कर्तव्य ही भावना नसून तत्व आहे. ह्या तत्त्वातूनच भगवत गीतेचे तत्वज्ञान उदय पावले आहे. अर्जुनाच्या विषाद योगापासून भगवंतांनी हे तत्व सांगण्यास सुरवात करून ह्या तत्त्वज्ञानाची व्याप्ती संन्यास मोक्ष इथपर्यंत कशी विस्तृत आहे, हे स्पष्ट केले आहे.
कर्तव्य हे वास्तवतेचे नाही, तर अस्तित्वाचे तत्वज्ञान आहे. तत्व म्हणल्यावर ते कठोर असतं....आणि ते सर्वकालीन, सर्वव्याप्त आणि अखिल मानवी जीवनाला कल्याणकारी कसं असतं, हे सांगताना भगवंतांनी १८ अध्याय खर्ची घातले आहेत. कर्तव्य म्हणजे जबाबदारी आहे,आणि ती प्रेयस म्हणजे प्रीय नसली तरी श्रेयस म्हणजे मानवतेचे कल्याण साधणारी, माणसाच्या कर्तृत्वाला आव्हान देणारी धाडसी आणि पराकोटीचे व्यापकत्व असणारी जगण्याची नव्हे तर जीवन साकारण्याची तत्व धारणा, तत्वशीलता आहे.
ह्यादृष्टीने कर्तव्य परायण असणे. हा सद्सद्विवेक आहे. परिस्थिती म्हणजे भवताल, अवकाश, आणि कालसापेक्ष चिंतन आहे. ते व्यष्टीनिष्ठ नसून समष्टी धारक अनुबंधन विचारवंतांच आहे. अर्जुन हा नुसता योद्धा नाहीयेय, तो विचारवंत आहे, म्हणून त्याच्या पुढे कर्तव्य पालन करताना आपलेपणा, मी-माझे आणि माझी नाती तसेच अहिंसा आणि मानव धर्म ह्या अतिशय मनस्वी आणि गूढ समस्या उभ्या राहिल्या आहेत.
सामान्य माणसा पुढे उभे राहाणा-या मुलभूत समस्या अर्जुनापेक्षा फार वेगळ्या नसतात. त्यामुळे श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रमाणभूत मानून व धरून गीतेचा प्रपंच मांडला आहे. अर्जुन हा निमित्त मात्र आहे. त्याने विचारलेल्या शंका आणि प्रश्न हे इतके सामान्य कोटीतील आहेत की कृष्णाने त्याची संभावना काही ठिकाणी " मूढ, मूर्ख " अशी केली आहे ! कर्तव्य हे मानवता वादाचे एक सूत्र आहे, असे स्पष्ट करताना कृष्णाने अनेक दर्शन शास्त्रांचा आधार घेतला आहे. उदा. सांख्य योग, कर्म योग, ज्ञान योग इ दर्शन शास्त्रे काय सांगतात, हे विषद केले आहे. प्रकृती आणि विकृती, स्त्री-पुरुष, नीती-अनीती, धर्म-अधर्म, इ अनेक द्वंद्वांची उकल केली आहे. त्याचप्रमाणे, सगुण-निर्गुण, आकार-निराकार आणि मानवी भाव-भावना इ सूत्रांचे विवेचन केले आहे. उदा. १४ व्या गुणत्रय विभाग योग मध्ये त्याने मानवी प्रकृतीची त्रिगुणात्मक विभागणी आणि अवस्था स्पष्ट करताना म्हणाले आहे की गुणातीत अवस्था ही श्रेयस आहे, असे म्हणाले आहे.
मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयो:|
सर्वारंभपरित्यागी गुणातीत: स उच्यते || १४.२५ ||
कर्तव्य पालन करताना तू गुणातीत हो, कारण कर्तव्य हे मानवी जीवनाचे संविधान आहे, मानवी कर्तृत्वाची घटनात्मक चौकट आहे......संस्कृतीचे अभिवादन आहे. संस्कृतीचे सृजन आणि संवर्धन ज्या प्रक्रियेतून होते, तिचे समाधान कर्तव्य पालनात आहे. संस्कृती तुझ्या-माझ्या कर्माने नष्ट होणार नसून तिचे केवळ संवर्धन करणे, हे कर्तृत्ववान समष्टीचे कार्य आहे. ज्यावेळी कर्तव्य पालन करावयाचे असते, तेव्हा अर्जुना, तू व्यष्टी नाहीस समष्टी आहेस..... संस्कृतीचे अखंडत्व टिकविणे, हे तुझ्या जीवनाचे प्रत्यक्षदर्शी कार्य आहे.कारण संस्कृतीचा लय आणि विलय हे निसर्गाचे कार्य आहे, तू त्याची चिंता करू नकोस.....
***********

No comments:
Post a Comment