पतंजलींनी चौथा यम 'ब्रम्हचर्य ' म्हणजे काय हे सांगताना म्हणले आहे, " ब्रम्हणि चरति इति ब्रम्हचारी ".जो ब्रम्हपदात स्थित असतो, तिथे राहून, जो सर्वत्र वावरतो, किंवा ज्याला जीवनाच्या परम अद्वैत तत्वाचे अखंड भान असते, जीवनाच्या एकमेवाद्वितीय सत्तेच्या जाणीवेत जगतो....तो ब्रम्हचारी होय. अद्वैत हीच जीवनाची सत्यता आहे. आपण द्वैताचे प्रामाण्य स्वीकारतो आणि ' मी-तू-तो ' इत्यादी तुकड्यांत जगतो. त्यामुळे आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण होत असतात.
ब्रम्हचर्य ह्या संज्ञेत चर्या म्हणजे चालणे,हालचाल करणे,वागणे-बोलणे इ क्रिया येतात. जगण्याच्या क्रियेचे हे अनिवार्य भाग आहेत. तर ब्रम्हन म्हणजे अरूप-निर्गुण आणि रूप-सगुण ह्या अस्तित्वाच्या जाणीवांचे अखंड चिन्तन-मनन होय. थोडक्यात, जगणे ह्या वास्तविकतेचे आपल्या अस्तित्वाच्या परिप्रेक्षात भान ठेवून आचरण करणे.
ब्रम्हचर्य म्हणजे लैंगिक किंवा संभोग क्रिया न करणे, हा रुढार्थ अतिशय उथळ आहे. वैवाहिक जीवन म्हणजे अब्रम्हचर्य नव्हे. वैवाहिक जीवनात संभोग हे प्रेमाचे आविष्करण आहे. प्रेम हे कौटुंबिक-सामाजिक पातळीवर वेगवेगळ्या नात्यांनी व्यक्त होत असते, प्रगट होत असते. आई-वडील व आपण ह्यांतील प्रेमाच्या नात्याला वात्सल्य म्हणतात, बहिण-भाऊ ह्याच्यातील प्रेमाच्या नात्याला स्नेह म्हणतात, मैत्रीतील प्रेमाच्या नात्याला मित्रत्व म्हणतात, इत्यादी नाती म्हणजे प्रेमाचे वेगवेगळ्या पातळ्यांवर होणारे आपल्या अस्तित्वाचे भान आहेत.
विमला ठकार म्हणतात, " Bramhacharya is a triple dedication to Perception, understanding and awareness.....It is not a code of conduct. These are Absolute values of human life because these values cannot be bargained away or compromised.....Without these values, it seems to me that sane & healthy societies can not come into existence."
**************

No comments:
Post a Comment