शेक्सपियर म्हणतो, " जग ही एक रंगभूमी आहे "....आजच्या लोकसत्तेच्या लोकरंग मध्ये नसिरुद्धीन शहाच्या मुलाखतीचा वृत्तांत आला आहे. त्यामध्ये नसिरुद्धीनने अनेक समाजिक गैरसमजांचा धांडोळा घेतला आहे. तो मार्मिक आहेच, साक्षेपी आहेच, पण त्यापेक्षा तो अत्यंत मुक्त असा संवाद आहे.
जग हे आपले जगण्याचे ठिकाण आहे, धर्मशाळा नाही. आपल्या जन्मापासून आपण आपली ह्या जगामध्ये काय भूमिका आहे, हे नकळत शिकत जात असतो. बालपणी, मी कोण, ही ओळख, आपल्याला परिचय करून देते, वात्सल्य म्हणजे काय...ह्याची. कुटुंबातून कळत जात...ह्या जगाच्या पाठीवर माझी माणसे कोण आहेत आणि कोण नाहीत....इथेच आपल्या आवडी-निवडी घडू लागतात. हळू-हळू शाळा-महाविद्यालयातून आपलं जग विस्तारित होऊन घराच्या बाहेर आपली नवीन नाती घडू लागतात. त्यातून मित्रत्व हे नात आकार घेऊ लागत. पण ह्या नात्याचे संदर्भ आणि ह्या नात्याच्या क्षमता जाणून घेण्याचे वय त्यावेळी आपल्याला नसते....ह्याचे भान येण्यासाठी आपल्या श्रद्धा आणि त्यांचे आपल्या जगण्यापेक्षा, आपल्या जीवनातील नेमके काय स्थान आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्या आवडी-निवडी तपासून घेण्याची नितांत गरज ह्याच वयात असते. आपल्या जीवनातील नात्यांचे अग्रक्रम ह्याच काळात आपल्याला समजून घेण्याची अत्यावश्यकता असते. अशा वेळी शाळा-महाविद्यालयीन शिक्षण, आपली वाचन संस्कृती आणि घराचे आपल्या नकळत आपल्यावर घडणारे संस्कार फार महत्वाचे असतात. हेच नेमके ह्या वेळी कमी पडले, तर आपल्या सह आपल्या कुटुंबाचे घडणारे नाते... ह्या समस्या बनू शकतात, नव्हे आजच्या काळात ह्या समस्या फार मोठ्ठ्या प्रमाणात गंभीर होऊ लागल्या आहेत....हे माझे आकलन नसून हे ह्या पिढीचे समाजभान आहे.....जे मला अस्वस्थ करीत आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या जगाच्या रंगभूमीवर विवाह हे एक स्थित्यंतर असते, मन्वंतर असते. आपल्याला लाभणारा जोडीदार हा सहजीवन प्रवासी म्हणून आपण त्याला स्वीकारायचे असते. हे विसरून आपण आपले अहंकार, आपली अस्मिता, माझ्या पदव्या, माझे शिक्षण, माझी आर्थिक-सामाजिक प्रतिष्ठा....ही सर्व माझे\पणाची वस्त्रे,अलंकार,आणि प्रतिमा आहेत...हे न ओळखल्यामुळे आपण आपल्यातील एक कुटुंब-पुरुष-स्त्री ही संवेदनाच समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही. जग ही रंगभूमी आहे तर ह्या रंगभूमीवर माझी कुटुंब-पुरुष-स्त्री म्हणून माझी ओळख मी करून घेण्यासाठी कमालीचे धैर्य, कमालीचे मानसिक आणि बौद्धिक श्रम-कष्ट घेतले पाहिजेत.....मुख्य म्हणजे माझी मानसिकता, बौद्धिक क्षमता आणि माझी स्वत:ची भूमिका नेमकी ह्या संदर्भात काय आहे, हे समजून घेणे, ही आपली सत्व कसोटी आहे, हे समजून घेण्यास आपण इथे कमी पडलो, अपयशी झालो, म्हणजे घटस्फोट घेणे भाग पडत असेल, तर पुढील जीवन प्रवास, जगाच्या रंगभूमीवरील आपली पावले अवरुद्ध होणार आहेत, अडखळणार आहेत...आणि ह्यातून आपण स्वत:ला सावरून पुन्हा नव्या दमाने उभे राहण्याची क्षमता आपली आहे की नाही? आपण जीवनाच्या दीर्घकाल पटाचा विचार करीत आहोत की नाही?.......ह्यामध्ये आपल्या उमेदीचा काळ खर्ची पडणार आहे.....ह्याचा सम्यक, सकारात्मक आणि स्पष्ट विचार करण्याची आपली क्षमता आहे का? आणि असेल तरीसुद्धा हे सक्तीने करणे, ही काळाची आणि आपल्या जीवनाच्या जडणघडणीच्या दृष्टीने अनिर्वाय, पर्याय नसलेली घटना, परिस्थिती आहे का? आणि ह्याचा निर्णय आपण एकट्याने घेणे बरोबर आहे का? ज्या निर्णयामुळे आपल्या विवाहाची केवळ समस्याच नाही तर संपूर्ण विवाह संस्थेच्या योग्यायोग्यतेवर आपण एक भले मोठ्ठे प्रश्नचिन्ह उभे करीत आहोत, ह्याचे भान आपण ठेवत आहोत का? जगाच्या रंगभूमीवरील आपला हा प्रयोग यशस्वी होणार आहे का ?
हे अनेक प्रश्न आपण स्वत:ला विचारले पाहिजे, तरच जगाच्या रंगभूमीवरील आपल्या भूमिकेला आपण न्याय दिला असणार आहे किंवा देणार आहोत, असे मला वाटते.
**************

No comments:
Post a Comment