Friday, 4 October 2024

मी कोण आहे ?

 

                                                     मी कोण ?

मातेच्या उदरात जन्म घेण्यापूर्वी मी कोण होतो? आई-वडील ह्यांच्या गुणसूत्रांत विलीन असे वास्तव होतो. वास्तव म्हणजे वस्तुरूप अस्तित्व. पण त्या मी असण्याला काही अर्थ नव्हता, आकार नव्हता. पण तरीही मी होतोच ना? तर हा मी त्यावेळी, त्या काळात आणि स्थळात (time & space) एक भास होतो. एक बिंब होतो.

           आईच्या उदरात मी गर्भ म्हणून जेव्हा जीव झालो, तेव्हा मला आकार आला....पण तरीही मी जगाच्या दृष्टीने मी निराकार होतो....निरर्थक होतो.....मग मी कोण होतो? गर्भ म्हणून माझ्या अस्तित्वाचा अर्थ काय होतो? मी गर्भ....हा माझ्या आई-वडिलांच्या गुणसूत्रांचा आविष्कार होता. आई-वडील स्वत: कोण होते, माझ्या गर्भधारणेत? आई-वडील गुणसूत्र रूपाने भास होते, दोन बिंबे होती आणि मी तेव्हा ह्या भासांचा आभास होतो, प्रतिबिंब होतो.

           थोडक्यात, मी हा विशिष्ट काळात आणि स्थळात (time & space) मुलत: भास किंवा आभास, बिंब किंवा प्रतिबिंब असतो. हे विश्व म्हणजे मुळात भास आहे, माया आहे.....असे वेदांनी म्हणले आहे. कारण विश्वाचा निर्माता आकाशगंगा आहे....ह्या आकाशगंगेत अनेक विश्वे, ब्रम्हांडे आहेत.....पण जो पर्यंत त्यांना स्वतंत्र वस्तू रूपाने अस्तित्व नाही, आकार नाही....तोपर्यंत ही सर्व विश्वे भासमय आहेत.

          अशा प्रकारे मी हा भास आहे. तर मग मी-माझे-मला, तुझे-तुझ्यासाठी-तुला हा सर्व ह्या आभासाचा पसारा आहे....म्हणून माझे तुझे हा संकीर्ण आभास आहे. वेदा पंडीत म्हणते, माझा विस्तार म्हणजे माझेपण आणि तू-तुझेपण आहे....हे एकमेकांवरील थर आहेत......म्हणून ते आभास आहेत......मी हा मुळात भास आहे, हे मला जाणवते....ही निर्गुणावस्था आहे. निराकार...मला आकार नाही, रूप नाही.....ही जाणीव म्हणजे विदेहावस्था आहे. अध्यात्मामध्ये ह्या अवस्थेला, निद्रा ह्या अवस्थे पलीकडील तुर्यावस्था म्हणतात. झोप-निद्रा-सुषुप्ती ह्या तात्कालिक म्हणजे स्थळ-काल (time & space) सापेक्ष अवस्था आहेत. तुर्यावस्था मात्र स्थळ-काळ सापेक्ष नसली तरी निर्विकल्प म्हणजे संकल्प, इच्छा, अपेक्षा नसताना घडणारी एक अवस्था आहे. आध्यात्मशास्त्रात ह्या अवस्थेला निर्विकल्प समाधी म्हणतात. समाधी म्हणण्याचे कारण असे की ह्या अवस्थेत मी ची जाणीव असली तरी मी देह, मी शरीर हे भान लुप्त झालेले असते. समाधी अवस्थेत शरीर काष्ठवत होऊन गेले, तरी त्यात प्राण असतो......पण तो चैतन्य रूपाने नसतो. प्राण हा मुळात चैतन्य आहे. पण त्याला शून्यावस्थेत स्थिर राखणे जपणे.....ही योगविद्या आहे. योगीजन ती आत्यंतिक, खडतर, अखंड, आणि निरंतर साधनेने साध्य करू शकतात.

         ह्या पलीकडील अवस्था म्हणजे सविकल्प समाधी.....ज्ञानेश्वर माऊलीनी घेतलेल्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात. कारण त्यांनी समाधी घेण्याचा संकल्प केला विधिवत समाधी अवस्थेत, काळ-स्थळ सापेक्ष असा, प्रवेश केला देहत्याग केला. मी भास असून ह्या भासाला मी पाहतो...तेव्हा तो माझ्या अंत:करणात प्रतिभास-आभास-प्रतिबिंब चे अनुबंध  असतात. ह्या संकीर्ण अशा भास-आभास-बिंब-प्रतिबिंब असलेल्या जगाला सोडून निर्द्वंद्व होणे.....म्हणजे द्वन्व्दातीत होणे....म्हणजेच अद्वैत होणे.....विश्वमय होणे....विश्वात्मक होणे.

         द्वैत म्हणजे मी आणि माझेपण, मी आणि तू, मी आणि जग, सुख आणि दुख:, स्त्री आणि पुरुष, देव आणि दानव, देव आणि माणूस, सजीव आणि निर्जीव द्वंद्वे आहेत. ह्या द्वैतातून मुक्त होणे...हे अद्वैत आहे आणि हाच अद्वैताचा सिद्धांत आहे.

         सगुण आणि निर्गुण हे सुद्धा एक द्वंद्व असून ते एकत्र संकीर्ण स्वरुपात जेव्हा साक्षात्कार पावते, तेव्हा अद्वैताचा अनुभव येत असतो. मुळात सगुण ह्याचा अर्थच मुळी वस्तुरूपता असा आहे. सगुण हा दृश्य आहे, देह किंवा शरीर आहे. म्हणून त्याला म्हणजे शरीर रुपी आत्म्याला हे जग सगुणात्मक आहे, असे जाणवते. पण जेव्हा मी हा निर्गुणात्मक असतो, अभिव्यक्ती असतो किंवा समष्टी असतो, तेव्हा माझा भवताल, आजूबाजूचे जग निर्गुण आहे, असे वाटू लागते......ही नेणीव आहे.... जगाची जाणीव ही नेणीव, शून्यत्व, किंवा माया वाटू लागते. भवताल नेणीवेत जातो, निराकार होऊन जातो, आणि मी-पणा हा त्यामध्ये विलय पावला तरी ह्या विलयातही माझे साक्षित्व मला जगासह, भवतालासह पाहता येते. भासांतर्गत भास म्हणजे प्रतिभास किंवा भास आणि अभास हे एकमेकांवरील थर किंवा स्थर किंवा पातळी मला दिसू लागतात.....हे साक्षित्व आहे. ह्यालाच निर्गुणाचा साक्षात्कार म्हणतात.

         मी म्हणजे कोण? ह्याचे उत्तर देताना पतंजलीनी म्हणले आहे की हा मी म्हणजे बुद्धी-मन-चित्त आणि अहंकार ह्यांचा जोड complex आहे. ह्यातील अहंकार हा बुद्धी-मन-चित्त ह्यांना लपेटून घेणारा अत्यंत सूक्ष्म असा थर आहे. त्यामुळे अहंकाराचा भेद बुद्धी-मन-चित्त ह्यांच्या सहाय्याने करता येत नाही. त्यासाठी पतंजलींनी पातंजल योगदर्शन हा ग्रंथ लिहिला आहे. म्हणजेच असं की योगसाधनेने अहंकाराचा वेढा दूर करता येतो. ह्यावरून मी चा संबंध भास-आभास ह्या प्रभाव क्षेत्राखाली कसा येतो, हे स्पष्ट होते. त्याचप्रमाणे, अद्वैत सिद्धांतामध्ये मी चे स्थान आणि प्रभावक्षेत्र किती गुंतागुंतीचे आहे, हे लक्षात येते.

       अद्वैत सिद्धांत हा विषय समजायला अवघड आहे. म्हणून ह्या विषयाचे निरुपण असंख्य संतांनी, विचारवंतांनी आणि तत्वज्ञानी लोकांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून केले आहे. भगवत गीता, गीतेवरील शंकराचार्यांपासून, ज्ञानेश्वरांपासून ते आजच्या ओशो, जे. कृष्णमुर्ती, अनिरुद्धबापू आदि सद्गुरूंनी भाष्ये लिहिली आहेत, केली आहेत. तरीही ह्या विषयाचा आवाका मोठा आणि आकलन अपूर्ण आहे.

                                                     ***********

 

Monday, 30 September 2024

शब्द, भाषा आणि विचार प्रवाह

 

               शब्द, भाषा आणि विचार प्रवाह

ज्ञान-विज्ञान हा आपला आरसा आहे; त्यामध्ये आपल्या चेहऱ्याचे सौन्दर्य तर पहायचे आहेच; पण त्यापलीकडे आपल्या मनाचे आणि बुद्धीचे सौन्दर्य, विकसनशीलता आणि वैभव….. नुसते पहायचे नसून वारंवार तपासून घ्यायचे असते आणि घ्यायचे आहे....हे प्रत्येक वर्तमानाचे आपल्याला आवाहन आणि आव्हान आहे.

           शब्द आणि भाषा ह्यांच्या प्रेमातून विचारांचा अविष्कार होतो. म्हणून असं म्हणतात की विचारांची सुसूत्र मांडणी म्हणजे शब्द आणि भाषा ह्यांच्या प्रेमाचे सृजनात्मक अपत्य आहे. काळाच्या संदर्भात आपण जेव्हा संस्कृतीचा विचार करतो, तेव्हा आपण काळाच्या प्रवाहात विचारप्रवाहाचा अभ्यास करीत असतो. अशा प्रकारे, शब्द, भाषा, संस्कृती आणि विचार ह्यांचे अन्याय नाते आहे.

          साहित्य हे सांस्कृतिक मूल्य आहे. ह्याचा अर्थ  "तिळगुळ घ्या, गोड बोला" ह्या आपल्या संस्कृतीचे मूल्य आहे....संक्रांत ह्या सणाचे मूल्य ही आपली संस्कृती ह्या अर्थाने आहे की " सत्यम ब्रूयात" हे आहेच; शिवाय " प्रियं ब्रूयात " हे आहे...गोड बोला, पण सत्य बोला....

आपण साहित्यातून हाच विचार मांडतो की गोड बोलताना..... हे गोड बोलणे, खरे आणि मनापासून असले पाहिजे; तरच ते संस्कृती मूल्य आहे...

  साहित्य हे आपल्या हिंदू तत्वज्ञानच्या मुशीतून घडलेले आहे; त्यामध्ये विशाल विचार आहे...संकुचित विचार हा नाही की मी धार्मिक आहे; कारण आपली संस्कृती धर्म प्रधान नाही; म्हणूनच इतर कोणत्याही धर्मातील चांगली मूल्ये आपली संस्कृती अंगीकृत करत आलेली आहे आणि म्हणूनच 450 वर्षे इंग्रज-मुसलमान राजवटींच्या जुलमी सत्तेत असूनही ती आज पर्यन्त नुसती टिकून नाहीयेय, तर धर्म निरपेक्षितात ह्या संवैधानिक तत्त्वचिंतकाची बैठक झाली  आहे. संवैधानिक तत्व आणि मराठी साहित्य हे कधीच एकमेकांच्या विरोधात उभे नव्हते. ब्रिटिश आणि मुसलमान राजवटीतही तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर इ संत झाले आणि सांस्कृतिक मूल्य धारक साहित्य निर्माण करू शकले.

   राजकारण आणि साहित्य ह्यांचे एकत्रीकरण होऊ नये, हा आग्रह असण्याचे कारण मराठी किंवा कोणत्याही साहित्याला अभिजात दर्जा हवा असेल, तर काही पथ्ये निश्चितपणे अंगिकारली पाहिजेत.

  त्यातील मुख्य तत्व साहित्य बाह्य मूल्यांचा, कला बाह्य मूल्यांचा त्याग हे एक आणि दुसरे मूल्य म्हणजे समीक्षा शास्त्राकडे पाहण्याची निर्मळ दृष्टी हवी. समीक्षक आणि समीक्षा ह्यांची टिंगलटवाळी करून आपली दृष्टी निर्मळ होऊ शकणार नाही, हे दुसरे महत्वाचे तत्व आहे.

   दुर्दैवाने मराठीत समीक्षा दुर्लक्षित आहे, हे मर्ढेकरांपासून ते विंदा, पाडगावकर आणि वा ल कुलकर्णी आदींनी मान्य केलेले मत आहे. मराठीत जेव्हढया मोठया प्रमाणात साहित्य किंवा साहित्याच्या नावाखाली छपाई आणि प्रसिद्धी (!) होत आहे, त्यांच्या अगदी अल्प प्रमाणात समीक्षक आहेत आणि समीक्षा उपलब्ध आहे, हे सत्य स्वीकारले पाहिजे.

    मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना अनेक कारणे विचारात घेणे आवश्यक आहेत; त्यातील एक महत्वाचे कारण आहे. चिकित्सा आणि समीक्षेचा अभाव आहे, असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही, पण दुर्लक्ष नक्कीच आहे.

   दुर्दैवाची, अशी गोष्ट आहे की मराठी साहित्यिकच नाही, तर मराठी माणसाला सुद्धा टीका हा प्रकार नुसता आवडतच नाही, तर दु:स्वास करण्याचा, द्वेष-विद्वेष पसरविण्याचा विषय आहे...हे कटू, पण सत्य आहे; असे मला वाटते.

   

                                            *************

   

 

Thursday, 19 September 2024

Vedas

 Vedas are exposition of what Rishis expressed ex tempore. As such, therefore, these expressions are not governed by grammatical, languitsic and logical considerations. Nevertheless, Vedas have a deepest of deepth to absorb a meaningful dialogue with us. 

       Vedas are Shrutis, something that is listened. Smrutis have come up to fathom the into the Mantras of Vedas to understand these as meaningful theorems. Vedas are mystical because these are not constructs. Smrutis are work of intellect and logic. Dnyaneshwar Mauli says, " स्मृति तेचि अवयव | देखा आंगीक  भाव |" Through the body, organs come out. Like this, the Smrutis come out through Shrutis ie vedas. It's also like expression of our mind that comes out through the Vaani ie a toung which is an organ of our body. Thus, Shruti is like a body and Smrutis are like the organs which are revelations of what Vedas try to convey. 

        Puranas are stories, myths but these underline the principles of the philosophy of Vedas. Shrutis are dominants of geniusness; Smrutis are dominants of intellect; Puranas are dominants of stories; Darshanas are logic dominated revelations.  

          Atma is a pure consciousness; or we may call it super consiousness because mind is only a relative consciousness. It can't function without living body. In fact, it has no existence unless in  a living body. Thus, a consciousness is not knowing but a a feeling of reality. This consciousness creates knowing and through that the knowledge. There is no knowledge unless we have conscious reality of knowing. This functionality leads us to formalise knowledge into meaningful expressions. Words are meduim of expression. But words can have substitution with body signs. Nevertheless, there have to be words or substitutes of words to formalise knowldge,as it exists today. This knowledge then is developed as literature, arts and science which together constitute the culture. 

          What is self ? Self is a realization of being that I know : I am alive. This knowing is a physical existence. This physical existence is what we call our body but this self is knowing, feeling, and hard working entity. Therefore, the Self is knowledgeable being (आत्मस्वरूप is ज्ञानस्वरूप ).

            Vedas are composed of two aspects: Karm kand (कर्म कांड) and Dnyan Kand (ज्ञान कांड). In order to parctice Vedas, Hrishis introduced Karm Kand but Dnyan Kand is basis of Karm Kand. Hindu philosophy is based on Dualism (द्वैत वाद) and Non Dualism (अद्वैत वाद). Origin of Vedas is Shruti, a singular unit of expression ie Dnyan Kand. In order to develop further, Smruti have manifested themselves into Karm Kand. There cannot be a Self with only Dnyan. Dnyan has to got to perform unless and otherwise, it stands perished. Thus, Dualism is performing part of Non dualistic existence of Self.  

                               ***********  

             

Saturday, 27 July 2024

प्रेम आणि स्वातंत्र्य

 प्रेम आणि स्वातंत्र्य ह्यांचा घनिष्ठ संबंध आहे. प्रेम बंध असा एक शब्द आहे. ह्यामध्ये प्रेमाचे बंधन हा भाव आहे की प्रेम हेच बंधन आहे ?  प्रेम ही एक अशी संवेदना आहे, जी मुळात भावात्म आहे. बंध हा शब्द बंधन ह्या नकारात्मक भावातून आलेला आहे. कारण बंध म्हणजे बांधण्याचे साधन. ह्यावरून असे दिसते की प्रेम बंध हे एक भावात्म नाते आहे. कारण प्रेम ही वस्तू नसून अमूर्त अशी भावनात्मक वृत्ती आहे. 

     स्वातंत्र्य ही संवेदना नसून वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्य ही वस्तुस्थिती असल्यामुळे प्रश्न असा उभा राहतो की  स्वातंत्र्य कोणत्या संदर्भात वस्तुस्थिती आहे ? स्वातंत्र्य कोणापासून हवे आहे ? विशिष्ट व्यवस्था, परिस्थिती, माणसे आणि मनाच्या - शरीराच्या व्यथा...हे सर्वसाधारणपणे स्वातंत्र्याचे वैरी आहेत. मनोबुद्धी जे निर्णय देते, ते पाळणे अथवा न पाळणे, हा पर्याय असतो, तेव्हा जे स्वातंत्र्य उपलब्ध असते; असे स्वातंत्र्य संकुचित करणारे घटक म्हणजे विशिष्ट परिस्थिती, माणसे, आणि शारीरिक दुर्बलता, मानसिक दुर्बलता किंवा आर्थिक क्षमता. थोडक्यात,  मी आणि माझा भवताल हे स्वातंत्र्याचे वास्तव आहे आणि त्या संदर्भात कोणत्याही कारणामुळे मी नाराज होणे, दु:खी होणे, हतबल होणे, पराभूत होणे, इत्यादी घडणे....हे वास्तव आहे. हे स्वातंत्र्य व्यक्तिगत आहे. 

        पण आपण जेव्हा समूहाचा किंवा  समाजाचा विचार करतो, तेव्हा स्वातंत्र्य सामाजिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक अशा विविध परिस्थितीमध्ये वास्तव असते. ह्या वास्तवाला धक्का देणारी कोणतीही व्यवस्था बंधनात्मक असते; स्वातंत्र्याचा संकोच करणारी किंवा स्वातंत्र्य मर्यादित करणारी व्यवस्था असते. 

       प्रेम आणि स्वातंत्र्य ह्यांचा विचार करताना एक मूलभूत तत्त्व मान्य केले पाहिजे की प्रेम अनिर्बंध नसते. प्रेमाला बंधने असतात किंवा असावीत, हे तत्त्व मान्य केले, तर स्वातंत्र्याचा प्रश्न विचारात घेता येतो. निर्बंध म्हणजे विशिष्ट अशी बंधने. बंधने अशी नसावीत की ज्यामुळे व्यक्ती विकास संकुचित होतो किंवा होऊ शकतो. व्यक्ती विकासाला बंधने आणणारा कोणताही विचार किंवा कोणतीही कृती स्वातंत्र्याचा लोप करणारी असते. कारण स्वातंत्र्याचा मूलभूत उद्देश व्यक्ती विकास हाच आहे. पण व्यक्ती विकास सुद्धा अनिर्बंध असू शकत नाही. अनिर्बंध ह्याचा अर्थ कोणत्याही बंधनांचा, मर्यादांचा अभाव. असे वर्तन स्वैराचारी असते. ज्या वर्तनामध्ये कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि नैतिक न्यायाचा अभाव आहे, असे वर्तन पूर्ण स्वातंत्र्याचा आविष्कार आहे, असे म्हणायचे का ? म्हणजे ह्याचा अर्थ असा की अनिर्बंध जसे प्रेम असू शकत नाही तसेच स्वातंत्र्यही अनिर्बंध असू शकत नाही. प्रेम आणि स्वातंत्र्य एकमेकांना पूरक असे मानवी विकासाचे, राजकीय संहितेचे आणि आर्थिक उदारीकरणाचे मुद्दे आहेत. ज्या प्रेमात स्वातंत्र्याला वाव नाही, त्या प्रेमाचे रूप अविश्वासू, संशयग्रस्त आणि धोकेदायक होऊन जाते. प्रेम विश्वासाच्या मूलभूत पायावर दृढमूल असलेले आदर्श वास्तव आहे. जिथे विश्वास नाही, तिथे विश्वासघात होण्याची भीती असते. स्वातंत्र्य हे वास्तव भय विरहित, निर्भय आणि आत्मविश्वास विकसित करणारे मानवी नात्याचे निरूपण आहे. म्हणून प्रेमामध्ये स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यामध्ये प्रेम असणे, अनिवार्य आहे.

***********



Tuesday, 21 May 2024

अरुणा ढेरे - ह्यांच्या कथा

रामायण, महाभारत, पुराण, लोकसाहित्य इत्यादी आपल्या संस्कृतीची निरुपणे आहेत, आधुनिक दृष्टीतून,अपार समजुतीनं आणि जिव्हाळा..आणि तरीही पुरेसं वस्तुनिष्ठ असे आकलन करणे, ही सर्जनशील निर्मितीची प्रक्रिया आहे. कथा आणि लोकसाहित्यातील विविध परंपरा ह्यांचा शोध घेणे; त्यांचा अर्थ नव्याने आणि नव्या दृष्टीने शोधणे; त्यांच्यातील, समकालीन वर्तमानातील पूल शोधण्याचा प्रयत्न करत राहणे आणि ह्यातून अर्थसंपन्न अनुभवांचे भावबंध शोधणे, ही अरुणाताईच्या कथा लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. 

             सामान्यत: प्रत्येक भारतीय माणसात आपल्या प्राचीन वारशाचं प्रेम असत, अस्मिता असते. रक्तात ओढ असते तो जाणून घेण्याची. अनेक अनुच्चारित प्रश्न असतात, त्यांची उत्तरे समजून घेण्याची उत्सुकता असते. समकालीन वास्तव  टिपणे आणि त्याचा सामान्य माणसाच्या भलेबुरेपणाशी अर्थ लावणे, हे लेखकाचे तरल कौशल्य आहे. प्रेम, अपेक्षा आणि अपेक्षाभंग. लौकिक यश -अपयश अशी संसारिक सुखदु:खे रंगवणाऱ्या कथा ...हा लोककथांचा आत्मा आहे. ह्या कथांतून संसारात बिनसलेले सावरायला मदत होते. पुन्हा नव्या उमेदीने नवा दिवस जगायला, नवा संघर्ष करायला ताकद मिळते. अरुणा ढेरे ह्यांच्या कथांतून हे सार शिकायला मिळत.

             अरुणाताईच्या कथांमधील स्त्रीपात्रे संवेदनशील आहेत. बाईचं शहाणपण आणि आत्मभान त्यांनी सहजपणे त्यांच्या वर्तनातून दाखवून दिल आहे. विसाव्या शतकातील एक व्यासंगी, प्रगल्भ आणि कवी हृदयाची लेखिका या स्त्रियांबद्दल जे चितन करते, त्यात त्या त्या स्त्रियांची स्त्री म्हणून प्रतिष्ठा, सन्मान आणि अस्तित्व मोलाचं आहे. वडीलधारी, स्त्री-पुरुष पात्र त्यांच्या स्त्रीपात्रांना अनेकदा मूल्ययुक्त जगण्याचं बळ पुरवतात. त्यांच्याशी संवाद, त्यांचं  पाठबळ ह्यात महत्वाची भूमिका बजावतात.अरुणाताईच्या स्त्री चित्रणात आपुलकी आणि औदासिन्य, आकर्षण आणि अपसारण, जवळीक आणि दुरावा, भावनात्मक ओलावा आणि शुष्कपणा ,कोमलता आणि कठोरपणा, आस्था आणि अनास्था असे विविध परस्परविरोधी रंग विखुरलेले आहेत.   

Thursday, 9 November 2023

स्वातंत्र्य म्हणजे काय ?

स्वातंत्र्य ही संस्कृती आहे काय? स्वातंत्र्य हे जीवन मूल्य आहे काय?
अनिर्बंध स्वातंत्र्य ही संस्कृती नाही आणि जीवनमूल्य ही नाही. 
              निर्बंध कोणते योग्य आणि कोणते अयोग्य ह्याचे विश्लेषण देशाचा इतिहास, जगाचा इतिहास वाचून होते. आपले रामायण - महाभारत इत्यादी ग्रंथ रचणारे वाल्मिकी - व्यास आदी ग्रंथकारांनी मानवी भाव - भावनांच्या बरोबर तत्कालीन इतिहासाची चिकित्सा केलेली आहे आणि आजही इतिहासची आणि ह्या ग्रंथांची चिकित्सा विविध प्रबंधातून, अभ्यास सत्रांतून होत असते. न्याय संहिता आणि न्याय तत्व ह्या दृष्टीने संविधान हा ग्रंथ आणि त्यानुसार कार्य करणारी न्यायालये ही सुद्धा सत्य संशोधनाची साधने आणि व्यवस्था आहेत.
              राम -रावण, कौरव - पांडव, देव - दैत्य अशी रचन मांडून व्यास - वाल्मिकी ह्यांनी सुष्ट - दुष्ट, योग्य - अयोग्य, नैतिक - अनैतिक ह्या आणि इतर विविध आणि अनेक द्वन्व्दांवर भाष्य केले आहे. 
              सत्य हे असे विविध रंगांनी, विविध भाव - भावनांनी, विविध नात्यांनी रंगलेले आहे. ह्या सर्व किंवा अशा पैलूंच्या आधाराने, अभ्यासाने, संशोधनात्मक सखोल चिंतनशील विचारांमुळे सत्याची अमूर्त, गूढ आणि संदिग्ध बाजू कळू लागते, असे मला वाटते. निखळ सत्य हा आदर्शवाद आहे; म्हणूनच ह्या आदर्शवादाचे परिशीलन, आकलन हा सत्य जाऊन घेण्याचा अखंड वसा मानवाने घेतलेला आहे.
 ************ 
       

Monday, 19 June 2023

 My Scientific Papers - From thesis of my M. Sc. 

(1)Effects of ascorbic acid on in vitro cultivation of H. diesingi eggs.

Authors

Gosavi, A. V.; Renapurkar, D. M.; Kulkarni, A. B.

Journal-Bulletin of Haffkine Institute 1980 Vol. 8 No. 1 pp. 15-20

Record Number-19840816107

Abstract

Eggs dissected from the ovaries of Hammerschmidtiella diesingi were incubated in Locke's solution containing 0.1% (w/v) DL-ascorbic acid. The presence of ascorbic acid enhanced embryonic development, significantly so between 8 and 42 h of incubation. Thereafter the cultures were similar to those which lacked ascorbic acid. At 36 h, 60% of the eggs incubated with ascorbic acid were at the active embryonic stage, whereas in control cultures at this time only 10% were at this stage and 60% were at the pre-active embryonic stage.

 

(2) Oxygen uptake studies on hammerschmidtiella diesingi.

Gosavi, A. V.; Renapurkar, D. M.; Kulkarni, A. B., 1978-Bulletin of Haffkine Institute 6(3): 73-78

 

In chemotherapeutic treatment of helminthiasis, sensitivity of parasite to anthelmintic drugs depends to a large extent on parasite's metabolic pathways, which may be primarily either aerobic or anaerobic. But it has been difficult to understand the ability of some of the worms to derive energy aerobically and anaerobically. Anthelmintic drugs affect particularly carbohydrate metabolism which holds the key role as the source of energy in helminth parasites. Studies on carbohydrate metabolism of helminths have shown 2 main metabolic pathways. One pathway shows predominance of glycolytic, as the entire source of energy; in the other, the glycolytic pathway is shuttled at phosphoenol pyruvate stage to oxaloacetate and malate through CO2 fixation. Some biochemical features of carbohydrate metabolism 11 parasites were studied. A simple invertebrate host-parasite model of Periplaneta americana and its nematode parasite, H. diesingi was developed for the preliminary studies. The O2 uptake study on H. diesingi was carried out by using Warburg manometric techniques. Intact worms and homogenates were incubated for 3-8 h in glucose, pyruvate and acetate substrates. The O2 uptake was equivalent with these substrates. In sugars, more in galactose than glucose and mannose was found. The significance of these results were discussed.

(3) Effect of coconut milk on in vitro embryonic development of Hammerschmidtiella diesingi, Leidy Nematoda: Thelastomatidae

Gosavi, AV.; Renapurkar, DM.; Kulkarni, AB., 1981: Effect of coconut milk on in vitro embryonic development of Hammerschmidtiella diesingi, Leidy Nematoda: Thelastomatidae. Biovigyanam, 72: 187-189

 

(4) Infection patterns in multiple species of nematodes parasitic in Periplaneta americana L

Renapurkar, DM.; Gosavi, AV.; Arekar, AS., 1994: Infection patterns in multiple species of nematodes parasitic in Periplaneta americana L. Indian Journal of Helminthology. 1993( ); 451-2: 54-63.

                                                              **************