आपला भवताल विश्वाचा एक छोटासा भाग आहे, विभाग नाही. विश्व रचना पृथ्वीसह सूर्यमाला,आकाशगंगा, कृष्ण विवरे इत्यादींनी बनली आहे. विश्व हा एक महाविस्तृत पटल आहे, आलेख आहे. ह्या आलेखावर असंख्य अक्ष आहेत. जे एकामेकांना छेद देत असतात. ह्यातील दोन अक्षांचा विचार आपण करूया.
हे दोन अक्ष आहेत, अवकाश आणि काळ. आपल्या आयुष्यात घडणा-या घटना म्हणजे आपली कर्म आहेत. तर जगात घडणा-या घटना ही जगाची कर्म आहेत. ही दोन्ही कर्मे काळाच्या प्रवाहात घडत असतात. ह्या घडणा-या दोन घटना म्हणजे अवकाश आणि काळ ह्यांच्या अक्षावर वाटचाल करणारी जगरहाटी आहे. ह्या जगरहाटीचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर आणि जीवनावरही परिणाम घडत असतो. हे दोन अक्ष ज्या बिंदूवर एकामेकांना छेडतात, त्या बिंदूवर परिणाम उद्भवत असतो. दोन अक्षावर वाटचाल करणा-या घटना आपल्या व्यष्टीशी अनुकूल किंवा सुसंगत असतील, तर घडणारे परिणामही चांगले असतात. पण ते तर विसंगत किंवा प्रतिकूल असतील, तर परिणामही वाईट किंवा ते दुष्परिणाम आहेत, असं आपण म्हणतो.
थोडक्यात असे की अवकाश आणि काळ ह्या अक्षांचा छेदन बिंदू आपल्या आयुष्यावर परिणाम घडवीत असतो. म्हणजेच असे की घडणारा परिणाम हा विश्व कर्म आणि आपले कर्म ह्यांचा साकल्यपूर्ण किंवा संकीर्ण परिणाम असतो. आपल्या आयुष्याची जडणघडण अवकाश आणि काळ ह्यांच्या अक्षांवर घडत असते. प्रत्यक्ष भोगावे लागणारे परिणाम किंवा फळ हा जग आणि आपण ह्यांच्या कर्माचा विपाक असतो आणि तो म्हणजे अवकाश व काळ ह्यांचा छेदन बिंदू असतो.
आपले आयुष्य विश्वापासून अलग किंवा पृथक नसून विश्व रचनेतील एक परिणामकारक घटना आहे. म्हणून असं म्हणतात की मानवी जीवनामध्ये घडणा-या प्रत्येक किंवा संकीर्ण घटनांचा संबंध व नाते विश्वात्मक आहे. सूर्यावर घडणा-या घटना, ग्रह-तारे ह्यांच्या गतीमध्ये व स्थानांमध्ये घडणारे बदल अप्रत्यक्षपणे आपल्या आयुष्यावर परिणाम घडवीत असतात. उदा. प्रदूषण ही समस्या. जंगले, वृक्ष वनराजी, ऋतू, आणि आपले आरोग्य ह्यांचा निकटचा संबंध आहे, हेच प्रदूषण ह्या समस्येने अधोरेखित केले आहे. दुस-या टोकावर आपले ज्योतिष किंवा भविष्य शास्त्र आहे, ज्या मध्ये ग्रहांची स्थाने, गती, दशा इत्यांदिंचा सखोल विचार झालेला आहे. पण तो अपूर्ण आहे. शिवाय निष्कर्ष पद्धती अवैज्ञानिक आहेत. कारण वैज्ञानिक पद्धतीने, सूत्रबद्ध संशोधन ह्या शास्त्रांचे झालेले नाही. त्यामुळे त्यांची भाकिते किंवा निष्कर्ष सत्य असतातच, असे नाही आणि ह्यामुळे ह्या शास्त्रांचे महत्व त्यामुळे कमी नव्हे तर विश्वास ठेवण्या इतपत नाही. हे मान्य केलेच पाहिजे. दुसरे असे की वैद्यक शास्त्रात सुद्धा डॉक्टर जितका निष्णात, तितके त्याचे रोगनिदान अचूक असते. डॉक्टरचे रोगनिदान चुकले म्हणून वैद्यक शास्त्र खोटे किंवा चूक ठरत नसते. त्याचप्रमाणे, ज्योतिष शास्त्रज्ञ जेव्हढा निष्णात, तितके त्याने वर्तविलेले भविष्य, विशिष्ट घटने आणि काळा संदर्भात तेवढ्यापुरते सत्य असते, तेव्हढ्याच चौकटीत खरे असते.

No comments:
Post a Comment