देवकण व विश्वनिर्मितीचे रहस्य
विश्वनिर्मितीचा शोध घेताना
अलीकडेच ‘देवकण ’ ही संकल्पना प्रस्तुत व प्रसृत झाली आहे.
विश्वनिर्मितीच्या मूळ शोधाचा गाभा डार्विनच्या सिद्धांताने उलगडला
नसला तरी अधोरेखित मात्र नक्की केला. नंतरच्या काळात Eisenstein ने सापेक्षतावादाच्या सिद्धांताने व नंतर
सुधारित सापेक्षतावादाच्या आधारे विश्वनिर्मितीच्या सूत्रांना हात घातला.
E= mc2 ह्या सित्राने जैविकशक्तीचे मूल्यमापन करताना
असे सिद्ध झाले की वस्तुमानाचे अविनाशित्व हे तत्व फोल आहे. वस्तुमानाचे परावर्तन
जैविक शक्तीमध्ये होते. ह्या सिद्धतेमुळे संपूर्ण विज्ञानाला क्रांतिकारक वळण
लागले आणि विश्वनिर्मितीच्या रहस्याजवळ जाण्याचा अडथळा काही प्रमाणात कमी झाला.
सुधारित सापेक्षतावादाने Quantum mechanics ही विज्ञानाची नवीन शाखा उदयाला आली. तरीही
पदार्थाचे अस्तित्व एकाच वेळी दोन स्वरुपात म्हणजे लहरी(waves) व कण(particle) ह्या अवस्थांमध्ये कसे असते, ह्याचे कोडे मात्र उलगडले गेले नाहीच पण अधिक गूढ
बनले. उदा.प्रकाश एकाच वेळी लहर व कण ह्या रुपात कसा प्रगट होतो, हा शोध घेण्याचे
आव्हान पुढे आले.
ह्या आव्हानाला आता ‘देवकण’ ह्या शोधामुळे बरेचसे उत्तर मिळाले
आहे, असे दिसत आहे. तर देवकण किंवा बोसान्स म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपल्याला
पदार्थ > अणू > परमाणू म्हणजे काय ह्याची मुलभूत उजळणी करायला हवी.
पदार्थ असंख्य अणूंनी आणि अणू असंख्य परमाणूनी बनलेला असतो. परमाणू
विशिष्ट संख्यानक असलेल्या इलेक्ट्रोन्स व प्रोटोन्सनी सम्भारीत असतो. पदार्थाच्या
परमाणू संरचनेमध्ये इलेक्ट्रोन्स हे प्रोटोन्स-न्यूट्रोन्सभारीत केंद्राच्या भोवती
लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असतात. अशाप्रकारे परमाणूचे केंद्र स्थिर असते, पण
परिघातील इलेक्ट्रोन्स मात्र अस्थिर असतात. ह्या
अस्थिर इलेक्ट्रोन्समुळेच
पदार्थांचे रुपांतर – परिवर्तन दुसऱ्या पदार्थामध्ये होते.
ही झाली मुलभूत पार्श्वभूमी. ह्या पुढील पायरी किंवा टप्पा म्हणजे
सापेक्षतावाद. सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार, पदार्थ किंवा परमाणू जर
प्रकाशाच्या गतीने वेगवान झाला किंवा केला तर त्याचे रुपांतर / परिवर्तन
शक्तीमध्ये होते. ह्याचा अर्थ असा की पदार्थाचे रुपांतर शक्तीत होऊ शकते, पण
शक्तीचे रुपांतर पदार्थात मात्र पुन्हा उलट्या दिशेने होते का? ह्या प्रश्नाला
सुधारित सापेक्षतावादाच्या सिद्दान्ताने उत्तर देण्याचा काहीसा प्रयत्न झाला आहे.
हा प्रयत्न म्हणजेच quantum mechanics ची सूत्रे होत.
ह्या सूत्रानुसार एका विशिष्ट स्तरावर शक्तिपात होऊन पदार्थ
किंवा पदार्थजन्य परिणाम दिसू लागतात. ह्या विशिष्ट पातळीलाच Quantum jump असे म्हणतात. बरेच जण ह्यालाच चमत्कार म्हणतात.
अकस्मात व कार्यकारणभाव लावता येत नाही, अशी घटना किंवा गोष्ट म्हणजे चमत्कार
किंवा सिद्धी असेही म्हणतात. योगसाधनेतील काही क्रिया व त्यामुळे दिसणारे किंवा
अनुभव येणाऱ्या प्रक्रिया म्हणजे Quantum jump किंवा Quantum mechanics चे परिणाम होय, असे
काही विज्ञानवादीही मानतात.
प्रकाशाबद्दल असे स्पष्टीकरण केले आहे की ज्यावेळी प्रकाश
कणरुपात असतो त्यावेळी हेच कण म्हणजे particles रूपातील परमाणू अकस्मात शक्तीमध्ये म्हणजे लहरीमध्ये रुपांतरीत होतात. हा
परिणाम quantum
mechanics च्या सूत्रांनुसार Quantum jump असा होतो. हा परिणाम काय आहे? ह्याचे उत्तर ‘देवकण’
ह्या संकल्पनेद्वारे आता देता येते.
देवकण ह्या तत्वानुसार nutrons मधील nutrino नावाचे जे कण
असतात, त्यांच्यात ज्या घडामोडी होत असतात त्या देवकण आहेत म्हणून होत असतात. nutrinos गुरुत्वाकर्षणआच्या कक्षेने प्रभावित असतात;
पण त्यांच्यावर देव कणाचा प्रभाव पडल्यामुळे पदार्थतील अणू-परमाणूच्या संरचनेवर
परिणाम होतो व त्यापासून निर्मित शक्तीही प्रभावित होते. पण अनेक गुढापैकी देवकणांच्या ज्या मुलभूत
गुणधर्माचे रहस्य उलगणे आवश्यक आहे, ते म्हणजे गुरुत्वाकर्षणचा अभाव. ज्ञात असे
सर्व १२ मुलभूत कण गुरुत्वाकर्षणच्या प्रभावाखाली आहेत. पण देवकण मात्र गुरुत्वाकर्षणच्या
टप्प्यात नाहीत, असे आता तरी दिसत आहे किंबहुना ह्याचमुळे देव कणांत देवत्व साकार
होत आहे, असे अध्यात्मिक लोक मानतात.
विश्वनिर्मितीच्या वेळी केवळ शक्तीच अस्तित्वात होती. देव
कणांमुळे ही शक्ती परिवर्तित झाली व पदार्थांची निर्मिती झाली. असा देवकणाचा
सिद्धांत आहे, असे मला वाटते.
*************
No comments:
Post a Comment