Depression हा शब्द नसून एक संज्ञा आहे. इथे आपण मराठीत चर्चा करताना depression चा विचार वैद्यकीय दृष्टीकोनातून, एक रोग किंवा रुग्णावस्था ह्या संदर्भात करणार आहोत.
मी स्वत: ह्या अवस्थेमधून गेलेलो असल्यामुळे व माझा चिकित्सक स्वभाव असल्याने मी ह्या अवस्थेवर खूप वाचन केले, माझ्या अवस्थेबद्दल त्यावरून चिंतन केले व नंतर अनेकदा लेखन करताना मनन केले आहे.
प्रथम आपण हे समजावून घेऊ की ह्या अवस्थेचे अनेक पैलू किंवा अंगे आहेत. नैराश्य हे मुख्य अंग आहे तर विषण्णता, खिन्नता, औदासिन्य किंवा उदासीनता ही ह्याच अवस्थेची इतर अंगे आहेत.
निराशा ह्या शब्दांगापासून नैराश्य हे अर्थांग तयार झाले आहे. निराशा अनेक कारणांमुळे येत असते किंबहुना आयुष्य हा आशा-निराशा ह्यांचा खेळ असतो. हे सर्व अतिशय सामान्य आहे, कारण आशा-निराशा ह्या तत्कालीन, निश्चित कारणोद्भव असतात आणि ह्या अवस्था नसतात. सामान्य माणसाच्या ह्या भाव-भावना असतात. आशा-निराशा ह्या जगणे ह्या अवस्थेचे संवेदनात्मक, सजीव आणि संजीवन असे परिमाण आहे. ह्या अर्थाने विषण्णता विषय (objective) संबंधित आहे. खिन्नता खेद म्हणजे दुख:, वाईट वाटणे, ह्या भावना (Emotional) संबंधित आहे. तर उदासीनता तटस्थ, अलिप्त, संवेदनाक्षम पण अंतर राखून असणे ह्या ऐहिक व वैयक्तिक (subjective) बाबी आहेत. पण ह्या सर्वांच्या मुळाशी निराशा ही सर्वसामान्य अभिव्यक्ती आहे आणि तिचा परिप्रेक्ष निरनिराळ्या पातळ्यांवर अभिव्यक्त होत असतो.
ह्या पातळ्या पुढील प्रमाणे आहेत-
(१) नैसर्गिक नैराश्य ( Natural depression)-काही काळापुरते म्हणजे ४८ तासांपेक्षा कमी काळ टिकणारे असते.
(2) तपासणी सिद्ध नैराश्य (Clinical depression)- नैसर्गिक नैराश्य ४८ तासांपेक्षा जास्त व सातत्याने जाणवत राहते. ह्या अवस्थेमध्ये भीती, एक प्रकारचे गूढ भय -भूतकाळातील किंवा भविष्यातील - जाणवत राहते. हे भय निराकार म्हणजे abstract स्वरूपाचे असते. जे भय किंवा भीती सामान्य माणसाला जाणवत नाही, पण रुग्णावस्थेतील माणसाला जाणवत राहते. कित्येकदा रुग्णाला भयग्रस्त किंवा भीतीग्रस्त करणारे कारण अत्यंत साधे, सामान्य व्यवहारातले असते. पण त्या भयाची अकारण तीव्रता रुग्ण व्यक्तीलाच ग्रासून टाकते. त्यामुळे सदर व्यक्ती स्वत;ला असुरक्षित (Insecure) मानते व आपले शरीर,मन आणि कार्यक्षमता गमावून बसते. ही मनोरुग्णावस्था clinical intervention म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी अत्यावश्यक असते.
(३) नैराश्यग्रस्त हालचाली/ व्यवहार (Depressive disorders)- काही रुग्णांमध्ये सतत विशिष्ट प्रकारच्या हालचाली, हावभाव किंवा व्यवहार करण्याच्या पद्धती स्पष्टपणे किंवा ठळकपणे दिसून येतात. असे रुग्ण वेडाच्या पातळीवर केव्हाही, कधीही जाऊ शकतात. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दखल करणे, त्य रुग्णासह सर्वांच्या हिताचे असते.
नैराश्य म्हणजे नक्की काय ह्याचे विस्तृत उत्तर मानसशास्त्राच्या ग्रंथांत उपलब्ध आहे. तसेच वर दिलेल्या विवेचनावरून हे स्पष्ट होते की नैराश्य ही एक अवस्था असून त्यामुळे सदर व्यक्ती सर्वच बाबतीत नकारात्मक होते. तिच्या भावना, कृतीजन्य हालचाली आणि विचार असमाधानपूर्ण असतात. ही व्यक्ती न्यूनगंडग्रस्त , भयगंडग्रस्त आणि अस्वस्थ असते. तरीही काही जणाची बौद्धिक, वैचारिक आणि व्यवहारिक पातळी सामान्य दिसते किंवा भासते. कारण ही रुग्णावस्था प्राथमिक स्वरुपात असते. पण ह्या प्राथमिक अवस्थेत योग्य उपचार (clinical treatment) व उपचार पद्धती (counselling / therapy) अनुसरली गेली नाही, तर ही अवस्था विकोपाला जाऊन रुग्ण वेडा (insane) किंवा वेडसर ( distressed sanity) होऊ शकतो.
नैराश्याची लक्षणे -
(१) भूक मंदावणे (2) वजन कमी होणे किंवा वाढणे.(३) खूप झोप येणे किंवा न येणे (४) अशक्तपणा आणि दुर्बलता (Loss of energy or increased fatigue-ness).(5) आयुष्य किंवा जगणे निरर्थक, बेचव वाटणे.(६) अकारण अपराधीपण (7) विचार करणे, एकाग्रतेने ऐकणे,आणि निर्णय घेणे, ह्यामध्ये अडथळा येणे, सुसंगती न लागणे. (८) आत्महत्या किंवा मृत्यूबद्दल सारखा विचार करणे.
ह्यातील एक किंवा अधिक लक्षणे 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ राहणे किंवा दिसत असतील तर नैराश्य ह्या रोगाची किंवा व्याधीची सुरुवात झालेली आहे, असे मानता येते. मात्र आणि अर्थात, मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरचे मत हे अधिकृत असते व तेच अंतिम समजायचे असते.
ह्याशिवाय, काही इतर वैद्यकीय कारणे उदा. थायरोईड, मेंदूतील गाठ, आणि व्हीटामिन्सची कमतरता ही करणे सुद्धा नैराश्य सूचक लक्षणे दर्शवित असतात. ती नाहीत ना,ह्याची खात्री करून घ्यावी लागते.तसेच, हे लक्षात घेतले पाहिजे की एका पाहणीनुसार, १६% लोक नैराश्याचे रुग्ण आहेत आणि ३३% स्त्रीयांना ह्या रोगाची बाधा झालेली आहे.
दुख:असणं किंवा असमाधानी असणं म्हणजे नैराश्य नव्हे. तसेच, अकस्मात घडलेल्या धक्क्यामुळे (trauma) झालेला आघात आणि त्यामुळे आलेले नैराश्य हा रोग नाही.
नैराश्य हा विकार जडण्याची काही शास्त्रीय कारणे-
(1) मेंदूतील काही विशिष्ट जीव-रासायनिक द्रव्ये किंवा थायरोईड ग्रंथीतील थायरोकझिन हा स्त्राव अधिक प्रमाणात स्त्रवण होणे.
(2)अनुवांशिकता- काही विशिष्ट प्रकारच्या जनुकांमध्ये विपरीत बदल घडणे. ही जनुके मेंदूचे कार्य नियंत्रित करीत असतात.
(३) काही व्यक्तींचा स्वभाव किंवा व्यक्तिमत्व नकारात्मक, सतत काळजी करणारा, मनाविरुद्ध घडणा-या गोष्टींमुळे अस्वस्थ होऊन ताणतणाव सहन करणारा किंवा परिस्थिती आणि सभोवताल ह्या बद्दल खूप चिंतीत असणारा स्वभाव.
(४) सातत्याने सभोवताली घडणारे अन्याय, अत्याचार, असमाधानकारक गोष्टी ह्यामुळे स्वत:ची प्रतिमा सांभाळू न शकणारा स्वभाव.
ह्या वरील कारणांवरून असे दिसते की नैराश्य ही अवस्था भौतिक कारणांपेक्षा मानसिक कारणांमुळे जास्त संभाव्य असते. त्याप्रमाणे, पुढील उपचार करता येतात-
(१) थायरोईड ह्या ग्रंथीच्या अयोग्य कार्यामुळे नैराश्य येऊ शकते, म्हणून ह्या ग्रंथीची Radio isotopic उपकरणे वापरून काटेकोर तपासणी करणे, आवश्यक आहे.
(2) ह्याखेरीज, रुग्णाची सांस्कृतिक आणि कौटुंबिक जडणघडण तपासली पाहिजे. ह्या कारणांची मीमांसा तज्ञ मानस शास्त्रज्ञाने करणे, आवश्यक आहे.
(३) मेंदूच्या सुलभ कार्य करण्यासाठी antidepressant drugs तज्ञ डॉक्टर वापरतात.
(४) Cognitive Behavioural Therapy (CBT) ही उपचार पद्धती काही तज्ञ वापरतात.त्यामुळे वागणूक, वर्तणूक, विचार पद्धती मध्ये काही चांगले बदल होऊ शकतात.
(५) नैराश्याचा खूप त्रास म्हणजे हालचाली, तोल सांभाळणे इ वर होत असेल तर Electroconvulsive Therapy (ECT) is a medical treatment most commonly used for patients with severe major depression or bipolar disorder who have not responded to other treatments. It involves a brief electrical stimulation of the brain while the patient is under anesthesia. A patient typically receives ECT two to three times a week for a total of six to 12 treatments. ECT has been used since the 1940s, and many years of research have led to major improvements. It is usually managed by a team of trained medical professionals including a psychiatrist, an anesthesiologist and a nurse or physician assistant.
(6) For many people, regular exercise helps create positive feeling and improve mood. Getting enough quality sleep on a regular basis, eating a healthy diet and avoiding alcohol (a depressant) can also help reduce symptoms of depression.
शेवटच्या दोन उपायांचे भाषांतर टाळले आहे. कारण अनेक वैद्यकीय शब्द आहेत, जे पारिभाषिक असल्याने भाषांतर बोजड होईल.
ओशोंच्या मते " नैराश्य म्हणजे तुमच्यात कसला तरी राग, क्रोध नकारात्मक स्थितीत दडून बसला आहे." त्यांच्या मते नैराश्य म्हणजे क्रोध, राग. खरी समस्या क्रोध आणि उपाय योजना नैराश्यावर....हे म्हणजे सावल्यांशी लढल्यासारखे झाले ! "
आता माझा अनुभव. आपल्या आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्या आपल्या मुलभूत जगण्याच्या प्रेरणांना उखडून टाकतात. नुसता आदर्शवाद नव्हे तर जीवनाची मुलभूत चाकोरीच उध्वस्त करतात. प्रामाणिकपणा ही माझी नुसती श्रद्धा नाहीतर जगण्याचे एक सूत्र आहे. उदा. प्रामाणिकपणा व सत्य निष्ठा. ह्या माझ्या गेल्या ६७ वर्षे जपलेल्या नैतिक आधारभूत जीवनेच्छा आहेत. ज्यावेळी वास्तवात ह्या निष्ठा असून ही माझ्यावर गुन्हेगारीचे आरोप ठेवून माझ्यावर खोटी, अप्रामाणिक आणि भ्रष्टचारयुक्त कारवाई झाली, तेव्हा मला जबदस्त धक्का बसलो. पण त्यावेळी माझ्या अंगभूत मानसिक शक्तीच्या जोरावर मी सर्व सहन केले. कालांतराने मात्र हा मनाच्या तळाशी गेलेला धक्का अचानक उसळी मारून, ज्व्लामुखीसारखा उद्रेक पावला. त्यामुळे मी कामावर असताना माझी बुद्धी, कार्यक्षमता अवगुंठीत होऊन जाऊ लागली. मी एकदम blank, शून्य होऊ लागलो. काहीच आठवत नाही, सुचत नाही, हातपाय गळून गेले आहेत....अशी अवस्था होऊन जायची. मग मी कामावरून घरी परत येत असे आणि सतत झोपून जात असे. अर्धवट जागेपण अनेकदा जाणवत असे आणि पूर्वी घडून गेलेल्या घटनांची काल्पनिक भीती स्वप्नवत माझ्या मनांत घिरट्या घालू लागत असे.
मनोविकार तज्ञांच्या सल्याप्रमाणे औधधे घेतल्यावर थोडे बरे वाटल्यावर कामावर जाऊ लागलो. पण तिथेच पुन्हा असे नैराश्याचे झटके येऊ लागत. मी पुन्हा घरी व औषध पाणी....असे एकून तीन वेळा attacks आले...मग मात्र सलग जवळ जवळ ६ महिने मी मनोविकार तज्ञ डॉक्टरांकडून औषध व्यवस्था आणि counselling घेतले. तेव्हा पूर्ण बरा झालो.
ह्या माझ्या अवस्थेचे त्यावेळी नाही पण नंतर मी विश्लेषण केले तेव्हा माझ्या लक्षात आले की एखादी घटना घडून जाते. तिला आपण धैर्याने तोंड देतो. पण कालांतराने ज्यावेळी मन:स्थिती आणि शारीरिक आजार वगैरे मुळे आपल्याला दुर्बलता आलेली असते, तेव्हा जुन्या धक्का देऊन गेलेल्या घटनांमुळे मनाला झालेल्या जखमा, ओरखडे भरून येतात. पण आपले नैसर्गिक बळ जेव्हा इतर मूळ घटनेशी संबंधित नसलेल्या घटना, मानसिक व शारीरिक दुर्बलता ह्यामुळे अशक्त होते, तेव्हा ह्या भूतकाळात गाडलेल्या घटनांचे मानसिक आघात उचल घेतात व नैराश्याचे झटके येऊ लागतात.
म्हणून वेळीच मनोविकार तज्ञ डॉक्टरांकडून उपाय योजना केल्या पाहिजेत व counselling करून घेतले पाहिजे.
***************

No comments:
Post a Comment