Thursday, 9 November 2023

स्वातंत्र्य म्हणजे काय ?

स्वातंत्र्य ही संस्कृती आहे काय? स्वातंत्र्य हे जीवन मूल्य आहे काय?
अनिर्बंध स्वातंत्र्य ही संस्कृती नाही आणि जीवनमूल्य ही नाही. 
              निर्बंध कोणते योग्य आणि कोणते अयोग्य ह्याचे विश्लेषण देशाचा इतिहास, जगाचा इतिहास वाचून होते. आपले रामायण - महाभारत इत्यादी ग्रंथ रचणारे वाल्मिकी - व्यास आदी ग्रंथकारांनी मानवी भाव - भावनांच्या बरोबर तत्कालीन इतिहासाची चिकित्सा केलेली आहे आणि आजही इतिहासची आणि ह्या ग्रंथांची चिकित्सा विविध प्रबंधातून, अभ्यास सत्रांतून होत असते. न्याय संहिता आणि न्याय तत्व ह्या दृष्टीने संविधान हा ग्रंथ आणि त्यानुसार कार्य करणारी न्यायालये ही सुद्धा सत्य संशोधनाची साधने आणि व्यवस्था आहेत.
              राम -रावण, कौरव - पांडव, देव - दैत्य अशी रचन मांडून व्यास - वाल्मिकी ह्यांनी सुष्ट - दुष्ट, योग्य - अयोग्य, नैतिक - अनैतिक ह्या आणि इतर विविध आणि अनेक द्वन्व्दांवर भाष्य केले आहे. 
              सत्य हे असे विविध रंगांनी, विविध भाव - भावनांनी, विविध नात्यांनी रंगलेले आहे. ह्या सर्व किंवा अशा पैलूंच्या आधाराने, अभ्यासाने, संशोधनात्मक सखोल चिंतनशील विचारांमुळे सत्याची अमूर्त, गूढ आणि संदिग्ध बाजू कळू लागते, असे मला वाटते. निखळ सत्य हा आदर्शवाद आहे; म्हणूनच ह्या आदर्शवादाचे परिशीलन, आकलन हा सत्य जाऊन घेण्याचा अखंड वसा मानवाने घेतलेला आहे.
 ************ 
       

No comments:

Post a Comment