समज-गैरसमज
बहुतेकांचा समज असतो-“मला
कोणी समजून घेत नाही.“पण
हाच खरा त्यांचा गैरसमज असतो. कारण
जो स्वत:ला
समजून घेऊ शकतो, तोच
दुस-यांना
समजावून घेऊ शकतो. म्हणूनच
म्हणतात “ Understanding is divine grace of God” समजून घेता येणं हा परमेश्वराचा पवित्र आर्शिवाद असतो. पण
ह्या आर्शिवादाला पात्र होण्यासाठी स्वत:ला
स्वत:ची
खरीखुरी ओळख म्हणजेच “मी
कोण आहे?“,”who am I ?” ह्या प्रश्नाची उत्तरे शोधावी लागतात.
गैरसमज ही आपल्या अपयशाची पावती आहे. मूळातच
गैरसमज, स्वत:विषयी स्वत:चेच, किती आहेत, हे
समजण्यासाठी “अहंकार“, “मीपणा“,“अहंमपणा“,“आढ्यतेखोरपणा“ म्हणजे काय हे आपणच आपल्याकरीता समजून घेण्यास सुरवात केली म्हणजे दुस-याला
समजून घेणं किती अवघड आहे, हे
लक्षात यायला लागतं. म्हणूनच
म्हणतात की,
“Misunderstanding happens when you are not-in-tune or rather
because tuning is not your religion.”
गैरसमजाची
जननी आहे “betrayal of faith”-विश्वासघात. म्हणजेच असं की, जेव्हां
आपण दुस-यांच्या
संवेदनांशी जोडलेले नसतो किंबहुना स्वत:ला
समजून घेणं, हा
आपला धर्मच नसतो; तेव्हांच
गैरसमजाचे विषारी तरंग उमटतात, पसरू
लागतात व आपण
त्यांचा बळी होतो.
विश्वास ही श्रध्देची पहिली पायरी. पण
अंधविश्वास म्हणजे काय हे ही समजता आलं पाहिजे. “मी-पणा“ हरविणे-गमाविणे म्हणजे अहंकाराचा नाश नव्हे. “मी-पणा“,ओळखणं
म्हणजे अहंकाराला ओळखण्यास शिकणं होय. अशा
ओळखी-पाळखीतूच
मनाच्या खोल, गूढ-गंभीर गाभा-यात
उतरण्याच्या पाय-या
आपल्याला दिसू लागतात. सुरवातीला
ह्या पाय-यांवर
खूप अडखळावं लागतं; अंधा-या वाटेवरुन धडपडायला होतं. पण
ही अपयशं, अंध:कार ज्याला पचविता येतो, त्यालाच
प्रकाशाच्या वाटा दिसू लागतात; प्रकाशाकडे
चालण्याची शक्ती, धाडस
व आत्मबळ
मिळत जाते.
यशातून जशी सहज शक्ती मिळते, तशी
अपयशातून मिळत नाही, हे
खरं. पण
अपयशच, आपल्याला
शक्ती नाही, पण
सामर्थ्याच्या पायवाटा दाखवून देते. स्वत:विषयी असणा-या
गैरसमजातूनच अपयशाच्या वाटा जात असतात आणि समजशीलतेतूनच यशाचे उद्बोधन, प्रबोधन
व यशापयशाचे
मूल्यमापन करण्याच्या वृत्ती, कसोट्या
जोपासल्या जातात, हे
कळू लागते.
स्वत:विषयी
असणा-या
अनेक गैरसमजांमध्ये एक मोठ्ठा गैरसमज, बहुसंख्य
लोकांमध्येच कशाला, आपल्यातच
असतो, तो
म्हणजे,“माझ्यावर
कुणाचे प्रेम नाही“, “माझ्याबद्दल
कुणाला आदर नाही“, “सगळे
मेले स्वार्थी, लंपट, कपटी…..”,“माझं
कुणी एैकत नाही“ ह्या
आणि अशा अनेक तक्रारी, दुखे: व वेदना-समस्यांनी आपण निराश, वैफल्यग्रस्त
असतो. ह्याचं
मूळ आपल्यातच आहे, हे
आपल्याला समजत नाही. कारण
ह्या सर्वाचे मूळ, त्यांची
कारण-परंपरा, आपण इतरांमध्ये, दुस-यांमध्ये
आहे, हे
निश्चित करून असतो. पण
हे असं नसतं, हे
सत्य जितक्या लवकर आपल्याला पचविता येईल, तितक्या
लवकर आपल्याला अंतिम सत्याच्या जवळ जाण्याच्या पायवाटा दिसू लागतील. चिंतन, मनन, आत्मशोधन, आत्मबोधन-संशोधन
करण्याची आपली मानसिक, बौध्दिक, सामाजिक आणि आधिभौतिक तयारी होऊ लागते.
भगवान पतंजलींनी एका सूत्रात म्हणले आहे-
“कायेन्द्रिय सिध्दिरशुध्दिक्षयात्तपस:“ (साधनपाद-४३)
चित्ताच्या
शुध्दिकरीता आवश्यक आहे, स्वत:विषयी व इतरांबद्दल, इतरेजनांबाबत सहानुभूतीने, मायेने व करूणेने
विचार करणे.
बुध्दीसामर्थ्याच्या
जोरावर सर्व भौतिक उत्तरे शोधता येतात, परंतु
स्वत:बद्दलच्या
समस्या, प्रमेयं
सोडविता येत नाहीत. कारण
आपल्याला दुस-यांबद्दल
विश्वास नसतो. त्यापोटी, एक प्रकारची भीती वाटत असते.
म्हणूनच भगवान पतंजली म्हणतात,
“काया
इंद्रिया सिध्दि: अशुध्दि: क्षयात्....
“शरीर, इंन्द्रिये अशुध्द ज्या अनेक कारणांनी असतात, त्यातील
मोठ्ठे कारण मरणाची भीती....हीच
मूळ भीती नष्ट झाली की इतर भीतींचे निराकरण करता येतं.
“भीती
जाताच, प्रेमाचा
उदय होतो“
Fear disappears, love arises.
अविश्वासापोटी
भीती, भीतीपोटी
अविश्वास…बौध्दिक
अहंकार, अशा
दुष्टचक्रात आपण प्रथम स्वत:ला
हरवतो. मग
दुस-याच्या
मनाचा काय ठाव लागणार? बाजारात
मिळणारी सोप्पी उत्तरे, सोप्पी
समीकरणे, ready-made solutions / guides, ह्यांच्या सहाय्याने जीवनाची प्रमेये सोडविता येत नसतात.
भ.पतंजली म्हणतात,
“स्वाध्यायात्
इष्ट देवता सम्प्रयोग:“ (साधनपाद-४४)
Union with the divine happens through self study.
स्वाध्यायाने
इष्ट देवता प्रसन्न होतात.
गुडद्रेजीफ(Gurdjieff)
हा एक मोठा जर्मन तत्वज्ञ होऊन गेला. ज्याला
भ.पतंजली
स्वाध्याय (self-study) म्हणतात, त्यालाच
तो म्हणतो:
“self remembering is self-study”
भगवान पतंजली / गुडद्रेजीफ
कधीही “हे
करा,ते
करा“,“हे
करु नका,ते
करु नका“ असं
सांगत नाहीत. ते
म्हणतात, स्वत:ची स्वत:ला
सदैव आठवण ठेवा…नीट
लक्ष द्या व पहा. लोकांकडे पहा, तुमचं
त्यांच्याशी काय नातं आहे, हे
पहा. कारण
हे नातं म्हणजे तुमचा स्वत:ला
स्वत: पहाण्याचा
आरसा आहे. आपण
त्यांच्याशी कसे वागतो, हे
पहायचंय. ते
आपल्याशी कसे वागतात, हे
पाहण्याचा हा
आरसा नाहीयेय. कारण
आपल्या आरशात आपण स्वत:ला
फसवू शकत नाही. आपला
स्वार्थीपणा, संकुचितपणा, क्रोध, अविवेक, अश्रध्दा, इ. अनेक दुर्गुण झाकण्यासाठी आपला चेहरा न बघता, आपण दुस-यांचे
दुर्गुण त्या आरशात बघतो व आपला
चेहरा मात्र आपणच हरवून टाकतो! पण
जर आपण स्वत:ला
ह्या आरशात पाहू लागलो…..स्वत:चा नीट, लक्षपूर्वक
आठव घेऊ लागलो, तर
दुस-यांचा
चेहरा लुप्त होऊन आपलाच खरा अमानवी, दुर्गुणरुप, दुर्गुणसंपन्न इत्यादीयुक्त चेहरा दिसू लागला की, मग
आपण आपल्या स्वत:शीच
स्वत:चं
नातं काय आहे, हे
शोधू लागतो. Self remembering is self study and through
self study, the study of relationships with others. स्वाध्यायातून जसा स्वत:चा
अभ्यास होतो, तसाच
सर्व नात्या-गोत्यांचाही
अभ्यास होत असतो. आवश्यक
आहे फक्त जागृती. सतत
जागृत मन, लक्षपूर्वक
पहाणारं मन.
अभ्यास म्हणजे विचारांचे, प्रयत्नांचे
रसपूर्ण सातत्य, विवेकशील
चिंतन व संस्कारपूर्ण
मनन.
न आवडणा-या, तिटकारा, व्देष भावना निर्माण करणा-या, मूर्खपणा, अज्ञान, राग-लोभमूलक
गोष्टी….ह्या
सर्वांविषयी उदासीनता, तटस्थता
अशी सकारात्मक अंतर्मुखता जेव्हां आपल्यात येऊ लागते, तेव्हां
कुठे आपल्याला अंतिम सत्याची चाहूल लागू लागते. सत्वगुणांचे
संवर्धन होताना दिसू लागते की तामस आणि राजस गुण कमी-कमी
होत आहेत. हा
समज आपल्याला गैरसमजाच्या वाटेपासून हळूहळू बाजूला नेतो, दिर्घकाळाच्या
तपस: साधनेने
गैरसमज दूर फेकला जातोच, कारण
समजशीलतेच्या ईश्वरी आर्शिवादाला आपण पात्र होऊ लागतो. Understanding is divine grace of God.
समज-गैरसमज
हे आपल्या जीवनातील सुख-दुखा:चं मूळ आहे, आणि
हे कुणाला चुकलं आहे. आपण
सर्वच ह्याचे बळी आहोत, हे
सत्य एकदा नीट समजलं तर आपल्या अनेक समस्या, दुखं:, ह्यांच्याबद्दल स्वाध्याय वरील चतु:सूत्रींवर :
सुख > मैत्री, दुख: > करुणा, पुण्य > हर्ष, पाप > उपेक्षा
धारण करता येतो. जोपर्यंत
हे समजत नाही, तोपर्यंत
आपल्याला सुख-दुखांच्या:, जन्म-मृत्यूच्या
चक्रातून, फे-यांतून सुटकेचा मार्ग सापडणार नाही.
******************