आजच्या काळातील बदल
आजच्या युगात सर्वात मोठ्ठी क्रांती झाली आहे. माणसांचे व त्याबरोबर माणुसकीचे
व्यापारीकरण (human being with it humanity has become a commercial, a
saleable commodity, entity and product) झाले आहे. ह्या क्रांतीचे मूळ बीज कशात आहे,
ह्या समस्येची उत्तरे अनेक तत्वज्ञान्यांनी व योग्यांनी दिली आहेत. मला मात्र असे
वाटते की सर्व समस्यांचे बीज replacement of bartender system ह्या उत्क्रांतीमद्ये आहे
असे वाटते.
१९ व्या शतकामध्ये liberalization, globalization होऊ लागले. ह्याचा अर्थ
जगाचे केवळ भौतिक स्वरूप बदलू लागले, एव्हढेच नाही, तर माणसांचे व माणुसकीचे जे
उदात्त स्वरूप होते, त्याचे रुपांतर होऊ लागले आहे. Bartender system
मध्ये केवळ माणसाच्या
उपभोक्त्या वस्तूंचे, सेवांचे, सुख-सोयींचे मूल्य, मोजमापन होत होते. माणूस व
माणुसकीचे मूल्यमापन झाले नव्हते. आज ते झाले आहे. त्यामुळे आपल्या समस्या वाढल्या
आहेत.
माणुसकीला व माणसाला भौतिक म्हणजे व्यवहारी, व्यापारी, चलनात्मक, आर्थिक अर्थ
प्राप्त झाला आहे. माणुसकी विकाऊ वस्तू व सेवा झाली आहे. ह्याचा अर्थ हाच की माणसांचे
व माणुसकीचे व्यापारीकरण झाले आहे. कारण पूर्वीची bartender system
नष्ट झाली व जी व्यवस्था
माणसाकरिता होती, ती नष्ट झालीच, पण त्याबरोबर माणुसकीही नष्ट झाली.
जुन्या संकल्पना मोडीत निघाल्या. विवाह ही संस्था माणुसकीचा प्राण आहे. केवळ
स्त्री-पुरुष संबंध एव्हढीच मर्यादा ह्या संस्थेच्या संकल्पनेत सामावलेली नव्हती.
तर अवघ्या मानवी संबंधांचे उदात्तीकरण हा विवाह संकल्पनेचा प्राण होता.
हिंदूधर्माने विवाह हा संस्कार मानला व तदनुरूप माणुसकीची संकल्पना विकसित केली.
मूळ संकल्पनेत नसलेली स्त्रीच्या स्वतंत्र हक्काची मागणीच नव्हेतर स्त्रीचे
अस्तित्व माणुसकीची तत्वांसह मान्य केले. स्त्री-शिक्षणापासून ते राजकीय हक्क ह्या
पर्यंत स्त्रीचे अस्तित्व स्थान मान्य झाले आहे. दुर्दैवाने हक्कांबरोबर
कर्तव्याची जाणीव मात्र विकसित झालेली नाही, हे आपले अपयश आहे. त्यामुळे अनेक
सामाजिक, कौटुंबिक समस्या उभ्या राहिल्या आहेत. विज्ञानामुळे स्त्रीची अनेक
समस्यांतून सुटका झाली आहे व तिचे स्वातंत्र्य विकास पावले आहे. तिच्या स्वतंत्र
अस्तित्वाची जाणीव प्रखर झाली आहे व त्या जाणीवेचे संवर्धन होताना live-in
relationship सारख्या, विवाह-संस्थेला आव्हान देणा-या समस्या उभ्या राहिल्या आहेत, हे
वास्तव आहे.
मानवी समस्या सर्वच क्षेत्रात अत्यंत क्लिष्ट होत चालल्या आहेत. जगाचे रूपच नव्हे तर स्वरुपच बदलत आहे. ह्या बदलांशी मिळते-जुळते घेऊन जगणे हे मानवतेला आव्हान
आहेच पण आवाहनही आहे.
No comments:
Post a Comment