मी आणि आपण सर्व
प्रास्ताविक:
बदल हा काही
केवळ निसर्गाचा नियम
नाही, तर सर्वांगाने सारखं
बदलणं हा जीवनाचाच धर्म
आहे.
हे तत्त्व म्हणून ठीक
असलं तरी माणसाच्या, व्यक्तीच्या जीवनातले
बदल खूपच घडवत-बिघडवित असतात. नव्या
बदलांना उत्साहाने स्वीकारण्याचं
धैर्य, उमेद सर्वांच्यात असतेच, असं
नाही. मुख्य म्हणजे, मावळतीमध्ये (वयोवृध्दी होत
असताना) हे बदल स्विकारणं
राहुद्या, पण पचविणं खरचं
अवघड, दु:प्राय्य होतं. कारण, हे घडणारे
बदल केवळ स्वाभाविक म्हणून
सोडून देण्याइतकी सहजता
आपल्यात नाही. दर दोन
पिढ्यांमध्ये विचार-आचारांचे अंतर (
Generation gap) असते, तसे हे अंतर
नाही. स्वाभाविक प्रेम, वात्सल्य, आदर ह्यांच्या
संकल्पनाच इतक्या बदलल्या आहेत
की आपल्या संकल्पना चुकीच्या
आहेत, असं वाटावं, इतकी आपली
दुर्दशा झाली आहे. आणि आपणच
कालबाह्य झालो आहोत. ह्या आणि
अशा अनेक संभ्रमात आपण
फरपटतो आहोत?
(१)जेष्ठांचा
आदर,
सेवा, सांभाळ, कनिष्ठांसाठी माया, वात्सल्य,
आणि सर्वांसाठी त्याग
ही आदर्श जीवनाची चौकट, बांधणी
होती. पण आज असे
घडताना दिसत नाही. उलट, जेष्ठांचा अनादर, अपमान, कुचंबणा,
कुतरओढ, फरपट ही जगरहाटीच
होत असल्याचं पाहिल्यावर,
अनुभवल्यावर जाणवतं…….शरीर तर
थकले आहेच, पण त्यापेक्षा
मन जास्त थकत चाललंय.
(२)आपल्याच
मुलाच्या-मुलीच्या घरात आपण
परके, उपरे आहोत, असं वाटणं, ही
आपलीच शोकांतिकाच नाही
कां?
(३)ह्यावर
काय उपाय? तीन अक्षरांचा
मंत्र-
ICE
Mantra-Ice means coolness, शांत रहा, विचार-विवेक आपोआप
मनात हळू-हळू पाझरु
लागेल. अशांतता, राग, इ आले
की लगेच प्रतिक्रिया देऊ
नका.
कारण हा राग, ही अशांतता
मला आलेली आहे. कोणामुळे, कशामुळे आली, हे
महत्वाचे नसून मी disturbed झालो
आहे,
राग मला आला आहे, म्हणजे
माझ्या रागाच्या कारणापेक्षा,
बाहेरील कारण महत्वाचे नसून, मला
त्रास होतोय, माझ्याच रागवण्यामुळे,
हे लक्षात घेतलं, तर माझ्या
रागाला दुसरे, बाह्य कारण
नाहियेय, हे आपले आपल्यालाच
समजून घेण्याकरिता, प्रतिक्रिया न
देता, शांत रहा. आपल्या विचारांना,
आपल्या मनाला वाव द्या….हळू
हळू विवेक जसा-जसा जगऋत
होईल, तसतशी आपली आपल्याला
समज येऊ लागेल. समजूतदारपणा वाढीस
लागेल व मला राग
न येणं, हे माझ्याच हातात
आहे,
हे ही कळू लागेल. पण
let me be
patient, don’t let me be impatient; have patience like a “patient” who needs
Doctor. Let me be my own Doctor, if I am convinced that Anger is
disease….dis-ease; I am not at ”ease”, so I am dis-eased, and only treatment
that I must give to myself, is to be cool, शांत रहा, रागाऊ
नका,
आपल्या मनाला विचार करण्यास
अवधी द्या. हळू हळू
विवेक जागृत होईल व
मी विवेकशील होऊ
शकतो, असा आत्मविश्वास आपल्यात
येऊ लागेल.
विवेक जागृती
पुढील तीन सूत्रांच्या आधारांनी
विकसित करता येते.
I- Importance - Don’t give too much importance to
anyone.
कोणाला
किती महत्व, अग्रक्रम द्यायचा, ह्याचे
भान ठेवा.
C- Comparison- Don’t compare yourself with anyone.
स्वत:ची तुलना कोणाशीही करु नका, व
दुस-याचीही
तुलना स्वत:शी
किंवा इतर कोणाशीही करु नका. कारण
प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते. “पिंडे
पिंडे मति: भिन्न:“ हे वेदांनी उद्घोषित केलेलं सूत्र मंत्रासारखं मी सदैव जपतो व माझ्यासह
ते सर्वांना लागू आहे, हे
मला योग्यप्रकारे जाणवलं आहे, ह्याची
मला खात्री आहे किंबहुना मी ह्याचा प्रयत्नपूर्वक अनुभव घेतला आहे, अभ्यास
केला आहे व तद्नुसार
माझ्या जाणीवा विकसित होत आहेत, समृध्द
होत आहेत, हे
माझं मलाच दिसतं आहे.
E- Expectation- Don’t expect anything from anyone.
कोणाकडून
काहीही अपेक्षा करु नका.
(4) मुलांमध्येच
नव्हे तर एकंदरीत तरुणवर्गात जेष्ठांबद्दल दिसणारा तुसडेपणा, तुच्छता, दुष्टावा व टिंगलखोरपणा
ह्या गोष्टी व त्यांच्या
तशा भावना, वागणूक
ह्या आपल्या चिंताच नव्हे तर माणूसकीपासून दूर जाणा-या
तरुणांना त्यांच्या भवितव्याबाबत धोकादायक ठरणा-या
आहेत, असं
वाटतं व एक
प्रकारची भीती व प्रचंड
दडपणात्मक काळजी वाटू लागते.
(5) वृध्दाश्रम
ही काळापेक्षा माणसाची गरज बनावी, ही
वस्तुस्थिती परिस्थितीजन्य नव्हे तर मानवनिर्मित आहे. आर्थिक
स्थिरता, संपन्नता
माणसाला माणसापासूनच दूर नेत आहे, असं
वाटण्याइतकी भीषण नक्कीच नाहीयेयं. पण
अर्थकारणाच्या दुष्परिणामांचे दिग्दर्शन मात्र ह्यातून होत आहे, असं
दुर्दैवाने म्हणावं लागत आहे. लहान
मुलांची अनाथालये व वृध्दांचे
वृध्दाश्रम एकाच नाण्याच्या दोन बाजू नाहीत का? निदान
अनाथालयातील मुलांना उज्वल भविष्याची स्वप्ने तरी जगण्याची उमेद देतात. पण
वृध्दाश्रमातील जेष्ठांना भविष्यातील अंधार व भूतकाळातला
कडवटपणा घेऊन जगणे भाग पडते.
(6) असं
सगळं असूनही जेष्ठांना आपल्यात, समाजात
सामावून घेणारी माणसंही दिसतात. तुरळकपणेच
का होईना पण भेटतात. म्हणूनच
प्रश्न पडतो, आपली
कुटुंब-व्यवस्था, समाज-व्यवस्था
व अवस्था
वृध्दांच्या बाबतीत खरंच एवढी निष्ठूर, उदासीन
का झाली आहे ?
(7) एकूणच
जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेनंतर गेल्या दिड-दोन
दशकातील मध्यमवर्ग नवश्रीमंत वर्गात वेगाने जात आहे. ह्याची
झिंग तरुणवर्गात आहेच. हे
जेष्ठांना समजून घेणं कठीण जातं आहे……तरीही
वृध्दावस्थेतील एकाकीपण ही सनातन गोष्ट आहे. शंकराचार्यांच्या “अगं गलितं, पलितं
मुण्डं“ पासून
तुकाराममहाराजांच्या “बाइलीच्या गोता आवडीने पोशी, मातापितयासी
दण्डयितो….“ अशी
वर्णने आहेतच की.
(8) बाल्यानंतर
तारुण्याचा स्वीकार निसर्गनियम म्हणून जितक्या उत्साहाने, सहजपणे
होतो. तितका
तारुण्यानंतर वृध्दावस्थेचा स्वीकार सहजपणे होत नाही, हेच
खरं. मग
मूळ दुखणं स्वीकाराचं आहे की काय? हे
ही तपासून घ्यायला हवं.
(9)“ कौशल्य, ध्येय आणि
व्देष ह्याची तहान भागवायची,
विवेकाने.
जोपर्यंत
दुर्बलता बनत नाही शक्ती, तिमिर
बनत नाही प्रकाश,
माझ्या
चुका सुधारुन होत नाही
बरोबर, तोपर्यंत.“
(10) यश पदरी पडलं, तर
माझा अहंकार का फुत्कारतो?
आणि अपयश
आलं तर ते न
पचवता, माझी सूडबुध्दी का
जागृत होते?
ध्येय
मागे पडतं आणि यशस्वी
माणसांच्या व्देषानं मन
पेटून का उठतं?
सूडबुध्दीच ताकद, शक्ती, अधिकार
का वाटू लागते?
(13)पण आजच्या
तरुण पिढीकडे पाहतो. तेव्हा दिसतं, झालं-गेलं
विसरुन जाणे म्हणजे त्यांना
कमीपणा वाटतो. विसरत नाहीतच, उलट
मनात अढी ठेवतात, खुन्नस ठेवतात. संधी
मिळताच आपला राग,व्देष,तिरस्कार व्यक्त
करतात. तसं करताना कोणाचा
काय व किती अपमान
आपण करतोय, ह्याचा ना
विचार ना खंत! ह्या तरुण
पिढीला स्वत:चा स्वाभिमान,
स्वार्थ कसा जपयाचा, हे बरोब्बर
कळतं. आलेल्या संधीचा पुरेपूर,
ओरबाडूनही फायदा कसा घ्यायचा
हे कळतं. त्याकरिता त्यांना
भरपूर वेळ आहे. पण दुस-याला
समजून घेणं, मिळत-जुळतं घेणं, क्षमाशील
असणं, घडलं ते मागं
टाकून पुढे पाहणे, चूक झाली
तर सुधारायची म्हणजे
तीच चूक पुन्हा न
घडण्यासाठी जागृत राहणे, त्यापासून धडा
शिकणे….ह्या व ह्यासारख्या
असंख्य स्तुत्य, सुयोग्य व
विधायक विचारांसाठी, विवेकशील वर्तनासाठी
मात्र ह्यांच्याजवळ वेळ
नाही. विवेक म्हणजे काय, सहनशीलता,
क्षमाशीलता, सहिष्णुता म्हणजे
काय,
हे कळत नाही व
समजून घ्यायची तयारीच नाही. त्यासाठी
ह्यांच्याजवळ वेळ नाही!
(14)माझी पिढी बरीचशी
एकत्र कुटुंबात वाढली. घरात
पाच-सहा
माणसं सहज व नेहमी
असायची. संकटं, आपत्ती, दु:खं आणि
सुखंसुध्दा वाटून घ्यायची. सगळं काही
निवारुन नेणारी, पाठबळ देणारी, दिलासा
देणारी जेष्ठ, वृध्द, अनुभवी माणसं
असायची. अशा वातावरणात मन, बुध्दी
आणि माणूसकी ह्यांचा विकास
करणारी व संवर्धन करणारी
शक्ती वास करीत होती. एकटेपणा,
एकाकीपणा सहसा कधी आला
नाही. त्यामुळे मला वाटतं, आजच्या
पिढीत जो स्वार्थ, अप्पलपोटेपणा, सुडबुध्दी आढळते
तीच त्यांना आज समाजात
सतत चाललेल्या स्पर्धेला,
स्वार्थाला, फसवणूकीला तोंड
देण्यास समर्थ बनवित आहे
काय?
साहजिकच आपणच आपलं कवच
होणं, त्यांना आवश्यक झालं
आहे काय? पूर्वी नात्या-गोत्यात,
जवळचे-शेजार-पाजारचे मध्यस्थी करायचे, सगळ्या
बाजू ऐकून एकोपा करत. आजकाल
तडजोड, मध्यस्थी करायला कोण
करतोय, कुणाला वेळ आहे
आणि मी बरा, माझं बरं, अशा
मनोवृत्तीच विकसित केल्या जातायत
व संवर्धितही केल्या जातायत. कुणाच्या
भानगडीत पडू नका, ही शिकवण
लहानपणापासून दिली जात आहे. एव्हढेच
नव्हे तर हा शिक्षणशास्त्राचा,
प्रतिष्ठितपणाचा आणि सुशिक्षितपणाचा तो मानदंड बनला
आहे!
(15)आज जी काय
मध्यस्थी दिसते आहे ती
स्वार्थी, राजकारणी, आपमतलबीपणाची. त्यामुळे आजच्या
पिढीला सतत सतर्क, डोळस व
शहाणं राहणं आवश्यक झालं
आहे.
भाबडेपणा, साधेपणा, सरळपणा ह्या
र्निवाज्य, सुंदर, निखळ गोष्टी दुर्मिळ
झाल्या आहेत. त्यामुळेच आजची
पिढी उमलत्या वयातच खंबीर, कणखर, धोरणी, धाडसी
झालेली दिसते. त्यांना झालं-गेलं
विसरुन जाणे परवडत नाही!
(16)अशी ही वेळ, असा
हा काळ का आला
आहे?
एकत्र कुटुंबव्यवस्था मोडीत
निघाली. आधारवड उन्मळून गेले. अंगावर
उन्हाचे चटके, पावसाच्या सरी
कोसळल्या, वादळ-सोसाट्याचा वारा, पावला-पावलांवर
ठेचा, टक्के-टोणपे खावे लागतात. हे
माणूस म्हणून घडण्याच्या दृष्टीने
चांगलं झालंय, पण टाकीचे
घण-घाव
बसल्याशिवाय मूर्ती घडत नाही, हे
जितके खरं आहे, तितकंच हे
खरं सत्य आहे की
मूर्तीत प्राण-प्रतिष्ठा अशामुळे
होत नसते. त्याकरिता, मूर्तीकाराची सजीव, सुकोमल, सृजनशीलता
लागते. आज आपण ही
प्राणप्रतिष्ठा, जिवंतपणाची खूण, जाण, जबाबदारी,
सृजनशीलता, क्षमाशीलता, सहिष्णुता आपण
जपत आहोत की नाही, ही
खरी समस्या आहे.
(17)विभक्त कुटुंबपध्दतीत व्यक्तिस्वातंत्र,
सत्ता, स्वाभिमान, स्वत्व जपलं
जातं आणि बोकाळलंही जातं. अनिर्बंध
वागणं, स्वैर वागणं म्हणजे
स्वातंत्र्य अशी विचारसरणी अंगात
मुरली की माणूस स्वार्थी,
संकुचित, कोत्या प्रवृत्तीचा व
स्वयंकेद्रित, क्षुद्र, एकांगी मनोवृत्तीचा
बळी होतो. भल्या-बु-याची, नीती-अनीतीची तमा
नाही आणि पर्वाही राहत
नाही. स्पर्धा, यश, मान-मरातब, पैसा हेच
जगणं होतं. ज्या समस्या
आज पाश्चा्त्य देशांना,
अतिविकसित अमेरिकन, युरोपिय देशांना
भेडसावत आहेत, त्याच समस्या
पण त्यापेक्षा अधिक
प्रचंड स्वरुपात आपल्याला
भिडताना दिसता आहेत.
(18)अशा ही विपरित
समाज-अवस्थेत अनेक तरूण
सच्चेपणानं धडपड करतात, अपरंपार कष्ट-मेहनत
करतात, शिक्षणासाठी, ज्ञानासाठी, ध्येयासाठी, आपल्या आवडी-छंद-खेळ, क्रिडा, मनोरंजन
इत्यादी असंख्य क्षेत्रं पादाक्रांत
करत आहेत. रोज वर्तमानपत्रात
वाचायला मिळतं, अमक्या-तमक्यानं बेहिशेबी
इतक्या कोटींची माया जमवली, क्वचित
जप्त होते. पण कालांतराने
हीच माणसे उजळ माथ्याने
फिरताना दिसतात, लोक त्यांना
डोक्यावर घेऊन नाचतात. हे सगळं
तरूण मनावर कोणते, कसले संस्कार
करणार? बेदरकार, बेपर्वा, निर्बुध्द, निलाजरी, निर्ढावलेली मन
तयार झाली तर कोणाला
अपराधी म्हणायचं?
(19)निकोप दृष्टी म्हणजे
कोप नसलेली, वाईट काम, दुष्कृत्ये,
अनिती इ पाप कर्मांमुळे
येणा-या रागालाही अंकीत
करणारी दृष्टी. पण ह्याचा
अर्थ असा नव्हे की
पापकर्मांमुळे राग येऊच नये. राग
यावा आणि येतोच. पण त्याबरोबर
पापकर्म मुळातच का घडले, ह्याचा
सामाजिक, राजकीय,किंवा आर्थिक
पातळीवर व निकषांवर धांडोळा
न घेता, भूतदयात्मक, वैयक्तिक, करुणा-भावपूर्ण आढावा
घेणे व तद्नुसार वागणे, हीच
खरी निकोप दृष्टी.
वसुंधरा पेंडसे-नाईक
ह्यांनी निकोप दृष्टी एका
सुंदर गोष्टीद्वारे स्पष्ट
केली आहे. एका घराच्या
तळमजल्यावरील खिडकीतून एकाने
स्टीलचा डबा चोरला. पण तो
चोरुन नेताना तो पकडला
गेला. लोकांनी कूप मारले-बडवलं
व तो स्टीलचा डबा- जो
त्या घरातील एका छोट्या
मुलाचा शाळेचा जेवणाचा डबा
होता-तो त्या मुलाला
व त्याच्या वडिलांना लोकांनी
परत केला. डबा घेऊन
जात असताना तो लहान
मुलगा बाबांना म्हणाला,“बाबा, ह्यातील पोळी-भाजी
मी त्या माणसाला देऊ
का?“
तो माणूस मारहाणीमुळे विव्हळत
पडला होता. त्याला त्या
मुलाने डब्यातील पोळी-भाजी
खाऊ घातली. तो माणूस
बिचारा ढसढसून रडू लागला. तो
भुकेलेला होता, त्यामुळे त्याने
चोरी केली होती.
त्यामुलाकडे ह्या
घटनेकडे, चोरीकडे, चोराकडे पाहण्याची
जी दृष्टी आहे-तीच निकोप
दृष्टी नाही का?
(20)
“All
animals are equal, but some are more equal than others”
Gearge Arvel in “Animal Firms”
लोकशाहीमध्ये
काहीजणांना केवळ त्यांच्या अधिकारामुळे इतरांपेक्षा अधिक कायदेशीर (आणि
बेकादेशीरही) फायदे मिळतात. नगरसेवक, आमदार, खासदार, सनदी (आणि
असनदीसुध्दा) अधिकारी,निवृत्त
राष्ट्रपती, निवृत्त पंतप्रधान इत्यादी असंख्यजणांना असे फायदे मिळतात. ह्या
फायद्यांवर हेच लोक स्वत:चे
कायदेशीर (आणि
बेकायदेशीरही) धंदेचालू करतात. अनेक
ठिकाणी असे फायदे मिळविलेल्या बाबींचा उपयोग अनागोंदी, अनाकलनीय, राष्ट्रविघातक, अनैतिक व सरंजानशाही
पध्दतीचे धंदे, उद्योग, व्यवसाय करण्याकरीता केला जातो. ह्या
वास्तवतेला कोणी आणि कसे रोखायचे? अण्णा
हजारे लढताना दिसतात. त्याचबरोबर
त्यांना उध्दट, उर्मटपणे
व निर्लज्जपणाने
विरोध करणारे, त्यांच्या
लढ्यात काड्या घालणारे, खोडसाळ
पत्रकार, राजकारणी
मात्र असंख्य आहेत, हे
दिसतं. पण
अण्णांसारखे असंख्य लढणारे भूमिगस्त होतात, नष्ट
होतात, नष्ट
केलेले दिसतात, ह्या
वास्तवाचे काय करायचे? कथा-कादंब-या, कविता लिहायच्या, राजकीय
बोंबाबोंब करायची की हताश होऊन गप्प बसायचं?
(21) “सुप्रभात“ व “शुभप्रभात“ ह्यात काय फरक आहे? शुभप्रभात
ह्या सद्इच्छेत पवित्रता, पावित्र्य
सामावलं आहे, तर
सुप्रभात ह्यात केवळ सद्इच्छा आहे. म्हणून
मला वाटतं, “शुभप्रभात“ प्रत्येकाच्या दिनक्रमात यावी, अशी
शुभेच्छा करायला कोणाचीच हरकत नसावी. नव्हे
नसणारच. पण
अशी शुभेच्छा करणारा व घेणारा “मी“ काय
देवदूत आहे की देवमाणूस आहे? माझा
अधिकार म्हणण्यापेक्षा माझी लायकी ती काय की मी स्वत:चा
स्वत:च
देवमाणसाचा पुरस्कार करुन घ्यावा व दुस-यांना “शुभप्रभात“च्या खिरापती वाटाव्या?
म्हणूनच मी
कोणी देवमाणूस नाही, ह्याची
मला खात्री असल्यामुळे मी
दुस-यांकरीता
“सुप्रभात“ एव्हढीच सद्इच्छा करतो. कारण
दुस-यांना
तुमची सकाळ पावित्र्यपूर्ण जावो, अशी
सदइच्छा करण्यासाठी मी
स्वत: पवित्र असलो पाहिजे, तरच
माझी सद्इच्छा नुसती
अर्थपूर्ण होऊ शकते, एव्हढेच नव्हे
तर ती सफल व
सुफलदायक होऊ शकते. थोडक्यात, सुप्रभात ही
संकल्पना केवळ देणा-याच्या शब्दांतच
व्यक्त होणं, ही औपचारिकता
झाली व त्याला आपल्या
संस्कृतीत फारसा अर्थ नाहीच, पण
त्यात जास्त भोंदूपणाच व्यक्त
होतो.
******************
(22) बहिणाबाईची गाणी
चाल
येरे वा-या, येरे मारोतीच्या
बापा.
नको
देऊ रे गुंगारा, पु-या झाल्या
तुझ्या थापा.
निसर्गाची अवकृपा हा शेतक-याला
असलेला सनातन शाप. वेळच्या वेळी
पाऊस, ऊन, वारा इ. निसर्गाची अवधाने
चुकली, तर शेतक-याची दैना
उडते. हे वैश्विक सत्य
अधोरेखित करताना बहिणाबाईंची प्रतिभा
विलक्षण भावुक होते. आपला भक्तीभाव
मारुतीरायाला अर्पण करताना बहिणाबाईंची
मार्मिकता किती भाबडी, निष्पाप आहे! ती
वा-याला
म्हणते “पु-या झाल्या तुझ्या
थापा“.
निसर्ग हा परमेश्वराचा
साक्षात्कार! त्याच्या अनेक
रुपांपैकी एक वारा. हा वारा
बहिणाबाईंच्या अंत:करणातला परमेश्वर,
मारुतीराया हे त्याचं रुप. मारुती हा अंजनी
मातेचा पुत्र. तिला वीर्यदान
वरुणदेवाचं, शंकराचं लाभलं, अशी कथा
आहे.
म्हणून बहिणाबाई वा-याला “मारोतीचा
बापा“ म्हणते.
निसर्गाच्या कोपाला
बहिणाबाई म्हणते “नको देऊ
रे गुंगारा“ आणि भक्ताच्या
प्रार्थेनेला सदैव आश्वस्त करणारा
भक्तीभाव, भक्ताची श्रध्दा, निष्ठा ह्यांची
ती मार्मिकपणे संभावना
अशा शब्दात करते-“पु-या झाल्या
तुझ्या थापा“ कारण रोज
तुझ्या कृपेची वाट पाहून
मी थकून गेले आहे.
मन पाखरु पाखरु, त्याची
काय सांगू मात?
आता होतं
भुईवर, गेलं गेलं रे
आभाळात.
मन जह्यरी
जह्यरी, याचं न्यारं रे
तंतर.
अरे इंचू-साप
बरा,
त्याले उतारे मंतर.
देवा, असं कसं
मन,
असं कसं रे घडलं.
कुठे जागपणी
तुला, असं सपानं पडलं.
मन ही एक गूढ
समस्या आहे. मनोशास्त्रज्ञ, मनोविकार तज्ञ, आध्यात्मिक
साधू-संत इ. अनेकांनी मनाचा
शोध घेण्याचा वसा
घेतला आहे. पण अद्याप
मनाचा शोध अपूराच आहे.
बहिणाबाईंना मनाचा
जो कांही शोध लागला
आहे तो स्पष्ट करताना
त्या म्हणतात मन पाखरासारखं
आहे.
चंचलपणा, अस्थिरपणा, अशाश्वत, अकल्पनीय, अविश्वसनीय, अदभूत, अगम्य अशा
अनेकविध बिरुदावलींनी सुसज्ज
असं मन. पाखराच्या चचलतेनं
क्षणात जमीनीवर तर क्षणात
आकाशात संचार करणारं मन. आपली
जमीनीशी असलेली नाळ तोडून
आकाशात आणि अवकाशात झेपा
घेणार मन म्हणजे अहंकाराच्या
पोटी बळी जीवाला झोंबणारं
वादळ; धाडकन् जमीनीवर कोसळविणारं.
ज्याचे पाय, ज्याची पाळंमुळं
जमीनीशी, धरित्रीशी घट्ट नात्याची
असतात, तो आकाशात भिरभरतानाही
आपल्या जमीनीवरील पिलांपाशी-
आपल्या घरट्याशी इमान
राखून असतो.
“मन जह्यरी, जह्यरी“ मध्ये
मनाची विषारी आणि जिव्हारी
लावणारी, स्वार्थी, कपटी, लोभी, हव्यासी, निलाजरी, धूर्त अशी
जात पाहून बहिणाबाई म्हणतात,
अरे,
विंचू, साप ह्यांची जात
परवडली कारण ह्यावर त्याकाळचा
सश्रध्द(अंधश्रद्ध), भाबडा “मंत्र“ हा उतारा
उपलब्ध होता. इथे मंत्र
हा शब्द माणसाच्या विशाल-सहिष्णुपणाच्या,
भावूक संवेदनशीलतेच्या निष्ठा
प्रगट करणारा आहे. पण माणसाच्या
मनाच्या “जह्यरी“ पणाला मात्र
कुठलाच मंत्र लागू पडत
नाही, ही असहाय्यता, हा कळवळा
व हे दुख: बहिणाबाईंनी समर्थपणे
मांडले आहे.
अशा परिस्थितीने गांजलेली
बहिणाई परमेश्वराचा धावा
करते, व त्याला कळवळून
विचारते,“देवा, असं कसं रे
मन?“
माणसाला तूच घडवलसं, मग त्याचं
मन असं कसं रे
झालं? आणि तू जागा
आहेस नं? मग हे
मनं मी कसं समजून
घेऊ?
का हे तुला, तुझ्या जागेपणी
पडलेलं हे “सपन“ तर नाही
ना?
अन् तू झोपलास तर
हे जग कसं चालणार? म्हणून
बहिणाबाई किती गोड प्रश्न
विचारते आहे पहा-“कुठे जागेपणी
तुला, असं सपन पडलं?“
*************
(23) माझ्या जगण्यातील आनंद,
जीवनाचे सार्थक, जगण्याची क्षमता ह्या आणि इतर अनेक संकल्पना केवळ वैचारिक,
बौद्धिक नसून ह्या माझ्या आशा-आकांक्षा, आनंद व समाधान ह्या मानसिक व त्याचप्रमाणे
वास्तवतेत माझ्या जगण्याच्या क्षमतेच्या कसोट्या, मापदंड आहेत.
सर्व साधारणपणे, आनंद happiness मध्ये तात्कालिक घटना, त्यावेळची माझी मानसिकता,
त्याला कारणीभूत असलेले घटक इ. चा समावेश असतो. तर समाधानात, माझी तडीस गेलेले
कार्ये, माझे यशापयश, केलेल्या निश्चयांची पूर्तता, निभावलेली जबाबदारी, समाजाकडून
मिळालेली ओळख, मान-सन्मान अशा अनेक घटकांचा सहभाग असतो.
थोडक्यात असे की, ठरविणे व ते साध्य करणे ह्या
प्रक्रियेतच समाधानाची अंशत: पूर्तता होत असते. एखादी गोष्ट साध्य होणे, यश मिळणे
किंवा अपेक्षापूर्ती होणे यात समाधान पूर्ण होत असतेच. असे नाही. कारण एका
गोष्टीच्या पूर्ततेच दुस-या एक वा अनेक गोष्टींचा, समस्यांचा व वाढलेल्या
अपेक्षाचा उगम होत असतो व माझे समाधान सदैव अपुरेच राहत असते.
स्वानंद मात्र चिरकाल स्मरणात राहणारा असतो. त्याच्या
पुन:प्रत्ययकारी अनुभवातून स्वानंद समाधानापेक्षा अधिक टिकाऊ असतो. त्याचप्रमाणे,
समाधान सदैव अपुर्णतेत असले तरी ज्या घटकांमुळे मला आनंद झालेला असतो, ते घटक
यशापयशापेक्षा मोट्ठे असतात.
*****************
(24) मी लिहितो, बोलतो किंवा
वागतो, ही साहित्यिक बाब नाही किंवा तो माझा कुठल्याही प्रकारचा साहित्यिक
आविष्कार नाही. कारण माझ्या नावावर कसलीही साहित्यिक पदवी नाही. कसलाही लेख,निबंध,कथा-कादंबरी,
समीक्षा असं काहीही मी लिहिलेलं नाही. थोडक्यात, माझे लिखाण कोणत्याही साहित्यिक
मापदंडावर टिकणारे नाही. पण मी माणूस आहे व माणुसकीचा छोटासा का होईना, सेवक
आहे.प्रस्थापित व्यवस्थेतील मला अन्यायकारक वाटणा-या, माझी भावना, परम, माझ्या
जीवन-साधनेला अनुपकारक असणा-या गोष्टीबद्दल, प्रस्थापित नात्यांबद्दल, नात्यांच्या
मूल्य-धारणेबाबत माझा विरोध प्रगट करण्याचा मला अधिकार आहे व तो मी माझ्या केवळ
लेखणी मार्फतच मी व्यक्त करू शकतो. मला नेता व्हायचे नाही की चळवळींचा कार्यकर्ता
व्हायचे नाहीयेय की साहित्य निर्मितीत सहभागी व्हायचे नाहीयेय. मला व्यक्त
होण्याचे साधन लेखणी आहे. ती फक्त माझ्यासाठीच आहे.त्यामुळे मला वाचकाची अपेक्षा
नाही, असे मात्र नाही. माझ्या शब्दांच्या पलीकडे असणा-या मला वाचू शकणाराच माझा
वाचक असेल. तो किंवा ती वाचक इतकी सक्षम व समर्थ असेल की माझ्या लेखनाच्या
सामर्थ्यापलीकडे असणारा अव्यक्त मी समजून घेणारा / घेणारी असेल, ह्याची मला खात्री
आहे.
*****************
No comments:
Post a Comment