मांडुक्य उपनिषद आत्मा म्हणजे काय, ह्याचे निवेदन करताना म्हणते,
एकात्मप्रत्ययसारं, प्रपंचोपशमं, शान्तं, शिवं, अद्वैतं |
चतुर्थं मन्यन्ते | स आत्मा | स विज्ञेय: ||7 ||
आत्मा कसा आहे तर तो -
(१) एकात्मप्रत्ययसारं- एकात्मता म्हणजे सर्वत्र एकच भाव, एकच अवस्था आणि एकच गती. आत्मा एकात्म आहे म्हणजेच आत्मतत्व आहे. चराचरात हे आत्मतत्व सामावलेलं आहे. ह्याची जाणींव जेव्हा जीवाला, आपल्याला होते, तेव्हा एकात्म तत्वाचे सार अंतर्मनात उतरते. ह्यालाच ' एकात्मप्रत्ययसार ' म्हणतात.
(2) प्रपंचोपशमं - आत्मा प्रपंचाचा उपशम करतो. प्रपंच म्हणजे जगण्याची धडपड. ह्यात सर्व आले, खाण्याची धडपड, पिण्याची धडपड, सुख मिळविण्याची धडपड, प्रजोत्पत्तीची ( लिंग वासना ) धडपड इ इ.
जग म्हणजे ' ज ' जन्म आणि ' ग ' म्हणजे गमन = मृत्यू. जन्मापासून मृत्यू पर्यंत जे अस्तित्व रूपाने आपल्या जाणीवेत असते, ते म्हणजे जग. ह्या जाणीव म्हणजे जगण्याची सगळी धडपड आहे. ही जगण्याची धडपड म्हणजे जगण्याची प्रापंचिक अवस्था भ्रामक आहे म्हणून ह्या अवस्थेचा जो अंत म्हणजे उपशम करतो, ती म्हणजे आत्मा होय.
(३) शान्तं- आत्म्याला राग, लोभ, मद, मत्सर इ षड्रिपू, वासना, नसतात.म्हणून तो शांत असतो.
(४) शिवं- शिव म्हणजे कल्याणकारी...आनंददायी. शिव हा आत्म्याचा मनुष्य अवतार म्हणून त्याला परमात्मा म्हणतात. पण मूलतः तोच आत्मा होय.
(५) अद्वैतं - आत्मा निरंतर, संजीवन, निराकार, निर्गुण असून चैतन्यमय आहे. तो अद्वितीय आहे. त्याला दुसरेपण नाही. म्हणजे तो एकमेव, द्वंद्वरहित, द्वंद्वशून्य असा आहे.
आत्मा हे विज्ञान आहे म्हणून त्याला विज्ञेय म्हणाले आहे. आत्मा समजून घेण्यासाठी मांडुक्य ऋषींनी चार भागात निवेंदन केले आहे. पहिल्या भाग - वैश्वानर, दुसरा- तैजस, तिसरा- प्राज्ञ. हे तिन्ही भाग बौद्धिक पातळीवर समजून घेता येतात. पण चौथा भाग मात्र मानून घ्यावा लागतो. कारण हा भाग सर्वस्वी स्वानुभावाचा आहे. अनुभव शिवाय प्रचिती येत नाही आणि प्रचीती शिवाय सिद्धता नाही. म्हणून मांडुक्य म्हणतात, " चतुर्थं मन्यन्ते " चौथा भाग गृहीतक असल्या प्रमाणे मान्य करावा लागतो.
***************

No comments:
Post a Comment