दुख:
दुख: ह्या शब्दाचा मुलभूत
अर्थ असा आहे की माझी वाईट परिस्थितीशी झालेली
नकारात्मक प्रतिक्रिया. कारण मी मुळात प्रतिक्रियावादी आहे. मी माझा स्वभाव
सकारात्मक बनविणे, हा नुसता उपाय नसून ती माझी सत्योपासना, जीवनसाधना आहे. जगाची
संरचना सुख-दुख: आदि सर्व द्वंद्वात्मकच आहे. ती माझ्या अंतरंगात कशी प्रगट होते,
त्यावर मी सुखात आहे की दुखा:त आहे, हे सिद्ध होत असते.
जी परिस्थिती मला वाईट असते, तीच परिस्थिती दुस-यासाठी चांगली
असते. त्यामुळे ज्या परिस्थितीमुळे मी सुखी असतो, त्याच परिस्थितीमुळे दुसरा दुखी:
असू शकतो. ह्याचाच अर्थ असा की मुळात सुख किंवा दुख: नसतेच. माझा परिस्थितीला कसा
प्रतिसाद असतो, त्यावर माझे सुख-दुख: अवलंबून असते. थोडक्यात, सुख-दुख: ह्या एक तर
अतिशय वैयक्तिक-खाजगी गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट ही की जगात सुख-दुख: असं काहीही
नसते.
दुख: ह्या शब्दाची फोड दु: + ख अशी आहे. दु: म्हणजे वाईट. ख:
म्हणजे आकाश, पोकळी, काहीही नसणे, शून्य स्थिती, अवस्था किंवा ठिकाण म्हणजे आकाश. हा ही
अर्थ सुसंगत आहे. ह्याच प्रमाणे, सुख म्हणजे सु + ख. सु म्हणजे चांगले. चांगले आकाश म्हणजे चांगली परिस्थिती.
*************
No comments:
Post a Comment