Sunday, 16 December 2012

सापेक्षतावाद आणि अव्दैत



सापेक्षतावाद आणि अव्दैत-
आइनस्टाइनने सामान्य सापेक्षतावाद(General Theory of Relativity)व विशिष्ट सापेक्षतावाद(Special Theory of Relativity)अशा दोन उपपत्ती मांडल्या. सामान्य सापेक्षतावादात त्याने दाखवून दिले की, गुरुत्वाकर्षणाच्या नियमांनुसार प्रचंड वस्तुमान असणारे ग्रह, तारे हे अवकाश(space) व काळ(time) ह्यांच्या बंधनात नाहीत. मग,आपल्याला जाणवणा-या व दिसणा-या घटनात सचेतन विश्वाची बलस्थानेही निश्चित अशा अवकाश आणि काळ ह्यांच्या पटलावरच घडत असतात; पण हे पटलच(platform))जर निश्चित नसेल तर ही बलस्थाने कशी कार्य करतात, हा यक्ष प्रश्न उभा राहतो. आइनस्टाइनने E=mc2 ह्या सूत्राच्या आधाराने उर्जा वस्तुमान हे परस्परांत रुपांतरीत होऊ शकतात, हेसिध्द केले. तसेच, हे दाखवून दिले की प्रकाशापेक्षा जास्त वेगाने वस्तुमान किंवा ऊर्जा ह्यांचा प्रवास / वहन होऊ शकत नाही.
     यंग हया शास्त्रज्ञाने सिध्द केले की प्रकाश हा एकाच वेळेला तरंग(wave) आणि मूलभूत कणांच्या(particles)स्वरुपात असतो.
प्लॅंक ह्या शास्त्रज्ञाने सिध्द केले की उर्जेचे प्रसरण छोट्या छोट्या तुकड्यांतच(Quantas) होत असते. ह्या सिध्दांतावरून अर्विन श्रोडीन्गर, हायझेनबर्ग, बोहर, पॉली, डीरॅक इत्यादि शास्त्रज्ञांनी क्वांटम मेकॅनिक्सची मांडणी केली, दाखवून दिले की, प्रकाश हा एकाच वेळी तरंगांच्या(waves)तसेच कणांच्या (particles) स्वरुपात असतो; त्याचप्रमाणे, अणूतील अति-मूलभूत कण हे पण तरंगांच्या स्वरुपात असतात आणि ह्या तरंगत्या कणाच्या भौतिक अस्तित्वाच्या ज्या अनेक शक्यता असतात, त्यांच्या एकत्रित समुच्चयनाने तयार झालेले असतात. ह्यालाच wave-particle duality असे म्हणतात. म्हणजेच असे की, अति-मूलभूत कणांचे स्वरुप व्दैत असते. मग त्यांचा निरीक्षक / साक्षीदार कोण असतो, तर तो कोणी सामान्य नसतो. तो असामान्य असतो,ज्याला विज्ञान, conscious observer म्हणते, त्यालाच वैदिक विज्ञान, “चेतनाम्हणते, असे मान्य केले तर आधुनिक विज्ञानाचे मुख्य सूत्र असे की, सर्व पदार्थ भौतिक स्वरुपात असतात, ही मान्यताच कोसळून पडते. दुसरे असे की, classical mechanics चे दुसरे मूलभूत सूत्र- निश्चितता हे ही कोसळून पडते.
     १९२० च्या दशकात अर्विन श्रोडीन्गर आणि हायझेनबर्ग ह्यांनी Quantum mechanics ची वेगवेगळी मांडणी केली. हायझेनबर्गने मूलभूतकणांची व्दैतता मान्य केली. श्रोडीन्गरने मात्र अव्दैतता मान्य केली अव्दैत हा व्दैताचा मूलभूत पाया आहे, ज्याचा अजून आधुनिक विज्ञानाला शोध लागलेला नाही, असे त्याने प्रतिपादन केले आहे.
     आधुनिक विज्ञानाप्रमाणे मन अशी काही वेगळी गोष्ट नाही. मन हा एक भावनांचा, आठवणींचा, जाणीवांचा समूह आहे आणि मेंदूतच त्याचे अस्तित्व असते. म्हणजेच मन हे भौतिकच असून त्याचे आकलन भौतिकमार्गानेच होऊ शकते. तरी सुद्धा सर पेनरोजसारखे शास्त्रज्ञ Quantum mechanics आणि मनाचा संबंध शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
     वैदिक विज्ञानाने मनाचे दोन भाग केले आहेत. बाह्यमन सगळ्या विकारांना आपल्यात सामावते आणि त्याचे कार्य पंचेंन्द्रियांमार्फत चालते. आधुनिक विज्ञानानेही ही संकल्पना मान्य केली आहे. पण मन ही स्वतंत्र अस्तित्व असणारी भौतिक गोष्ट नाही. मनाचा दुसरा भाग म्हणजे अंतर्मन. वेदांनी ह्याला सहावे इंद्रीय म्हणले आहे ते आधिभौतिक आहे, असे म्हणले आहे, पण त्याचे अस्तित्व पंचेंद्रीयांना जाणवणारे नाही, कारण ह्या मनाचे भौतिक कण प्रचंड उर्जायुक्त असतात. त्यांना जाणून घेण्याची शक्ती इंद्रीयांमध्ये नाही. आधुनिक विज्ञानात Dark energy आणि Dark matter ह्या संकल्पनांवर बरेच संशोधन चालू आहे. त्यानुसार असे मान्य झाले आहे की, ह्या उर्जा तसेच वस्तुमान आपण पाहू शकत नाही, पण त्यांचे अस्तित्व मात्र नक्की जाणवते. ह्याखेरीज, असे सिध्द झाले आहे की, अवकाशांत असणा-या black holes मध्ये काळ अस्तित्वात नसतो. तसेच, black holes मधील वस्तुमानाचा वेग प्रकाशापेक्षा कित्येक पटींनी जास्त असतो. ह्या आणि अनेक सत्यांवरुन असे दिसते की, वैज्ञानिक भौतिकतासुध्दा सापेक्ष आहे.
                   *************
    

No comments:

Post a Comment