीतच, उलट मनात अढी ठेवतात, खुन्नस ठेवतात. संधी मिळताच आपला राग,व्देष,तिरस्कार व्यक्त करतात. तसं करताना कोणाचा काय किती अपमान आपण करतोय, ह्याचा ना विचार ना खंत! ह्या तरुण पिढीला स्वत:चा स्वाभिमान, स्वार्थ कसा जपयाचा, हे बरोब्बर कळतं. आलेल्या संधीचा पुरेपूर, ओरबाडूनही फायदा कसा घ्यायचा हे कळतं. त्याकरिता त्यांना भरपूर वेळ आहे. पण दुस-याला समजून घेणं, मिळत-जुळतं घेणं, क्षमाशील असणं, घडलं ते मागं टाकून पुढे पाहणे, चूक झाली तर सुधारायची म्हणजे तीच चूक पुन्हा घडण्यासाठी जागृत राहणे, त्यापासून धडा शिकणे….ह्या ह्यासारख्या असंख्य स्तुत्य, सुयोग्य विधायक विचारांसाठी, विवेकशील वर्तनासाठी मात्र ह्यांच्याजवळ वेळ नाही. विवेक म्हणजे काय, सहनशीलता, क्षमाशीलता, सहिष्णुता म्हणजे काय, हे कळत नाही समजून घ्यायची तयारीच नाही. त्यासाठी ह्यांच्याजवळ वेळ नाही!
(14) माझी पिढी बरीचशी एकत्र कुटुंबात वाढली. घरात पाच-सहा माणसं सहज नेहमी असायची. संकटं, आपत्ती, दु:खं आणि सुखंसुध्दा वाटून घ्यायची. सगळं काही निवारुन नेणारी, पाठबळ देणारी, दिलासा देणारी जेष्ठ, वृध्द, अनुभवी माणसं असायची. अशा वातावरणात मन, बुध्दी आणि माणूसकी ह्यांचा विकास करणारी संवर्धन करणारी शक्ती वास करीत होती. एकटेपणा, एकाकीपणा सहसा कधी आला नाही. त्यामुळे मला वाटतं, आजच्या पिढीत जो स्वार्थ, अप्पलपोटेपणा, सुडबुध्दी आढळते तीच त्यांना आज समाजात सतत चाललेल्या स्पर्धेला, स्वार्थाला, फसवणूकीला तोंड देण्यास समर्थ बनवित आहे काय? साहजिकच आपणच आपलं कवच होणं, त्यांना आवश्यक झालं आहे काय? पूर्वी नात्या-गोत्यात, जवळचे-शेजार-पाजारचे मध्यस्थी करायचे, सगळ्या बाजू ऐकून एकोपा करत. आजकाल तडजोड, मध्यस्थी करायला कोण करतोय, कुणाला वेळ आहे आणि मी बरा, माझं बरं, अशा मनोवृत्तीच विकसित केल्या जातायत संवर्धितही केल्या जातायत. कुणाच्या भानगडीत पडू नका, ही शिकवण लहानपणापासून दिली जात आहे. एव्हढेच नव्हे तर हा शिक्षणशास्त्राचा, प्रतिष्ठितपणाचा आणि सुशिक्षितपणाचा तो मानदंड बनला आहे!
(15)आज जी काय मध्यस्थी दिसते आहे ती स्वार्थी, राजकारणी, आपमतलबीपणाची. त्यामुळे आजच्या पिढीला सतत सतर्क, डोळस शहाणं राहणं आवश्यक झालं आहे. भाबडेपणा, साधेपणा, सरळपणा ह्या र्निवाज्य, सुंदर, निखळ गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत. त्यामुळेच आजची पिढी उमलत्या वयातच खंबीर, कणखर, धोरणी, धाडसी झालेली दिसते. त्यांना झालं-गेलं विसरुन जाणे परवडत नाही!
(16)अशी ही वेळ, असा हा काळ का आला आहे? एकत्र कुटुंबव्यवस्था मोडीत निघाली. आधारवड उन्मळून गेले. अंगावर उन्हाचे चटके, पावसाच्या सरी कोसळल्या, वादळ-सोसाट्याचा वारा, पावला-पावलांवर ठेचा, टक्के-टोणपे खावे लागतात. हे माणूस म्हणून घडण्याच्या दृष्टीने चांगलं झालंय, पण टाकीचे घण-घाव बसल्याशिवाय मूर्ती घडत नाही, हे जितके खरं आहे, तितकंच हे खरं सत्य आहे की मूर्तीत प्राण-प्रतिष्ठा अशामुळे होत नसते. त्याकरिता, मूर्तीकाराची सजीव, सुकोमल, सृजनशीलता लागते. आज आपण ही प्राणप्रतिष्ठा, जिवंतपणाची खूण, जाण, जबाबदारी, सृजनशीलता, क्षमाशीलता, सहिष्णुता आपण जपत आहोत की नाही, ही खरी समस्या आहे.
(17)विभक्त कुटुंबपध्दतीत व्यक्तिस्वातंत्र, सत्ता, स्वाभिमान, स्वत्व जपलं जातं आणि बोकाळलंही जातं. अनिर्बंध वागणं, स्वैर वागणं म्हणजे स्वातंत्र्य अशी विचारसरणी अंगात मुरली की माणूस स्वार्थी, संकुचित, कोत्या प्रवृत्तीचा स्वयंकेद्रित, क्षुद्र, एकांगी मनोवृत्तीचा बळी होतो. भल्या-बु-याची, नीती-अनीतीची तमा नाही आणि पर्वाही राहत नाही. स्पर्धा, यश, मान-मरातब, पैसा हेच जगणं होतं. ज्या समस्या आज पाश्चा्त्य देशांना, अतिविकसित अमेरिकन, युरोपिय देशांना भेडसावत आहेत, त्याच समस्या पण त्यापेक्षा अधिक प्रचंड स्वरुपात आपल्याला भिडताना दिसता आहेत.
(18)अशा ही विपरित समाज-अवस्थेत अनेक तरूण सच्चेपणानं धडपड करतात, अपरंपार कष्ट-मेहनत करतात, शिक्षणासाठी, ज्ञानासाठी, ध्येयासाठी, आपल्या आवडी-छंद-खेळ, क्रिडा, मनोरंजन इत्यादी असंख्य क्षेत्रं पादाक्रांत करत आहेत. रोज वर्तमानपत्रात वाचायला मिळतं, अमक्या-तमक्यानं बेहिशेबी इतक्या कोटींची माया जमवली, क्वचित जप्त होते. पण कालांतराने हीच माणसे उजळ माथ्याने फिरताना दिसतात, लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. हे सगळं तरूण मनावर कोणते, कसले संस्कार करणार? बेदरकार, बेपर्वा, निर्बुध्द, निलाजरी, निर्ढावलेली मन तयार झाली तर कोणाला अपराधी म्हणायचं?
(19)निकोप दृष्टी म्हणजे कोप नसलेली, वाईट काम, दुष्कृत्ये, अनिती पाप कर्मांमुळे येणा-या रागालाही अंकीत करणारी दृष्टी. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की पापकर्मांमुळे राग येऊच नये. राग यावा आणि येतोच. पण त्याबरोबर पापकर्म मुळातच का घडले, ह्याचा सामाजिक, राजकीय,किंवा आर्थिक पातळीवर निकषांवर धांडोळा घेता, भूतदयात्मक, वैयक्तिक, करुणा-भावपूर्ण आढावा घेणे तद्नुसार वागणे, हीच खरी निकोप दृष्टी.
वसुंधरा पेंडसे-नाईक ह्यांनी निकोप दृष्टी एका सुंदर गोष्टीद्वारे स्पष्ट केली आहे. एका घराच्या तळमजल्यावरील खिडकीतून एकाने स्टीलचा डबा चोरला. पण तो चोरुन नेताना तो पकडला गेला. लोकांनी कूप मारले-बडवलं तो स्टीलचा डबा- जो त्या घरातील एका छोट्या मुलाचा शाळेचा जेवणाचा डबा होता-तो त्या मुलाला त्याच्या वडिलांना लोकांनी परत केला. डबा घेऊन जात असताना तो लहान मुलगा बाबांना म्हणाला,“बाबा, ह्यातील पोळी-भाजी मी त्या माणसाला देऊ का?“ तो माणूस मारहाणीमुळे विव्हळत पडला होता. त्याला त्या मुलाने डब्यातील पोळी-भाजी खाऊ घातली. तो माणूस बिचारा ढसढसून रडू लागला. तो भुकेलेला होता, त्यामुळे त्याने चोरी केली होती.
त्यामुलाकडे ह्या घटनेकडे, चोरीकडे, चोराकडे पाहण्याची जी दृष्टी आहे-तीच निकोप दृष्टी नाही का?
(20) “All animals are equal, but some are more equal than others”
                                       Gearge Arvel in “Animal Firms”
लोकशाहीमध्ये काहीजणांना केवळ त्यांच्या अधिकारामुळे इतरांपेक्षा अधिक कायदेशीर (आणि बेकादेशीरही) फायदे मिळतात. नगरसेवक, आमदार, खासदार, सनदी (आणि असनदीसुध्दा) अधिकारी,निवृत्त राष्ट्रपती, निवृत्त पंतप्रधान इत्यादी असंख्यजणांना असे फायदे मिळतात. ह्या फायद्यांवर हेच लोक स्वत:चे कायदेशीर (आणि बेकायदेशीरही) धंदेचालू करतात. अनेक ठिकाणी असे फायदे मिळविलेल्या बाबींचा उपयोग अनागोंदी, अनाकलनीय, राष्ट्रविघातक, अनैतिक सरंजानशाही पध्दतीचे धंदे, उद्योग, व्यवसाय करण्याकरीता केला जातो. ह्या वास्तवतेला कोणी आणि कसे रोखायचे? अण्णा हजारे लढताना दिसतात. त्याचबरोबर त्यांना उध्दट, उर्मटपणे निर्लज्जपणाने विरोध करणारे, त्यांच्या लढ्यात काड्या घालणारे, खोडसाळ पत्रकार, राजकारणी मात्र असंख्य आहेत, हे दिसतं. पण अण्णांसारखे असंख्य लढणारे भूमिगस्त होतात, नष्ट होतात, नष्ट केलेले दिसतात, ह्या वास्तवाचे काय करायचे? कथा-कादंब-या, कविता लिहायच्या, राजकीय बोंबाबोंब करायची की हताश होऊन गप्प बसायचं?
(21) “सुप्रभातशुभप्रभातह्यात काय फरक आहे? शुभप्रभात ह्या सद्इच्छेत पवित्रता, पावित्र्य सामावलं आहे, तर सुप्रभात ह्यात केवळ सद्इच्छा आहे. म्हणून मला वाटतं, “शुभप्रभातप्रत्येकाच्या दिनक्रमात यावी, अशी शुभेच्छा करायला कोणाचीच हरकत नसावी. नव्हे नसणारच. पण अशी शुभेच्छा करणारा घेणारामीकाय देवदूत आहे की देवमाणूस आहे? माझा अधिकार म्हणण्यापेक्षा माझी लायकी ती काय की मी स्वत:चा स्वत: देवमाणसाचा पुरस्कार करुन घ्यावा दुस-यांनाशुभप्रभातच्या खिरापती वाटाव्या?
         म्हणूनच मी कोणी देवमाणूस नाही, ह्याची मला खात्री असल्यामुळे मी दुस-यांकरीतासुप्रभातएव्हढीच सद्इच्छा करतो. कारण दुस-यांना तुमची सकाळ पावित्र्यपूर्ण जावो, अशी सदइच्छा करण्यासाठी मी स्वत: पवित्र असलो पाहिजे, तरच माझी सद्इच्छा नुसती अर्थपूर्ण होऊ शकते, एव्हढेच नव्हे तर ती सफल सुफलदायक होऊ शकते.
           
(22) सामुहिक निर्णयाला व्यक्तीच्या संवेदनपटलाचा आधार नसतो, हे समाजमनाच्या विशालतेचे द्योतक मानायचे की व्यक्तीनिष्ठ समाजमनाचे दौर्बल्य समजायचे?
    The fact is that collective wisdom has become devoid of sensitivity for an individual who finds himself landed in injustice. While meeting the ends of justice for larger issues of social cause, injustice on an individual is an inevitability or loss of base of society / organization in an individual personality.
                   The cardinal principle of Law-“institution is lengthened shadow of an individual” Is this invalid in modern society? Collective wisdom by itself is a concept which denies the platform of sensitivity for the cause and needs of an individual; and that is why it is impersonal although it seeks to achieve goals of the welfare of society which is made of individuals.
                   This is a paradox. But it can be and should be reconciled if we seek to understand vedic principle-“There is always unity in diversity and also diversity in unity.” A common denominator always exists to reconcile individual needs with social justice and vice versa. This is the truth supported by “n” number of proofs from world history. The great saints, leaders, emancipators like A Lincoln, Mahatma Gandhi, Gondavalekar Maharaj, Samarth Ramdas Swami, Shivaji Raje, etc have not only influenced but have become living legends of revolution and also evolution of mankind.
          Socialism, Maoism, Naxalism, Communism, etc. all these concepts and their application in political system have failed because all these have ultimately landed up in violence and dictatorships. Therefore, though not fully satisfactory but better system is democracy in which individual counted as entity and also centre of development, welfare state and a focus of humanitarian justice.
(23) स्वार्थीपणा मीमाझेह्या परिघातच सदैव असतो. ह्या मीमाझेपणाला बाहेरच्या जगातून कधीही व काहीही धक्का किंवा धोका असू शकतो, ही भीती असतेच त्यामुळे स्वार्थ व भीती ही जोडी अभेध्य ठरते. त्याचप्रमाणे, नि:स्वार्थ व निर्भयता ही जोडीही सिद्ध होते. हा स्वार्थीपणा, भीती, अहंकार हे एकाच जन्माचे वैरी नाहीत. तेव्हा त्यांना नियंत्रणाखाली आणावयाचे तर त्यांच्यापेक्षा बलिष्ट पुरुष / गुण हवा; तो म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा, परमेश्वराशिवाय कोण? तर सद्गुरू होय. हे तर परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आणि बलिष्ठ. त्यांनी केलेला बोध आणि त्यानुसार आचरण हा सर्व कोंडीतून सूटण्याचा परमाधार आहे.त्यासाठी अखंड अनुसंधान, नामजप, परमात्म्याशी समीपता हवी.
         ‘मीमाझेपणसोडणे म्हणजे तूतुझेपणयेणे. सर्व काही तुझे आहे, ही नि:स्वार्थ होण्याची वाटचाल आहे. आपली कर्तव्ये केलीच पाहिजेत. पण कर्म बंधनातून पळवाट नाही. म्हणून यज्ञपूर्वक मी मला ह्या जगामध्ये हविर्भूत करतो.

(24)We think of our faith as source of comfort and understanding but our actions betray those and sow the seeds of racial, divisive, cast-ridden, religious and cultural tensions, attacks and aggression. We believe ourselves to be tolerant but fail to listen to what is not in tune with our professed ideas and ideals and instead of resolving these conflicts, our politics fans them, exploits them and finds in all these, its vote banks. Ultimately, we end up weakening democracy, the nationhood, the heart & freedom of our living.

                             And yet, there is no soul searching or introspection in any of political parties when all of them come together to defunct Suprem court decision dis qualifying criminal charge-sheeted Members of parliament and Members of Legislative Assembly.
                                        *************