परंपरा म्हणजे काय, हा प्रश्न प्रथम समजून घेण्यासारखा आहे. प्रत्येक माणूस हा आपल्या बरोबर जन्मत:च अनुवांशिक hereditary गुण-दुर्गुण घेऊन जन्माला येत असतो. हे वैज्ञानिक सत्य आहे. ही अनुवंशिकता ह्यालाच अध्यात्मामध्ये आधिभौतिक म्हणतात, असं माझं मत आहे.
दुसरा भाग म्हणजे जन्मत:च फ्राईडच्या मानसशास्त्रानुसार प्राणिजात उत्क्रांतीचे अंश आपल्या बरोबर घेऊन जन्माला येत असतात.
तिसरा भाग म्हणजे ह्या वरील दोन्ही भागांचे एकत्रित असे अनेक समूह आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या म्हणजे मेंदूच्या रचनेत समाविष्ट होऊन आपण जन्म घेत असतो.
ह्या तिन्ही भागांचा मिळून जो कोष तयार होत असतो, त्याला स्मृतिकोष म्हणतात. स्मृतिकोष हा सतत, सातत्याने आणि सदैव जागृत असतो. झोप-निद्रा, बेशुद्ध आणि कोमा ह्या तिन्ही अवस्थेत वेगवेगळ्या पातळ्यांवर हा कोष अस्तित्वात रहात असतो.
परंपरा म्हणजे ह्या दृष्टीकोनातून स्मृतिकोष हा एक वैचारिक, तात्त्विक, तर्कनिष्ठ आणि संवयीचा असा भाग आहे. म्हणजे असं की आपल्या धार्मिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, आणि पिढ्यानपिढ्या संस्कारित असा एक भाग आहे. ह्याच्यावरून आपले व्यक्तिनिष्ठ, व्यष्टीधारक आणि अत्यंत सूक्ष्म असे एक व्यक्तित्व विकसित होत असते. तसेच, आपले कौटुंबिक, सामाजिक, समूहवाचक, आर्थिक, राजकीय आणि समष्टीधारक व्यक्तिमत्व विकास पावत असते.
ह्यावरून असे दिसते की पारंपारिक विचारसरणीवर मुख्यत: प्रभाव, पिढीजात संस्कार व सामाजिक विचारांचे असतो. पिढीजात संस्कार म्हणजे पारदर्शीपणे जाणवणारे आई-वडील व इतर नातेवाईक. ह्यांचे आचार-विचार विश्व होय. ह्या पारदर्शी विचारसरणीच्या साकल्याने आपलाही एक वैचारिक गाभा तयार होत असतो. पण व्यक्ती पातळीवर प्रत्येक व्यक्तीवर आधुनिक विचारसरणी, शिक्षण, मित्रमंडळ, समाज, राजकारण, आर्थिक क्षमता इत्यांदिंचा प्रभाव अधिक मोठ्या प्रमाणात पडत असतो. त्यामुळे व्यक्तिमत्व तयार होत असते. अशा प्रकारे आपल्या बाह्य भवतालाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्या व्यक्तिमत्व विकास क्षमतेवर होत असतो. तदनुसार, काहींचे व्यक्तिमत्व बाह्य संस्कारित अधिक झाल्यामुळे अशा व्यक्ती extrovert किंवा introvert होतात. Extrovert व्यक्ती बाह्य संस्कारांमुळे व्यक्त होताना open minded, हजरजबाबी, आणि आक्रमक होत असतात. तर introvert व्यक्ती फारश्या बोलत नाहीत, व्यक्त होत नाहीत, सतत विचार करीत राहतात, कुढत राहतात आणि काही वेळा,apparent or latent or hidden मनोरुग्ण होतात.
साहित्यिक व कलेच्या क्षेत्रातील लोक संवेदनशील, सर्जनशील आणि सृजनशील असतात. त्यांच्यावर समाजशील माणूस म्हणून आणि व्यक्ती म्हणून दोन्ही अस्तित्वाचा प्रभाव असतो. त्यांची जडणघडण इतर लोकांप्रमाणे होत असते. त्यांच्यावरही परंपरा, संस्कृती, इ इ वरील मानवी मनाच्या व बुद्धीच्या रचनांचा प्रभाव असतो. त्यामुळे, आशा-निराशा, सुख-दुख: इ द्वंद्वे, पारंपारिक आचार-विचार इ चे परिणाम त्यांच्यावर ही होत असतात. साहित्यिक व कलावंत ह्या सर्व परिणामांचा, द्वंद्वात्मक जगाचा, आणि स्वत:चा भावनात्मक अर्थ लावू शकतो. ही अर्थ लावण्याची त्याची क्षमता किती सखोल, सदृढ, जाणीवेच्या-नेणीवेच्या पातळीवर स्थिर-अस्थिर असते, आणि ह्या क्षमता शब्द, चित्र, शिल्प इ माध्यमातून तो कसा मांडू शकतो....ह्यावर त्याची प्रतिभावंत प्रज्ञा विकसित होत असते.

No comments:
Post a Comment